Devendra Fadnavis : पवार साहेबांचं शेवटी सत्य बाहेर आलं, याचा अतिशय आनंद झाला - देवेंद्र फडणवीस
Sharad pawar : पवार साहेबांचं शेवटी सत्य बाहेर आलं, मला याचा अतिशय आनंद झाला, उरलेलं अर्धसत्य मी बाहेर काढीन, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
Devendra Fadnavis on Sharad pawar : मागील काही दिवसांपासून राज्यात पहाटेच्या शपथविधीवरुन पुन्हा एकदा राजकारण तापले आहे. अजित पवारांसोबत पहाटेच्या शपथविधीमध्ये शरद पवारांचा हात होता, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला होता.याला पटलवर करताना शरद पवार यांनीही गुगली टाकली. आम्ही सरकारला पाठिंबा देणार होतो, पण दोन दिवसआधीच मी माघार घेतली होती. माझा पहाटेच्या शपथविधीला पाठिंबा होता, तर दोन दिवसांत सरकार का कोसळलं ? असा प्रश्न शरद पवारांनी उपस्थित केला. यावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पवार साहेबांचं शेवटी सत्य बाहेर आलं, मला याचा अतिशय आनंद झाला, उरलेलं अर्धसत्य मी बाहेर काढीन, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
शरद पवार साहेबांना शेवटी सत्य सांगावं लागलं, याचा मला अतिशय आनंद आहे. मी जी गुगली टाकली, त्यामुळे त्यांचं सत्य बाहेर आले. पण ते अर्धच सत्य बाहेर आलेय. उरलेले सत्य मी बाहेर काढेन. त्यांच्या गुगलीमुळे मी क्लीनबोल्ड व्हायच्या ऐवजी त्यांचे पुतणे अजित पवारच क्लीन बोल्ड झाले आहेत.अजून अर्धसत्यच बाहेर आलेय, उरलेले सत्य लवकरच बाहेर येईल, माझ्या दुसऱ्या गुगलीने उर्वरित सत्य बाहेर येईल, असे देवेंद्र पडणवीस म्हणाले.
शरद पवारांनी शपथविधीच्या तोंडवर माघार घेतली, देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते ?उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी रिपब्लिक या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अनेक दावे आणि गौप्यस्फोट केले. फडणवीस म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी आमच्याशी असलेलं नातं तोडले. त्यानंतर आम्ही सरकारी स्थापन करण्यासाठी वेगवेगळ्या पर्यायाचा विचार करत होतो. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत येण्यास इच्छुक असल्याचे सांगितले. त्यानंतर भाजप आणि राष्ट्रवादीची बैठक झाली. राष्ट्रवादीकडून अजित पवार यांना पुढाकर देण्यात आले. बैठकीत ठरल्याप्रमाणे मी आणि अजित पवार यांनी सर्व तयारी केली. मात्र शरद पवारांनी शपथविधीच्या तोंडवरच तीन चार दिवसांपूर्वी शरद पवारांनी माघार घेतली.
देवेंद्र फडणवीसांच्या आरोपाला पवारांनी काय दिले उत्तर ?
सरकार स्थापन करण्यासाठी भाजप आणि आमची चर्चा झाली होती. सरकार बनवण्यासाठी राष्ट्रवादीने बाहेरुन पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला होता. पण मी जर निर्णय बदलला होता, तर देवेंद्र फडणवीस यांनी शपथ का घेतली ? माझा पाठिंबा होता तर दोन दिवसात सरकार का पडले ? असा सवाल शरद पवार यांनी उपस्थित केला. विकेट गेलेला माणूस विकेट गेली म्हणून सांगतो का ? असा टोलाही पवारांनी लगावला. देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीदरम्यान पहाटेचा शपथविधी हा शरद पवारांचा डाव होता ? असा आरोप केला होता. या आरोपाला शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिलेय.