एक्स्प्लोर

Bhandara Hospital Fire | ...तर दगावलेल्या 10 बालकांनाही वाचवणं शक्य झालं असतं; प्रत्यक्षदर्शींचं मत

भंडाऱ्यातील दुर्घटनाग्रस्त हॉस्पिटलमधील शिशूकेअर कक्षात फायर अलार्म आणि पाण्याची सोयच नव्हती, असा आरोप प्रत्यक्षदर्शींनी केला आहे.

भंडारा : जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता नवजात केयर युनिटमध्ये ( SNCU) लागलेल्या आगीमुळे 10 नवजात बालकांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. यात आपल्या पोटच्या मुलांना मनभरून पाहण्याची संधीसुद्धा अनेक पालकांच्या नशिबी आली नाही. शनिवारी सकाळीच आलेल्या या वृत्तानंतर अख्खा महाराष्ट्र हळहळला. अशातच आता या घटनेसंदर्भात आणखी एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. भंडाराच्या जिल्हा रुग्णालयात ज्या ठिकाणी आग लागली तिथे फायर अलार्मच नसल्याचं उघड झालं आहे.

भंडाऱ्यातील दुर्घटनाग्रस्त हॉस्पिटलमधील शिशूकेअर कक्षात फायर अलार्म आणि पाण्याची सोयच नव्हती, असा आरोप प्रत्यक्षदर्शींनी केला आहे. जर फायर अलार्म असता तर धूर झाल्यानंतर फायर अलार्म वाजला असता आणि कर्मचारी सावध होऊन मदत कार्य लवकर होऊ शकले असते. त्यामुळे कदाचित आणखी बालकांना वाचवणं शक्य झालं असतं. शिवाय ज्या ठिकाणी आग लागली तिथे पाण्याची पाईपलाईन देखील नव्हती, त्यामुळे बाथरूममधून बादल्यांमधून पाणी आणून आग विझवण्यात फार वेळ गेला, असं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं.

...तर दगावलेल्या 10 बालकांनाही वाचवणं शक्य झालं असतं; प्रत्यक्षदर्शींचं मत

शिशूकेअर युनिटमध्ये आग लागल्यानंतर राजकुमार दहेकर अम्बुलन्स चालक बचाव कार्यासाठी सर्वात आधी पोहोचले होते. राजकुमार दहेकर यांनी बोलताना सांगितले की, 'काल लागलेल्या आगीत 7 बालकांना वाचवण्यात यश आलं, पण जर अलार्म आणि इतर सोयी असत्या तर दगावलेल्या 10 बालकांनाही वाचवणं शक्य झालं असतं.'

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा भंडारा दौरा; दूर्घटनाग्रस्त हॉस्पिटलची पाहणी करणार

भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता नवजात केयर युनिटमध्ये ( SNCU ) शुक्रवारी रात्री लागलेल्या आगीमुळे 10 नवजात बालकांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. या घटनेनंतर राज्य सरकारने तातडीने मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली. तसेच यासंदर्भात सखोल चौकशी करून दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.

या सर्व प्रकरण लक्षात घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दुपारी 12 वाजता भंडारा जिल्ह्यातील दूर्घटनाग्रस्त हॉस्पिटलची पहाणी करणार आहेत. तसेच नवजात बालकं गमावलेल्या पालकांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन करणार आहेत.

त्या रात्री नेमकं काय झालं?

भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता नवजात शिशु केअर युनिटमध्ये (SNCU) आग लागल्यामुळे दहा बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मध्यरात्री जवळपास दोनच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली. या युनिटमध्ये एकूण सतरा बालकं होती. त्यापैकी सात जणांना वाचवण्यात यश आलं आहे.

जिल्हा सामान्य रुग्णालयातील आऊटबॉर्न युनिटमधून रात्री दोनच्या दरम्यान अचानक धूर निघत असल्याचं समोर आलं. ड्युटीवर असलेल्या नर्सने दार उघडून बघतला असता त्या रुममध्ये मोठ्या प्रमाणात धूर होता, त्यामुळे त्यांनी लगेच रुग्णालयातील अधिकाऱ्यांना सांगितले. त्यानंतर अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचून रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या मदतीने बचावकार्य सुरु करण्यात आलं.

या SNIC मध्ये आऊटबॉर्न आणि इन बॉर्न अशी दोन युनिट आहेत. यापैकी मॉनिटरमध्ये असलेले सात बालकांना वाचवण्यात आले तर आऊट बॉर्न युनिटमधील दहा बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृत्युमुखी पडलेली बालकं एक ते तीन महिने या वयोगटातील आहेत. ज्या बालकांचं वजन कमी आहे किंवा प्रकृती नाजूक आहे, अशा बालकांनाच या वॉर्डमध्ये ठेवलं जातं.

महत्त्वाच्या बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMajha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
Embed widget