Bhandara Hospital Fire | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा भंडारा दौरा; दूर्घटनाग्रस्त हॉस्पिटलची पाहणी करणार
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज जिल्ह्यातील दुर्घटनाग्रस्त हॉस्पिटलची पहाणी करणार आहेत. यानंतर ते नवजात बालकं गमावलेल्या पालकांचे सांत्वन करुन त्यांना दिलासा देतील.
भंडारा : भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता नवजात केयर युनिटमध्ये ( SNCU ) शुक्रवारी रात्री लागलेल्या आगीमुळे 10 नवजात बालकांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. या घटनेनंतर राज्य सरकारने तातडीने मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली. तसेच यासंदर्भात सखोल चौकशी करून दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.
या सर्व प्रकरण लक्षात घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दुपारी 12 वाजता भंडारा जिल्ह्यातील दूर्घटनाग्रस्त हॉस्पिटलची पहाणी करणार आहेत. तसेच नवजात बालकं गमावलेल्या पालकांचे सांत्वन करून त्यांना दिलासा देणार आहेत.
दुपारी 12 वाजता ते भंडारा जिल्ह्यातील दुर्घटनाग्रस्त हॉस्पिटलची पहाणी करणार आहेत. यानंतर ते नवजात बालकं गमावलेल्या पालकांचे सांत्वन करुन त्यांना दिलासा देतील.
मुख्यमंत्री करणार दुर्घटनाग्रस्त हॉस्पिटलची पहाणी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या (10 जानेवारी) सकाळी 7.30 वाजता वर्षा बंगल्यावरुन भंडाराकडे रवाना होतील.
12.15 वा. नागपूर विमानतळ येथे आगमन
12.20 वा. हेलिकॅप्टरने शहापूर, ता.जि भंडाराकडे प्रयाण
12.55 वा जिल्हा सामान्य रूग्णालय दुर्घटनेतील भोजापूर येथील मृत शिशुचे पालकांची भेट
01.20 वा जिल्हा सामान्य रूग्णालय, भंडारा येथील वैद्यकीय शुश्रुषेत असलेल्या शिशुंच्या पालकांची भेट व घटनास्थळाचे निरीक्षण
02.30 वा विमानाने मुंबईकडे प्रयाण
दुर्घटनेसाठी जबाबदार असतील त्यांची चौकशी कठोरात कठोर कारवाई
या आगीतून अग्निशमन विभागाचे अधिकारी व वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी 7 बालकांना वाचविले आणि आग पसरू नये म्हणून प्रयत्नांची पराकाष्ठा केली म्हणून संपूर्ण रुग्णालय वाचले. या वाचलेल्या बालकांवर कोणतीही हयगय न होता व्यवस्थित उपचार सुरु ठेवा असेही निर्देश मी दिले आहेत, पण ही घटना मन सुन्न करणारी आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणतात की, कोवळ्या जीवांना मरण आले. कितीही सांत्वन केले तरी हे दु;ख भरून येणारे नाही. मी मुख्यमंत्री म्हणून या अतिशय दुर्दैवी घटनेत मरण पावलेल्या बालकांच्या पालकांच्या भावना समजू शकतो, त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. राज्य शासन त्यांच्या या दु:खात सहभागी आहे. पण इतकेच करून चालणार नाही. या दुर्घटनेसाठी जे जबाबदार असतील त्यांची चौकशी करून तत्काळ कठोरात कठोर कारवाई करण्यास मी गृहमंत्री आणि आरोग्य मंत्री दोघानांही सांगितले असल्याचे मुख्यमंत्री म्हणतात.
Bhandara Hospital Fire | 'या' सुरक्षारक्षकांच्या प्रसंगावधानामुळे वाचले 7 चिमुकल्यांचे प्राण
त्या रात्री नेमकं काय झालं?
भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता नवजात शिशु केअर युनिटमध्ये (SNCU) आग लागल्यामुळे दहा बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मध्यरात्री जवळपास दोनच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली. या युनिटमध्ये एकूण सतरा बालकं होती. त्यापैकी सात जणांना वाचवण्यात यश आलं आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालयातील आऊटबॉर्न युनिटमधून रात्री दोनच्या दरम्यान अचानक धूर निघत असल्याचं समोर आलं. ड्युटीवर असलेल्या नर्सने दार उघडून बघतला असता त्या रुममध्ये मोठ्या प्रमाणात धूर होता, त्यामुळे त्यांनी लगेच रुग्णालयातील अधिकाऱ्यांना सांगितले. त्यानंतर अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचून रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या मदतीने बचावकार्य सुरु करण्यात आलं.
या SNIC मध्ये आऊटबॉर्न आणि इन बॉर्न अशी दोन युनिट आहेत. यापैकी मॉनिटरमध्ये असलेले सात बालकांना वाचवण्यात आले तर आऊट बॉर्न युनिटमधील दहा बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृत्युमुखी पडलेली बालकं एक ते तीन महिने या वयोगटातील आहेत. ज्या बालकांचं वजन कमी आहे किंवा प्रकृती नाजूक आहे, अशा बालकांनाच या वॉर्डमध्ये ठेवलं जातं.
...त्या ठिकाणी फायर अलार्मचं नव्हता
जिल्हा सामान्य रुग्णालयातील आग लागलेल्या आऊटबॉर्न युनिटमध्ये फायर अलार्म नसल्याचं समोर आलं आहे. जर फायर अलार्म असता तर धूर झाल्यानंतर तो वाजला असता आणि कर्मचारी सावध होऊन मदत कार्य लवकर होऊ शकले असते. जर फायर अलार्म असता तर आज 10 मुलांना वाचवणे शक्य झाले असते.