एक्स्प्लोर
उधारी चुकवण्यास टाळाटाळ, भंडाऱ्यात मित्रांकडून तरुणाची हत्या
भंडारा : उधारीवर दिलेले पैसे देण्यास टाळाटाळ करणाऱ्या तरुणाची मित्रांनीच हत्या केल्याची घटना समोर आली आहे. हत्येप्रकरणी भंडाऱ्यामध्ये पोलिसांनी दोघा आरोपी मित्रांना अटक केली आहे.
दोन दिवसांपूर्वी भंडाऱ्यातल्या आढ्याळ परिसरात 18 वर्षीय सारंग श्यामकुँवरचा मृतदेह आढळला होता. हत्येचा तपास केला असता उधारीवर दिलेल्या पैशांच्या वादातून हा खून झाल्याचं समोर आलं.
सारंगनं मित्रांकडून 20 हजार रुपये उधार घेतले होते. मात्र ते परत देण्यास तो टाळाटाळ करत होता. यावरुन झालेल्या वादावादीत प्रवीण आकरे आणि सुरज वासनिक यांनी त्याला जंगलात नेऊन दारु पाजली. त्यानंतर दगडानं ठेचून सारंगची हत्या करण्यात आली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement