एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

सावरगाव दसरा मेळाव्यात शक्तीप्रदर्शनाची जय्यत तयारी

भगवान गडावरील दसरा मेळाव्याची परंपरा खंडित झाल्यानंतर पंकजा मुंडेंनी वेगळा मार्ग निवडत भगवान बाबांचं जन्मगाव सावरगावातून नवी परंपरा सुरु केली. यावर्षी सावरगावात भगवान बाबांच्या भव्य स्मारकाचं लोकार्पण होणार आहे.

बीड : भगवान गडावरील दसरा मेळाव्याची प्रथा खंडित झाल्यानंतर ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आपल्या दसरा मेळाव्याचं डेस्टिनेशन निवडलं ते म्हणजे संत भगवान बाबांचं जन्मगाव सावरगाव. याच सावरगावमध्ये भगवान बाबांच्या स्मारकाचं लोकार्पण दसऱ्याला होणार आहे. दसरा मेळाव्याला गर्दी जमवण्यासाठी पंकजा मुंडे समर्थकांमध्ये जणू स्पर्धा लागल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय. खासदार प्रीतम मुंडे यांच्यासह पंकजा मुंडेंनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून भाविक आणि समर्थकांना दसरा मेळाव्याचं निमंत्रण दिलंय.   दसरा जवळ आला की राज्यात दोन मेळाव्यांची चर्चा होते. एक म्हणजे शिवसेनेचा शिवतीर्थावरील दसरा मेळावा आणि दुसरा पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा. अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील भगवान गडावर होणाऱ्या दसरा मेळाव्याची परंपरा गडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी खंडित केल्यानंतर पंकजा मुंडे यांनी सावरगावमध्ये दसरा मेळावा भरवून शक्तीप्रदर्शन केलं. यावर्षी तर पंकजा मुंडे भगवान बाबांच्या भव्य स्मारकाचं लोकार्पण करणार आहेत. भगवान बाबांची 25 फुटांची मूर्ती पाण्‍यावर तरंगताना साकारण्‍यात येत आहे. ही मूर्ती बनवण्याचं काम प्रख्यात शिल्पकार प्रमोद कांबळे हे करत आहेत. विशेष म्हणजे संपूर्ण मूर्ती उच्च दर्जाच्या पॉलिस्टरमध्ये तयार करण्यात आली असून सध्या या मूर्तीचं काम हे अंतिम टप्प्यात आहे. येत्या 17 तारखेला ही मूर्ती सावरगाव येथे नेण्यात येणार आहे. 18 तारखेला म्हणजे दसरा मेळाव्यात या मूर्तीचं लोकार्पण होईल. मोठ्या आरोप-प्रत्यारोपानंतर भगवान गडावरील दसरा मेळाव्याची जुनी परंपरा खंडित करण्यात आली. पंकजा मुंडेंनी भगवान बाबांच्या जन्मगावातून एका नव्या परंपरेची सुरुवात केली. पंकजा मुंडेंनी गेल्या वर्षीच सावरगावात भव्य स्मारक बांधणार असं जाहीर केलं होतं. ही सर्व तयारी आता अंतिम टप्प्यात आल्यानंतर पंकजा मुंडेंनी फेसबुक पोस्टमधून आपल्या भावना व्यक्त केल्यात. कुणाचंही नाव न घेता त्यांनी या पोस्टमधून आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे. काय आहे पंकजा मुंडेंची फेसबुक पोस्ट? “माझ्या भगवान बाबांच्या दर्शनाने व मुंडे साहेबांच्या भाषणातून इतकी ऊर्जा घेऊन जात होते लोक ती ऊर्जा त्यांच्याकडून हिरावून घेणे अशक्यच...ही अशक्य बाब हिरावून घेण्याचा प्रयत्न झालाच..हे उध्वस्त करण्याचा डाव ही आखला गेला पण कोणी आपल्यावर वार केला तर त्यांच्यावर प्रतिवार करण्यात माझी सर्व शक्ती मी का लावू? त्यापेक्षा मी नवा डाव मांडून माझ्या लोकांना सुरक्षित व शांत ठेवणे मला क्रमप्राप्त वाटले. आपले शब्द दूषित करून कोणावर टीकाटिप्पणी करण्यापेक्षा निर्मितीवर मी जोर देते आणि त्या दिशेने मी वाटचाल ठरवली..” अशा आशयाची मोठी पोस्ट लिहून पंकजा मुंडेंनी सावरगाव दसरा मेळाव्या अगोदर समर्थकांशी संवाद साधलाय. याच मेळाव्यात दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने ऊसतोड कामगारांच्या महामंडळाची घोषणाही करण्यात येणार आहे. राज्यात एकीकडे ऊसतोड कामगारांचा संप चालू असतानाच दसरा मेळाव्याच्या निमित्ताने ऊसतोड कामगारांना एकत्रित करून पंकजा मुंडे मोठं शक्तीप्रदर्शन करण्याच्या तयारीत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rishabh Pant IPL 2025 : रिषभ पंतला 27 कोटी मिळाल्याची जागतिक चर्चा, पण किती कोटी टॅक्स जाणार अन् हातात किती पडणार?
रिषभ पंतला 27 कोटी मिळाल्याची जागतिक चर्चा, पण किती कोटी टॅक्स जाणार अन् हातात किती पडणार?
धक्कादायक! अंधेरीत 25 वर्षीय पायलट युवतीने संपवलं जीवन; पोलिसांनी बॉयफ्रेंडला उचललं
धक्कादायक! अंधेरीत 25 वर्षीय पायलट युवतीने संपवलं जीवन; पोलिसांनी बॉयफ्रेंडला उचललं
डायरेक्टर अरे थांब बाबा म्हणतोय, तरी किस करतच राहिला; अभिनेत्रीने केला गंभीर आरोप! म्हणाली, 'त्या एकामुळे..'
डायरेक्टर अरे थांब बाबा म्हणतोय, तरी किस करतच राहिला; अभिनेत्रीने केला गंभीर आरोप! म्हणाली, 'त्या एकामुळे..'
Parth Pawar: अमोल मिटकरींचा लेख, पार्थ पवारांचा इंग्रजीतून इशारा; माझा पक्ष अन् माझे वडिल म्हणत चांगलंच झापलं
अमोल मिटकरींचा लेख, पार्थ पवारांचा इंग्रजीतून इशारा; माझा पक्ष अन् माझे वडिल म्हणत चांगलंच झापलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 7PM TOP Headlines 7 AM 26 November 2024 सकाळी ७ च्या हेडलाईन्स-Rohit Pawar PC | निवडणूक आयोगाने आम्ही सांगू ती मशीन कॅमेऱ्याच्या निगराणीखाली उघडावीतRohit Pawar PC | निवडणूक आयोगाने आम्ही सांगू ती मशीन कॅमेऱ्याच्या निगराणीखाली उघडावीत- रोहित पवारABP Majha Marathi News Headlines 5PM TOP Headlines 5PM 11 November 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rishabh Pant IPL 2025 : रिषभ पंतला 27 कोटी मिळाल्याची जागतिक चर्चा, पण किती कोटी टॅक्स जाणार अन् हातात किती पडणार?
रिषभ पंतला 27 कोटी मिळाल्याची जागतिक चर्चा, पण किती कोटी टॅक्स जाणार अन् हातात किती पडणार?
धक्कादायक! अंधेरीत 25 वर्षीय पायलट युवतीने संपवलं जीवन; पोलिसांनी बॉयफ्रेंडला उचललं
धक्कादायक! अंधेरीत 25 वर्षीय पायलट युवतीने संपवलं जीवन; पोलिसांनी बॉयफ्रेंडला उचललं
डायरेक्टर अरे थांब बाबा म्हणतोय, तरी किस करतच राहिला; अभिनेत्रीने केला गंभीर आरोप! म्हणाली, 'त्या एकामुळे..'
डायरेक्टर अरे थांब बाबा म्हणतोय, तरी किस करतच राहिला; अभिनेत्रीने केला गंभीर आरोप! म्हणाली, 'त्या एकामुळे..'
Parth Pawar: अमोल मिटकरींचा लेख, पार्थ पवारांचा इंग्रजीतून इशारा; माझा पक्ष अन् माझे वडिल म्हणत चांगलंच झापलं
अमोल मिटकरींचा लेख, पार्थ पवारांचा इंग्रजीतून इशारा; माझा पक्ष अन् माझे वडिल म्हणत चांगलंच झापलं
Mumbai Indians : लखनौनं रिषभ पंतसाठी तब्बल 27 कोटी मोजले, पण गेल्या सहा वर्षांपासून सगळ्यांनाच घाम फोडलेल्या दोघांना मुंबईनं 23 कोटीत घेतलं; बाजी पलटणार?
लखनौनं रिषभ पंतसाठी तब्बल 27 कोटी मोजले, पण गेल्या सहा वर्षांपासून सगळ्यांनाच घाम फोडलेल्या दोघांना मुंबईनं 23 कोटीत घेतलं; बाजी पलटणार?
Eknath Shinde  : एकनाथ शिंदेंनी अर्थशास्त्र बघून नव्हे तर ह्रदयशास्त्र पाहून काम केलं, भाजपमधून पहिली प्रतिक्रिया, सुधीर मुनगंटीवार म्हणाले...
एकनाथ शिंदे म्हणाले नरेंद्र मोदी, अमित शाह यांचा निर्णय मान्य, भाजपमधून पहिली प्रतिक्रिया, मुनगंटीवार म्हणाले...
Eknath Shinde Full PC : थोडं भावनिक, थोडं आक्रमक...एकनाथ शिंदे यांचं FAREWELL SPEECH? ABP MAJHA
Eknath Shinde Full PC : थोडं भावनिक, थोडं आक्रमक...एकनाथ शिंदे यांचं FAREWELL SPEECH? ABP MAJHA
Eknath Shinde PC : भाजपचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा,  मोदी- शाहांच्या निर्णयाला पाठिंबा, एकनाथ शिंदे यांच्याकडून स्पष्ट संकेत
भाजपचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा, मोदी- शाहांच्या निर्णयाला पाठिंबा, एकनाथ शिंदे यांच्याकडून स्पष्ट संकेत
Embed widget