एक्स्प्लोर
बेळगावात शेकोटीत भाजून सुरक्षारक्षकाचा मृत्यू
प्रभाकर पुकळेकर असं मृत सुरक्षारक्षकाचं नाव आहे.

बेळगाव : बेळगावमधील उधमबाग पोलिस स्थानकाच्या बाजूलाच असलेल्या एक फॅक्टरीत, आगीच्या शेकोटीत भाजून सुरक्षारक्षकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आली आहे. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी घडलेल्या या दुर्दैवी घटनेने हळहळ व्यक्त होत आहे. प्रभाकर पुकळेकर असं मृत सुरक्षारक्षकाचं नाव आहे. थर्टी फर्स्टच्या रात्री केलेल्या शेकोटीत भाजून त्यांचा अंत झाला. या फॅक्टरीचा गेट बंद असल्याने तिथे कुणीच गेलं नाही, त्यामुळे नववर्षाला ही घटना उघडकीस आली आहे. त्याहून वाईट गोष्ट म्हणजे सुरक्षारक्षकाच्या जळालेल्या मृतदेहाचे रात्रीच्या वेळी कुत्र्यांनी लचके तोडल्याचा प्रकार घडला आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
क्रिकेट
भारत
व्यापार-उद्योग























