एक्स्प्लोर
ड्रायव्हरला हर्ट अटॅक, कंडक्टरने बस चालवली, मात्र....
बेळगाव: बेळगावात रविवारी आश्चर्यकारक आणि काळजाला चटका लावणारी घटना घडली.
बेळगाव संतीबस्तवाड बस चालवत असताना ड्रायव्हर मोहमद काझी यांना रविवारी रात्री छातीत दुखू लागले. त्यांना बस चालवणे अशक्य झाल्यामुळे, नंतर थेट कंडकटरने बस चालवत बेळगावला आणली.
मात्र वाटेतच वेदना असह्य झाल्यामुळे बस थांबवून मोहमद काझी यांना अँब्युलन्स मधून हॉस्पिटलला पाठवले. पण उपचार सुरु असताना त्यांचे निधन झाले.
संतापजनक म्हणजे शनिवारी काझी यांनी डेपो मॅनेजरकडे छातीत दुखत असल्यामुळे रजा मागितली होती. पण डेपो मॅनेजरने रजा देण्यास नकार दिला. त्यामुळे काझी यांना रविवारी ड्युटीवर यावे लागले.
वरिष्ठांनी रजा नाकारल्यामुळे मृत्यू झाल्याचा ड्रायव्हर- कंडेक्टरांनी आरोप करत शहर बस सेवा बंद केली आहे. ड्रायव्हर- कंडक्टरनी शहर बस सेवा बंद करून धरणे आंदोलन छेडून डेपो मॅनेजरला निलंबित करा अशी मागणी केली.
कंडक्टरनी काल शहर बस सेवा बंद करून आंदोलन छेडले. त्यानंतर अखेर विभागीय नियंत्रकांनी डेपो मॅनेजरवर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यावर, अकरा वाजता आंदोलन मागे घेण्यात आले. सकाळपासून अकरा वाजेपर्यंत शहर बससेवा बंद राहिल्यामुळे विद्यार्थी आणि कामाला जाणाऱ्यांची मात्र पंचाईत झाली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
क्रिकेट
क्रिकेट
Advertisement