एक्स्प्लोर
मोबाईल चोरीला गेल्याने तरुणाची आत्महत्या
गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीमध्ये ढोल वाजवणाऱ्या एका तरुणाचा मोबाईल चोरीला गेला आणि हा धक्का सहन न झाल्याने त्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बीड शहरामध्ये घडली आहे.

बीड : गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीमध्ये ढोल वाजवणाऱ्या एका तरुणाचा मोबाईल चोरीला गेला आणि हा धक्का सहन न झाल्याने त्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बीड शहरामध्ये घडली आहे. 23 वर्षीय आकाश वडमारे हा तरुण हा बीड शहरातील बलभीम चौक परिसरात राहत होता. काल (12 सप्टेंबर) गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीमध्ये तो ढोल वाजवत होता. मिरवणुकीदरम्यान त्याच्या खिशातील दहा हजार रुपये इतक्या किंमतीचा मोबाईल चोरीला गेला. या घटनेचा धक्का बसल्यामुळे रात्री नऊच्या सुमारास आकाशने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. मोबाईल चोरीला जाणे ही घटना तशी शुल्लक असली तरी मोबाईल हा तरुणांच्या किती जिव्हाळ्याचा विषय बनत आहे, हे पुन्हा एकदा या घटनेमुळे अधोरेखित झाले आहे. मोबाईल चोरीला गेल्यामुळे आत्महत्या केल्याने आकाशबद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे.
आणखी वाचा























