Beed News: बीडला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी गंजली, 32 दिवस पाणीच नाही, संतापलेल्या नागरिकांनी अजितदादांच्या फोटोला अभ्यंगस्नान घातलं
बीड (Beed) शहराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी गंजली आहे. त्यामुळं तब्बल 32 दिवसापासून बीड शहराचा पाणीपुरवठा खंडित झाला आहे. यामुळं बीडचे नागरिक संतप्त झाले आहेत.

बीड: बीड (Beed) शहराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी गंजली आहे. त्यामुळं तब्बल 32 दिवसापासून बीड शहराचा पाणीपुरवठा खंडित झाला आहे. यामुळं बीडचे नागरिक संतप्त झाले आहेत. संतापलेल्या नागरिकांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या (Ajit Pawar) प्रतिमेला अभ्यंग स्नान घातल निषेध व्यक्त केला आहे. दरम्यान, आमदार संदीप क्षीरसागर घटनास्थळी दाखल झाले असून आठ दिवसाला पाणीपुरवठा होणार असल्याचा दावा आमदार संदीप क्षीरसागर यांनी केला आहे.
पाईप बदलण्यास आणखी सहा दिवस लागतील
ज्या ठिकाणी जलवाहिनी गंजली आहे. त्या ठिकाणी बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी भेट दिली आहे. यावेळी 720 मीटर पाईपलाईन देखील आमदार निधीतून क्षीरसागर यांनी दिली आहे. पाईप बदलण्यास आणखी सहा दिवस लागतील असा अंदाज आहे. पुढील काळात बीड शहराला आठ दिवसाला पाणीपुरवठा होणार असल्याचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी सांगितले आहे.
माजलगाव धरणातून बीड शहराला पाणीपुरवठा होतो. मात्र काडी वडगाव परिसरात मुख्य जलवाहिनी चौदाशे मीटर गंजली आहे. त्यामुळे गेल्या 32 दिवसापासून बीड शहराचा पाणीपुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळं नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न निर्मण झाला आहे. त्यामुळं प्रशासनाच्या विरोधात नागरिक आक्रमक होताना दिसत आहेत.
अजित पवार यांच्या प्रतिमेला अभ्यंग स्नान घालून लक्षवेधी आंदोलन
बीड शहरात महिनाभरापासून नळाला पाणी येत नाही. परिणामी शहरात पाणीबाणी सुरु झाली आहे. 114 कोटी रुपयांची अमृत अटल योजना कुठे गेली? असा सवाल उपस्थित केला जात आहे. तर उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजित पवारांनी बीडकरांच्या व्यथा जाणून घेऊन प्रश्न सोडवावेत अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली. यासाठी अजित पवार यांच्या प्रतिमेला अभ्यंग स्नान घालून लक्षवेधी आंदोलन करण्यात आले.
ज्यातील अनेक लहान मोठ्या धरणांची परिस्थिती सध्या चिंताजनक
राज्यात तापमानाचा भडका उडालेला असताना आता पाणीटंचाईचा सावट ही मान उंचावून उभे आहे. राज्यातील अनेक लहान मोठ्या धरणांची परिस्थिती सध्या चिंताजनक असल्याचे चित्र आहे. त्यामुळे आगामी काळात जलसंकट (Maharashtra Dam) अधिक गडद होण्याची भीती वर्तवली जात आहे. अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळं राज्यातील काही विभागात टँकरने पाणीपुरवठा सुरु करण्यात आला आवा आहे.
महत्वाच्या बातम्या:























