दुर्दैवी! मुख्यमंत्र्यांच्या दीर्घायुष्यासाठी पायी तिरुपतीला निघालेल्या शिवसैनिकाचा वाटेतच मृत्यू
अंगात ताप होता, पायात त्राण नव्हता तरी सुमंत रुईकर चालत राहिले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दीर्घायुष्य मिळावे यासाठी तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी निघालेल्या रुईकर यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
![दुर्दैवी! मुख्यमंत्र्यांच्या दीर्घायुष्यासाठी पायी तिरुपतीला निघालेल्या शिवसैनिकाचा वाटेतच मृत्यू Beed Shiv Sena Party worker Shiv Sainik dies on the way to Tirupati for CM Uddhav Thackeray longevity दुर्दैवी! मुख्यमंत्र्यांच्या दीर्घायुष्यासाठी पायी तिरुपतीला निघालेल्या शिवसैनिकाचा वाटेतच मृत्यू](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/26/eea43c4802b2cf5495e6270b9a34af8b_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
बीड : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दीर्घायुष्य मिळावे यासाठी बीडमधील शिवसैनिक सुमंत रुईकर तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी पायी निघाले होते. त्यांनी यासाठी 1100 किलोमीटर पायी जाण्याचा निश्चय केला होता. एक डिसेंबर पासून तिरुपतीच्या वाटेवर निघाले खरे पण वाटेतच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यापूर्वी 2019 मध्ये ही उद्धव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी आहे. सुमंत रुईकर यांनी बीड ते तिरुपती बालाजीची पायी यात्रा पूर्ण केली होती. मुख्यमंत्री झाल्यावर उद्धव ठाकरे यांनी सुमंत रुईकर यांच्या निष्ठेचे कौतुक सुद्धा केले होता आणि त्याचा सत्कार देखील केला होता.
सुमंत रुईकर आणि त्यांचा मित्र शुभम जाधव यांचं दोघे रोज 35 किलोमीटर पायी चालत 31 डिसेंबरपर्यंत त्यांना तिरुपती बालाजीला पोहोचायचे नियोजन होते. शनिवारी ते कडप्पापर्यंत पोहोचले. पण रोज तीस-पस्तीस किलोमीटर चालण्यामुळे सुमंत रुईकर थकले होते. त्यातच त्यांना ताप आला. त्या अवस्थेत देखील त्यांना पुढे जायचे होते. त्यांच्या मित्राने हे घरी कळवले आणि घरच्यांनी त्यांना परत येण्याची विनंती सुद्धा केली होची मात्र त्यांनी कुणाचंही ऐकलं नाही.
घरच्यांनी विनंती केली, मित्रांनीही त्यांना पुढे जाण्यापासून थांबवलं. अखेर कशीबशी सुमंत यांची समजूत घालण्यात आली. परत येण्यासाठी कडप्पामधून रेल्वेत बसून ते बीडला परत येण्यासाठी निघाले. मात्र सोलापूर येण्याआधीच सुमंत रात्रीच तेलंगणा राज्यातील रायचूर स्टेशनवर उतरले आणि एकटेच पुन्हा तिरुपतीकडे निघाले.
अंगात ताप होता, पायात त्राण नव्हता तरी ते चालत राहिले आणि रायचूरपासून तिरुपतीच्या दिशेने 20 किलोमीटर अंतरावर रस्त्याच्या कडेला कोसळले. दरम्यान घरची मंडळी मित्र सतत फोन करत होते. रिंग जात होती पण फोन उचलला जात नव्हता. अखेर घरच्या मंडळींनी बीडच्या पोलिसात धाव घेतली आणि हरवल्याची नोंद केली.
अखेर मोबाईलच्या लोकेशनवरून पोलिसांनी सुमंत रुईकर यांचं लोकेशन ट्रेस करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस त्यावर रायचूरचा पत्ता मिळाला बीडहून सुमन तोडकर यांचे मित्र मंडळ रायचूरला पोहोचले. दरम्यान सुमंत तिथे बेशुद्ध अवस्थेत पडले होते. रायचूरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं, तोपर्यंत त्याच प्रकृती खालावली होती. अखेर सुमंत रुईकर यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. सुमंत रुईकर यांच्या पश्चात पत्नी वडील आणि दोन मुलं आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)