एक्स्प्लोर
Advertisement
लग्नात बूट लपवल्यावरुन वाद, नवरदेवाचं डोकं फुटलं, लग्नही मोडलं!
महत्त्वाचं म्हणजे सासऱ्याने झालेलं लग्न मोडून आपल्या मुलीला तलाक घ्यायला लावला.
बीड : लग्नात मुलीकडच्यांनी नवरदेवाचे बूट लपवून त्याच्याकडून पैसे घ्यायचे, असा सध्याच्या लग्नातला ट्रेण्ड आहे. परंतु एका लग्नात बूट लपवण्यावरुन झालेल्या वादात चक्क नवरदेवाचंच डोकं फुटल्याची घटना आहे. बीडच्या केज तालुक्यातील कुंभेफळ गावात रविवारी हा धक्कादायक प्रकार घडला. महत्त्वाचं म्हणजे सासऱ्याने झालेलं लग्न मोडून आपल्या मुलीला तलाक घ्यायला लावला.
नेमकं काय घडलं?
सुलताना युनूस शेखचा नबी सिकंदर शेख यांच्या मुलीशी रविवारी निकाह होता. पण लग्नाआधी मुलीच्या भावाने नवरदेवाचे बूट लपवल्याने वाद झाला आणि त्याचं रुपांतर मारहाणीत झालं. मात्र सामोपचाराने हा वाद मिटला, लग्नही झालं.
पण लग्नाआधी घडलेल्या प्रकारावरुन पुन्हा वादाला सुरुवात झाली. वादावादी झाली. मग नवरदेवाने मुंडावळ्या आणि सेहरा काढून फेकून दिला. यानंतर नंतर जे घडलं ते अतिशय धक्कादायक होतं. कारण या हाणामारी नवरदेवाचं डोकं फुटलं आणि त्याला सहा टाके पडले. सासऱ्यानेच आपल्या हातातील लाकडाने नवरदेवावर वार केल्याचा आरोप आहे.
..आणि तलाक झाला!
सुलतानवर केजच्या सरकारी रुग्णालयात उपचार केल्यावर, नवरदेवाची मंडळी युसूफ वडगाव पोलिस स्टेशनला गेली. मात्र ही मंडळी पोलिस स्टेशनला गेल्याचं कळताच वधूकडच्या मंडळीनी वऱ्हाडींचा टेम्पो अडवून ठेवला. बराच काळ तणाव निर्माण झाल्यानंतर पोलिस दाखल झाले. मात्र शेवटी हा वाद तलाक होऊन संपला. यानंतर वराकडची मंडळी तुळजापूरला परतली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement