एक्स्प्लोर

बीडमधील दरोडा आणि हत्या प्रकरण, संशयित आरोपीला अटक

जवळपास पाच दिवसांनी पोलिसांना या प्रकरणाचे धागेदोरे मिळाले आहेत. संशयित आरोपीकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी पुढील तपास सुरु केला आहे.

बीड : गेवराई येथील गणेशनगरातील सरस्वती कॉलनीतील बँक अधिकाऱ्याच्या घरावर सशस्त्र दरोडा आणि खून प्रकरणाचे धागेदोरे शोधण्यात पोलिसांना यश आलं आहे. घाडगे दाम्पत्याची हत्या दरोडेखोरांनीच केल्याचं उजेडात आलं असून एका संशयिताला जेरबंद करण्यात आलं आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयिताची गोपनीय चौकशी करण्यात आली. यात त्याने आणखी चार साथीदार असल्याचं सांगितलं. जवळपास पाच दिवसांनी पोलिसांना या प्रकरणाचे धागेदोरे मिळाले आहेत. संशयित आरोपीकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी पुढील तपास सुरु केला आहे. दरोडेखोर मद्याच्या नशेत दरोड्याच्या उद्देशाने घाडगे यांच्या घराजवळ गेले. दरवाजा खटखटला. अलका घाडगे यांनी दरवाजा उघडताक्षणी त्यांच्यावर धारदर शस्त्राने वार केला. त्यांनी आरडाओरड केल्यानंतर आदीनाथ घाडगे यांना जाग आली. त्यांच्यावरही हल्ला चढवला. दोघेही रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर त्यांच्या दोन्ही मुली जाग्या झाल्या. त्यांच्यावर हल्ला केल्यानंतर घाडगे दाम्पत्य गतप्राण झाल्याचं लक्षात दरोडेखोर भयभीत झाले. काय आहे प्रकरण? बीडमधील गेवराईत बँक अधिकाऱ्याच्या घरावर सशस्त्र दरोडा पडला. या दरोड्यात दरोडेखोरांनी घाडगे पती-पत्नीची क्रूर हत्या केली, तर दोन्ही मुलींवरही धारदार शस्त्राने हल्ला करुन लाखोंचा ऐवज लंपास केला. गेवराई शहरातील सरस्वती कॉलनीत ही घटना घडली. भवानी अर्बन को ऑपरेटिव्ह बँकेच्या मुख्य शाखेतील प्रमुख वसुली अधिकारी आणि वरिष्ठ व्यवस्थापक आदिनाथ घाडगे यांच्या घरावर 23 ऑगस्ट रोजी पहाटे सशस्त्र दरोडा पडला. पहाटे साडे तीनच्या सुमारास दरोडेखोरांनी दरवाजा ठोठावला. घाडगे यांच्या पत्नी अलका (वय 42 वर्ष) यांनी दरवाजा उघडल्यानंतर दरोडेखोरांनी धारदार शस्त्राने त्यांच्यावर हल्ला चढवला. यानंतर आदिनाथ घाडगे, घरात बाळंतपणासाठी आलेली मुलगी वर्षा संदीप जाधव (वय 22 वर्ष) आणि दुसरी मुलगी स्वाती घाडगे (वय 18 वर्ष) यांच्यावरही हल्ला केला. संबंधित बातमी : बीडमध्ये बँक अधिकाऱ्याच्या घरावर सशस्त्र दरोडा, दाम्पत्याची हत्या
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सावधान! 'या' जिल्ह्यात कोसळणार सर्वात जास्त पाऊस, पंजाबराव डखांचा अंदाज काय?
सावधान! 'या' जिल्ह्यात कोसळणार सर्वात जास्त पाऊस, पंजाबराव डखांचा अंदाज काय?
Sunny Leone Net Worth : ना आयटम साँग, ना कोणता चित्रपट; तरीही 'या' अभिनेत्रीकडे आहे 115 कोटींची संपत्ती
ना आयटम साँग, ना कोणता चित्रपट; तरीही 'या' अभिनेत्रीकडे आहे 115 कोटींची संपत्ती
पावसामुळे मुंबई मेट्रो ठप्प, वादळी वाऱ्याने वाहतूक विस्कळीत; विमानसेवेतही अचानक बदल
पावसामुळे मुंबई मेट्रो ठप्प, वादळी वाऱ्याने वाहतूक विस्कळीत; विमानसेवेतही अचानक बदल
Congress on PM Modi : अडवाणी, मुरली मनोहर जोशीप्रमाणे मोदींनाही 75 वर्षानंतर राजकारणातून निवृत्त करणार का? काँग्रेसच्या बड्या नेत्याचा सवाल
अडवाणी, जोशींप्रमाणे पीएम मोदींनाही 75 वर्षानंतर राजकारणातून निवृत्त करणार का? काँग्रेसचा सवाल
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 04 PM : 13 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सBaramati Strong Room CCTV : बारामतीमधील स्ट्रॉगरुममधील सीसीटीव्ही 45 मिनिटानंतर सुरु :ABP MajhaWare Nivadnukiche Superfast News:लोकसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे : 13 May 2024ABP Majha Headlines : 02 PM : 13 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सावधान! 'या' जिल्ह्यात कोसळणार सर्वात जास्त पाऊस, पंजाबराव डखांचा अंदाज काय?
सावधान! 'या' जिल्ह्यात कोसळणार सर्वात जास्त पाऊस, पंजाबराव डखांचा अंदाज काय?
Sunny Leone Net Worth : ना आयटम साँग, ना कोणता चित्रपट; तरीही 'या' अभिनेत्रीकडे आहे 115 कोटींची संपत्ती
ना आयटम साँग, ना कोणता चित्रपट; तरीही 'या' अभिनेत्रीकडे आहे 115 कोटींची संपत्ती
पावसामुळे मुंबई मेट्रो ठप्प, वादळी वाऱ्याने वाहतूक विस्कळीत; विमानसेवेतही अचानक बदल
पावसामुळे मुंबई मेट्रो ठप्प, वादळी वाऱ्याने वाहतूक विस्कळीत; विमानसेवेतही अचानक बदल
Congress on PM Modi : अडवाणी, मुरली मनोहर जोशीप्रमाणे मोदींनाही 75 वर्षानंतर राजकारणातून निवृत्त करणार का? काँग्रेसच्या बड्या नेत्याचा सवाल
अडवाणी, जोशींप्रमाणे पीएम मोदींनाही 75 वर्षानंतर राजकारणातून निवृत्त करणार का? काँग्रेसचा सवाल
डुकराची किडनी बसवलेल्या पहिल्या रुग्णाचा मृत्यू,दोन महिन्यापूर्वीच झालं होतं ऑपरेशन
डुकराची किडनी बसवलेल्या पहिल्या रुग्णाचा मृत्यू,दोन महिन्यापूर्वीच झालं होतं ऑपरेशन
Maharashtra Rain : सावधान! येत्या काही तासात नाशिक, पालघरसह 'या' भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा
सावधान! येत्या काही तासात नाशिक, पालघरसह 'या' भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा
Maharashtra Police Bharti : पोलिस भरतीमध्ये मोठी अपडेट; 'त्या' उमेदवारांना पोलिस अधीक्षक कार्यालयात हमीपत्र देण्याची सूचना
पोलिस भरतीमध्ये मोठी अपडेट; 'त्या' उमेदवारांना पोलिस अधीक्षक कार्यालयात हमीपत्र देण्याची सूचना
वादळ वारं सुटलं गं.. रायगडमध्ये अवकाळी, नाशिक, पालघर, पुणे घाटात पुढील 3-4 तासांत पावसाच्या सरी
वादळ वारं सुटलं गं.. रायगडमध्ये अवकाळी, नाशिक, पालघर, पुणे घाटात पुढील 3-4 तासांत पावसाच्या सरी
Embed widget