वडील सोबत असण्याचा आनंद कोणत्याच सणाला भेटणार नाही, वडीलांच्या आठवणीने वैभवी देशमुख भावूक
वडील सोबत असण्याचा आनंद कुठल्याच सणाला भेटणार नाही असे म्हणत वडील नसताना दिवाळी कशी गेली याबाबतच्या भावना दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख यांनी व्यक्त केल्या.
Beed : एका मागून एक सण येत गेला तसा दिवाळीचा सणही गेला. वडील सोबत असण्याचा आनंद कुठल्याच सणाला भेटणार नाही असे म्हणत वडील नसताना दिवाळी कशी गेली याबाबतच्या भावना दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख (Vaibhavi Deshmukh) हिने व्यक्त केल्या आहेत. तर आम्हाला कुठल्याच सणाला काही करण्याची इच्छा नाही आम्ही एकमेकांना बळ देत आहोत आम्हाला फक्त न्याय घ्यायचा आहे असे म्हणत भाऊ धनंजय देशमुख यांनी आपले दुःख व्यक्त केले आहे.
वडील सोबत असण्याचा आनंद आम्हाला इथून पुढच्या सणाला भेटणार नाही
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेनंतर देशमुख परिवाराची दिवाळी कशी गेली याबाबत वैभवी देशमुख आणि धनंजय देशमुख यांच्या सोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी भावना व्यक्त केल्या आहेत. एका मागून एक सण गेले तसा दिवाळीचा सणही गेला, वडील सोबत असण्याचा आनंद आम्हाला इथून पुढच्या सणाला भेटणार नाही असे मत वैभवी देशमुखने व्यक्त केले. ज्यावेळेस पासून आमचे वडील गेले त्यावेळेस पासून घरात आनंद राहिला नाही. आज आम्ही वडिलांच्या न्यायाच्या प्रतीक्षेत आहोत असे मत वैभवी देशमुखने व्यक्त केले.
माझ्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी शिक्षण घेत आहे
वडील असताना वडील गल्लीतील लहान मुल आम्ही सर्वजण जाऊन फटाके आणत होतो. यावर्षी गावात फटाक्याचा आवाज क्वचितच ऐकायला मिळाला. इथून पुढे दिवाळीचा आनंद भेटणार नाही असेही वैभवी देशमुख म्हणाली. सध्या सुट्टी आहे आणि माझ्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी शिक्षण घेत आहे. माझ्या वडिलांना लवकरात लवकर न्याय मिळावा अशी आमची अपेक्षा असल्याचे मत वैभवी देशमुखने व्यक्त केले. शरद पवार साहेबांची भेट घेतल्यावर त्यांच्यासोबत आम्ही या प्रकरणाच्या सुनावणी बाबतची चर्चा केल्याची माहिती वैभवी देशमुखने दिली आहे. अन्याय झाला आहे आम्हाला न्याय घ्यायचा आहे असेही ते म्हणाले.
आमचं आकाशाएवढं सुख हीरावून घेतलं : धनंजय देशमुख
दिवाळीच नाही तर कुठलाच क्षण भावाच्या आठवणीशिवाय जात नाही. आमचं आकाशाएवढं सुख हीरावून घेतलं आहे. आम्हाला कुठल्याच सणाला काही करण्याची इच्छा नाही आम्ही एकमेकांना बळ देत आहोत.असे मत दिवंगतसंतोष देशमख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी व्यक्त केले. आम्ही सगळे दिवाळीत लवकर उठत असू मात्र भाऊ लवकर उठत नव्हता, सगळ्या गावातील लहान लेकरांना फटाके वाटत होता. आमच्या घरी दिवाळीनिमित्त फराळ आणि अल्पोपार देत होता असेही धनंजय देशमुख म्हणाले. 28 तारखेच्या सुनावणीत या प्रकरणात आरोप निश्चिती होईल असा विश्वास आहे. कृष्णा आंधळे प्रकरण व्हायच्या आधी दोन वर्षे फरार होता. मात्र, तो इथेच फिरत होता. या प्रकरणात तो फरार असल्यापासून प्रशासन त्याला का शोधत नाही? हे सगळे अनुत्तरीत प्रश्न आहेत असे धनंजय देशमुख यांनी व्यक्त केले.


















