एक्स्प्लोर

Beed News : बेकायदेशीर प्रॅक्टिस, स्त्री भ्रूणहत्येतील दोषी डॉ. सुदाम मुंडेला जामीन

Beed News : न्यायालयाच्या अटींचं उल्लंघन करुन बेकायदेशीर प्रॅक्टिस केल्याच्या प्रकरणात बीडमधील डॉ. सुदाम मुंडेला जामीन मंजूर झाला आहे. औरंगाबाद खंडपीठाने त्याला जामीन दिला.

बीड : राज्यभर गाजलेल्या परळीच्या अवैध गर्भपात प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या डॉक्टर सुदाम मुंडे याला न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. काही महिन्यापूर्वी सुदाम मुंडेने न्यायालयाच्या अटीचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि त्याला अटक करण्यात आली होती, मात्र याच गुन्ह्यात डॉक्टर सुदाम मुंडेला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने जामीन मंजूर केला आहे.

अवैध गर्भपात केल्याप्रकरणी डॉक्टर सुदाम मुंडेला सुरुवातीला दहा वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली होती. उच्च न्यायालयाने सुदाम मुंडेला जामीन देताना पुढचे पाच वर्ष मेडिकल प्रॅक्टिस करता येणार नाही अशी अट घातली होती. मात्र जामिनावर बाहेर आल्यानंतरही सुदाम मुंडेने लगेचच परळीच्या बाजूलाच रामनगर इथे एक हॉस्पिटल सुरु केलं होतं. जेलमधून बाहेर आल्यानंतर पुन्हा एकदा डॉक्टर सुदाम मुंडे लोकांवर उपचार करु लागला. लोक त्याच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी जाऊ लागले आहे. मात्र या हॉस्पिटलची पुन्हा प्रशासनाकडे तक्रार येऊ लागल्या. त्यानंतर बीडच्या जिल्हा प्रशासनाने डॉक्टर सुदाम मुंडे याच्या हॉस्पिटलवर 5 सप्टेंबर 2020 रोजी छापा टाकला. त्याला अटक करुन अंबाजोगाईच्या जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केलं. 

Dr. Sudam Munde Case : डॉ. सुदाम मुंडेला चार वर्षे सक्तमजुरी व दोन हजार रुपये दंड

सरकार पक्षातर्फे साक्षीदार तपासण्यात आले. साक्षीदाराची साक्ष ग्राह्य धरुन आणि सरकारी वकिलांचा युक्तीवाद ग्राह्य धरुन न्यायालयाने फेब्रुवारी महिन्यात सुदाम मुंडेला चार वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावली होती. परंतु औरंगाबाद खंडपीठाने गुरुवारी (12 मे) त्याला जामीन मंजूर केला आहे.

स्त्रीभ्रूण हत्या करणारा कुकर्मा
स्त्रीभ्रूण हत्या आणि अवैद्य गर्भपाताचा कर्दनकाळ डॉक्टर सुदाम मुंडे याच्या पापाचा घडा 2016 रोजी भरला होता. सुदाम मुंडेच्या रुग्णालयात आलेल्या एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाला होता आणि त्यानंतर त्याच्या कृष्णकृत्याचा पर्दाफाश झाला होता. डॉ. सुदाम मुंडे यांच्या कुकर्माचा राज्यभरातून निषेध नोंदवण्यात आला होता.  डॉ. सुदाम मुंडेच्या दवाखान्यामध्ये परळीत गर्भपात करण्यासाठी केवळ राज्यातीलच नाही तर परराज्यातील देखील महिला येत असल्याचे तपासामध्ये उघड झाले होते.  या प्रकरणानंतर डॉक्टर सुदाम मुंडे याला दहा वर्षाची सक्तमजुरी सुद्धा झाली होती. मात्र त्यानंतर उच्च न्यायालयाने त्याला जामीन दिला होता.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

फडणवीसांना धक्का, अजित पवारांशी बंडखोरी; फलटणमध्ये नारळ फुटला, मोहिते पाटलांसाठी तुतारीही वाजली
फडणवीसांना धक्का, अजित पवारांशी बंडखोरी; फलटणमध्ये नारळ फुटला, मोहिते पाटलांसाठी तुतारीही वाजली
Bachchu Kadu Amravati Rada : जिंकण्यासाठी नवनीत राणा अमराववीत दंगल घडवणार, बच्चू कडूंचा गंभीर आरोप
जिंकण्यासाठी नवनीत राणा अमराववीत दंगल घडवणार, बच्चू कडूंचा गंभीर आरोप
''पार्थच्या सुरक्षेसाठी रणागाडा द्यायला पाहिजे होता, तो मोठा नेता''; रोहित पवारांचा तीव्र संताप
''पार्थच्या सुरक्षेसाठी रणागाडा द्यायला पाहिजे होता, तो मोठा नेता''; रोहित पवारांचा तीव्र संताप
Narayan Rane : नारायण राणेंच्या प्रचारपत्रकावरून बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे गायब; शिंदेंच्या शिवसैनिकांनी प्रचार थांबवला
नारायण राणेंच्या प्रचारपत्रकावरून बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे गायब; शिंदेंच्या शिवसैनिकांनी प्रचार थांबवला
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Satej Patil On Dhananjay mahadik : रात्री बारा वाजताही मी काठी घेऊन उभा! सतेज पाटलांचा इशाराSushma Andhare speech Raigad : शरद पवारांसमोर म्हणाल्या, मायच्यानसांगते, तटकरेंना गुलाल लागणार नाहीVare Nivadnukiche SuperFast News : लोकसभा निवडणुकीच्या बातम्या, वारे निवडणुकीचे 23 April 2024ABP Majha Headlines : 08 PM : 23 April 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
फडणवीसांना धक्का, अजित पवारांशी बंडखोरी; फलटणमध्ये नारळ फुटला, मोहिते पाटलांसाठी तुतारीही वाजली
फडणवीसांना धक्का, अजित पवारांशी बंडखोरी; फलटणमध्ये नारळ फुटला, मोहिते पाटलांसाठी तुतारीही वाजली
Bachchu Kadu Amravati Rada : जिंकण्यासाठी नवनीत राणा अमराववीत दंगल घडवणार, बच्चू कडूंचा गंभीर आरोप
जिंकण्यासाठी नवनीत राणा अमराववीत दंगल घडवणार, बच्चू कडूंचा गंभीर आरोप
''पार्थच्या सुरक्षेसाठी रणागाडा द्यायला पाहिजे होता, तो मोठा नेता''; रोहित पवारांचा तीव्र संताप
''पार्थच्या सुरक्षेसाठी रणागाडा द्यायला पाहिजे होता, तो मोठा नेता''; रोहित पवारांचा तीव्र संताप
Narayan Rane : नारायण राणेंच्या प्रचारपत्रकावरून बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे गायब; शिंदेंच्या शिवसैनिकांनी प्रचार थांबवला
नारायण राणेंच्या प्रचारपत्रकावरून बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे गायब; शिंदेंच्या शिवसैनिकांनी प्रचार थांबवला
Manoj Bajpayee : शेतकऱ्याचा मुलगा कसा झाला बॉलिवूड स्टार? वाचा मनोज वाजपेयीची अंगावर शहारे आणणारी संघर्षमय कहाणी
शेतकऱ्याचा मुलगा कसा झाला बॉलिवूड स्टार? वाचा मनोज वाजपेयीची अंगावर शहारे आणणारी संघर्षमय कहाणी
भाजपला का मतदान करावं?; रात्रीच्या अंधारात मराठा तरुणांनी आमदार महोदयांना घेरलं
भाजपला का मतदान करावं?; रात्रीच्या अंधारात मराठा तरुणांनी आमदार महोदयांना घेरलं
Bollywood Actress :
"त्याने मला मध्यरात्री 3 वाजता बोलावलं..."; लोकप्रिय अभिनेत्रीने सांगितला कास्टिंग काऊचचा धक्कादायक अनुभव; म्हणाली,"मी रात्रभर रडत होते"
Bollywood Movies Updates : 30 रुपयांच्या तिकिटाकडेही प्रेक्षकांची पाठ, बॉलिवूड चिंतेत; मुंबईतील थिएटरला लागलं टाळं
30 रुपयांच्या तिकिटाकडेही प्रेक्षकांची पाठ, बॉलिवूड चिंतेत; मुंबईतील थिएटरला लागलं टाळं
Embed widget