एक्स्प्लोर
Advertisement
मांजरा धरण ओव्हरफ्लो, सहा दरवाजे उघडले
बीड : मागील काही दिवसांपासून दुष्काळाची झळ सोसणाऱ्या मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांचा पाणीप्रश्न मिटला आहे. मराठवाड्यात वरुणराजाने जोरदार हजेरी लावल्याने बीडमधील मांजरा धरण ओसंडून वाहू लागलं आहे. धरण 90 टक्क्यांहून अधिक भरल्याने सहा दरवाजे पहाटे उघडले आहेत.
तब्बल सहा वर्षांनी मांजरा धरणाचे दरवाजे उघडले आहेत. याआधी 2010 मध्ये धरणाचे दरवाजे उघडले होते.
मांजरा धरणाच्या पाण्यावर तीन जिल्ह्यातील अनेक गाव अवलंबून आहेत. धरण भरल्याने या तीन जिल्ह्यातील गावांना फायदा होणार आहे. सध्या मांजरा धरणातून 147 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरु आहे.
दरम्यान, धरणाखालील मांजरा नदीकाठच्या सर्व गावांना याबाबत सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. अंबाजोगाई आणि केज या दोन्ही तहसील कार्यालयात नियंत्रण कक्ष उघडण्यात आल्याची माहिती उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी दिली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement