एक्स्प्लोर

स्त्रीभ्रूण हत्या प्रकरण : आरोपी मुंडे दाम्पत्याचा आज निकाल

मे 2012 मध्ये परळीत सुदाम मुंडेच्या हॉस्पिटलमध्ये विजयमाला पटेकर या महिलेचा बेकायदेशीर गर्भपात करताना मृत्यू झाला होता.

बीड : स्त्रीभ्रूण हत्येसारखं क्रूरकर्म करणाऱ्या बीडच्या आरोपी मुंडे दाम्पत्याचा निकाल आज लागणार आहे. बीडचं जिल्हा न्यायालय आज या प्रकरणी निकाल देणार आहे. या प्रकरणात एकूण 17 आरोपी होते. त्यापैकी जळगावच्या डॉक्टर राहुल कोल्हेचा अपघाती मृत्यू झाला होता. त्यामुळे आज उर्वरित 16 आरोपींसंदर्भात निकाल येणार आहे. मे 2012 मध्ये परळीत सुदाम मुंडेच्या हॉस्पिटलमध्ये विजयमाला पटेकर या महिलेचा बेकायदेशीर गर्भपात करताना मृत्यू झाला होता. या प्रकरणी कलम 304, 312, 314, 315 आणि 316 नुसार गुन्हा दाखल झाला होता. यात पीसीपीएनडीटी आणि एमटीबी कायद्यानुसार, सेक्शन 3A, सेक्शन 9, सेक्शन 17, सेक्शन 29  नुसार गुन्ह्याची नोंद झाली आहे. या सोबतच एमटीपी कायद्यानुसार सेक्शन 4 आणि 6 चा गुन्हा या दाम्पत्यावर दाखल झाला आहे. 2015 मध्ये परळी कोर्टाने मुंडे दाम्पत्याला वेगवेगळ्या आठ कलमांखाली प्रत्येकी सहा महिन्यांच्या कैदेची शिक्षा सुनावली होती, म्या4 वर्षाची शिक्षा सुनावली होती. म्हणजे एकूण 48 महिन्याची शिक्षा सध्या सुदाम मुंडे आणि सरस्वती मुंडे भोगत आहेत दरम्यान, या प्रकरणी महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने मुंडे दाम्पत्याचा परवाना कायमस्वरुपी रद्द केला. सुदाम मुंडेची अब्जावधींची माया सुदाम मुंडेने स्त्री भ्रूणहत्येच्या या कृष्णकृत्यातून अब्जावधीची माया जमा केली. शेतकऱ्याचा मुलगा ते अब्जाधीश हा प्रवास त्यानं नेमका केला तरी कसा... डॉक्टर सुदाम मुंडे...वय 61 वर्षे. एकनाथ मुंडे या शेतकऱ्याचा मुलगा. घरी पाच भावंडं. परळीपासून 5 किलोमीटरवरचं सारडगाव...प्राथमिक शिक्षणात चुणूक दाखवून सुदामनं औरंगाबादमधून डॉक्टरकीची पदवी मिळवली आणि परळीच्या सुभाष चौकात छोटसं क्लिनिक सुरु केलं. सुदामचं नाव पंचक्रोशीत पसरलं. यथावकाश सुदामचं स्त्रीरोग तज्ज्ञ असलेल्या सरस्वतीशी लग्न झालं. मग हळूहळू सुदामला सापडला शॉर्टकटने पैसे कमावण्याचा मार्ग. बायको सरस्वतीच्या नावाने सोनोग्राफी केंद्र सुरु केलं. सोनोग्राफी मशिनमधून गर्भ पाहायचा आणि मुलगी असली की गर्भात कत्तल करायची. मुलींची गर्भातच हत्या करुन सुदाम मुंडेकडे प्रचंड बरकत आली. त्यातून परळीच्या बस स्थानकांसमोर पाच मजली टोलेजंग हाँस्पिटल उभं राहिलं. परळी परिसरात मुंडे दाम्पत्याने थोडीथोडकी नव्हे 350 एकर जमीन वेगवेगळ्या नातलगांच्या नावावर खरेदी केल्याची चर्चा आहे. सूत्रांच्या माहितीनुसार कर्नाटक, गुजरातसह सांगली, साताऱ्यातूनही सुदाम मुंडेकडे दररोज 50 पेशंट यायचे. फी होती प्रती पेशंट 20 हजार रुपये. पेशंटच्या वाढत्या संख्येमुळे सुदाम मुंडेने चक्क प्रिस्क्रीप्शन प्रिंट करुन घेतली होती. फरार मुंडे दाम्पत्याच्या काळ्या धंद्याची चर्चा पाच वर्षापासून सुरु होती. मग प्रशासनाने त्याच्यावर आजवर कारवाई का केली नाही? सुदामच्या धंद्यांना कुणाचं राजकीय पाठबळ होतं? वैद्यनाथाचं परळी गर्भपाताचं सेंटर बनलं त्याला जबाबदार कोण? या प्रश्नाच्या उत्तरातच सुदामच्या प्रगतीचा आलेख दडला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Singer Javed Ali Struggle Story ::  स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Mumbai Rain: मुंबईकरांनो सावधान! येत्या काही तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, कोकणातही जोर वाढणार
मुंबईकरांनो सावधान! येत्या काही तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, कोकणातही जोर वाढणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दीAshish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढलाRohit Sharma Meet Family : विजयानंतर रोहित शर्मा आईवडीलांना पहिल्यांदा भेटतो तेव्हा...Ajit Pawar Special Report : बजेटवरुन टीका; अजितदादांचं सडेतोड उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Singer Javed Ali Struggle Story ::  स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Mumbai Rain: मुंबईकरांनो सावधान! येत्या काही तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, कोकणातही जोर वाढणार
मुंबईकरांनो सावधान! येत्या काही तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, कोकणातही जोर वाढणार
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
Embed widget