एक्स्प्लोर
Beed Accident : लातूर-अंबाजोगाई रस्त्यावर भीषण अपघात; चार जणांचा मृत्यू, 15 जखमी
Beed Accident Update : आज सकाळी लातूर-अंबाजोगाई (Latur- Ambajogai Road) रस्त्यावर बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. यात चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.
Beed Accident Update : आज सकाळी लातूर-अंबाजोगाई (Latur- Ambajogai Road) रस्त्यावर बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. यात चार जणांचा जागीच मृत्यू झाला तर 15 जण जखमी झाले आहेत. लातूर औरंगाबाद ही बस लातूरमधून निघाली होती तर प्लास्टिक पाईप घेऊन जाणारा ट्रक हा आंबेजोगाईहून लातूरकडे जात होता. बर्दापूर फाट्याच्या नजीक एका वळणावर हा भीषण अपघात झाला. हा अपघात नेमका कशामुळे झाला हे समजू शकले नाही मात्र हा अपघात इतका भीषण होता की जागीच चार जणांचा मृत्यू झाला आहे तर इतर 15 गंभीर जखमी झाले आहेत.
आज सकाळी साडेआठच्या सुमारास हा अपघात झाला. अंबाजोगाई – लातूर रोडवर बर्दापूर फाट्याजवळ नंदगोपाल डेअरीजवळ लातूर – औरंगाबाद बसची आणि ट्रकची समोरासमोर धडक झाली. हा अपघात एवढा भीषण होता की, क्रेनच्या साहाय्याने दोन्ही वाहने बाजूला करून जखमींना बाहेर काढावे लागले.
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदत कार्य सुरु केले असून अपघातातील जखमींना बर्दापूर आणि ‘स्वाराती’ रुग्णालयात अधिक उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सकाळच्या सुमारास झालेल्या अपघातानं एकच खळबळ उडाली.
महत्त्वाच्या बातम्या :
- Maharashtra Corona Guidelines : आजपासून पुन्हा निर्बंध; नाईट कर्फ्यूसह समारंभांवर बंधनं, काय सुरु, काय बंद- वाचा
- Reliance : अमेरिकेनंतर अंबानींची न्यूयॉर्कमध्ये नवीन मालमत्ता, पंचतारांकित मँडरिन हॉटेलची खरेदी, किंमत ऐकून व्हाल थक्क
- Winter Skin Care Tips : टोमॅटोचा असा करा वापर, हिवाळ्यातही त्वचा होईल तजेलदार
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
क्राईम
क्रीडा
Advertisement