एक्स्प्लोर

...तर बावनकुळे राज्याचे मुख्यमंत्री, गडकरींचे फडणवीसांना संकेत!

सत्ताधारी आमदार अर्थमंत्र्यांकडे कायम तक्रार करायचे की आमच्यापेक्षा जास्त निधी बावनकुळेंना कसं, त्यावेळी अर्थ मंत्री म्हणायचे की त्यांच्याकडून मागोवा घेणे शिका, या आठवणींवरही फडणवीसांनी उजाळा टाकला.

नागपूरः राज्याचे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीसच व्हावे, पण जर ते केंद्रात गेले तर राज्यात बावनकुळे हे मुख्यमंत्रीही होऊ शकतात. तसं मी म्हणत नाही. पण भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष झालेले नेते पुढे काय होतात, हे राज्यातील जनतेला माहिती आहे. असे सूचक विधान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. भाजपचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. व्यासपीठावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.

पुढे गडकरी म्हणाले, मी असं म्हणत नाही की बावनकुळे हे राज्याचे मुख्यमंत्री होतील. मात्र भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पुढे काय होतात. हे उभ्या महाराष्ट्राने बघितले आहे. त्यामुळे माध्यमांनी 'फडणवीसांना गडकरींचे संकेत' केंद्रात जाणार अशा बातम्या माझ्या नावाने खपवू नका, हिम्मत असेल तर तुमच्या नावाने चालवा, असा चिमटाही माध्यमांना त्यांनी काढला.

बावनकुळेंची विरोधकांनाही भुरळः फडणवीस

यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले, चंद्रशेखर बावनकुळे यांनी आठ कार्यकर्त्यांसोबत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांचे संघर्ष आणि कुठलेही मिळालेले काम पूर्ण करण्याची चिकाटी बघून त्यांना पक्षाने वेळोवेळी मोठ्या जबाबदाऱ्या दिल्या. दिलेल्या संधीचे सोनेही त्यांनी केले. बावनकुळेंच्या कार्यशैलीने तर विरोधकही भुरळ घातली आहे. प्रस्ताव तर कोणताही नेता सादर करतो, मात्र ते बजेटमध्ये कसे आणता येईल याचा अभ्यास बावनकुळेंना आहे. विरोधातील आमदार अर्थमंत्र्यांकडे कायम तक्रार करायचे की आमच्यापेक्षा जास्त निधी बावनकुळेंना कसं, त्यावेळी अर्थमंत्री म्हणायचे की त्यांच्याकडून मागोवा घेणे शिका, आणि प्रस्ताव सादर केल्यावर बजेटमध्ये उमटविण्यासाठी त्यांचे परीश्रम बघा, या आठवणींवरही फडणवीसांनी उजाळा टाकला.

Nitn Gadkari : 'बावनकुळे हे माणसाची बाई आणि बाईचा माणूस करु शकतात', नितीन गडकरींची तुफान बॅटिंग

पक्षश्रेष्ठींचा विश्वास सार्थ ठरवणारः बावनकुळे

माझ्या सारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला पक्षाने खूप काही दिले आहे. त्यामुळे माझे अस्तित्व हे पक्षामुळेच आहे. पक्षाने राज्याच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिली ही खूप मोठी बाबा आहे. पक्षविस्ताराच्या या संधीचा नक्कीच उपयोग करुन समाजातील प्रत्येक घटकापर्यंत हा विकास घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

Devendra Fadnavis : विरोधात असतानाही सत्ताधाऱ्यांकडून बावनकुळेंची स्तुती व्हायची, ही विदर्भातील प्रत्येक नागरिकासाठी अभिमानाची बाब

सत्कार सहोळ्यापूर्वी तिरंगा रॅली

सत्कार सोहळ्यापूर्वी नागपुरातील त्रिशरण चौक ते शताब्दी चौकापर्यंत आज काढण्यात आलेल्या तिरंगा रॅलीत सहभाग घेतला. यामध्ये केंद्रीयमंत्री नितीनजी गडकरी,  उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, नागपूर शहर भाजपाध्यक्ष आमदार प्रविण दटके, जिल्हाध्यक्ष अरविंद गजभिये, आमदार मोहन मते, माजी महापौर दयाशंकर तिवारी, माजी आमदार डॉ. मिलिंद माने, माजी आमदार गिरीश व्यास, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश मानकर यांच्यासह शहर, जिल्हा भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शाळेतील हजारो विद्यार्थी उपस्थित होते.

Azadi Ka Amrit Mahotsav : आपल्या स्वाभिमानाचं प्रतीक तिरंगा हा प्रत्येक घरावर लागलाच पाहिजे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरकरांना आवाहन

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
Pune Crime: क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  10 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Raut Full PC : मोदींच्या सभेत फक्त पाच हजार लोकं होती; त्यातील निम्मे भाड्याची माणसंABP Majha Headlines :  9 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सDevendra Fadnavis  : मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही - देवेंद्र फडणवीस

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
Pune Crime: क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक गौप्यस्फोट, म्हणाले, 'शरद पवारांच्या पत्रामुळेच महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागली'
त्यावेळी आम्ही शरद पवारांच्या सूचनेनुसार वागत होतो; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक गौप्यस्फोट
Ramdas Kadam: आदित्य ठाकरेंची औकाद काय? पुन्हा सत्ता आल्यावर दिशा सालियन प्रकरणाची चौकशी लावणारच: रामदास कदम
आदित्य ठाकरे तुमची औकाद काय? रामदास कदम संतापाने लालबुंद होत म्हणाले, तुझी चौकशी....
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
Raj Thackeray: रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
Embed widget