एक्स्प्लोर

निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसला आणखी एक झटका, माजी मंत्री सोपलांचा लवकरच शिवसेना प्रवेश?

भाजपा-शिवसेना युतीच्या जागावाटप नुसार बार्शी विधानसभेची जागा शिवसेनेकडे येते. त्यामुळे आमदार दिलीप सोपल हे शिवसेनेचे शिवबंधन लवकरच हातात बांधणार असल्याचे बोलले जात आहे.

सोलापूर : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला अजून मोठा झटका बसण्याची दाट शक्यता आहे. कारण, माजी पाणीपुरवठामंत्री आणि बार्शी मतदार संघाचे राष्ट्रवादीचे आमदार दिलीप सोपल लवकरच शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे. कारण, उमेदवार निवड प्रक्रियेत मुलाखतीला दांडी मारल्यानंतर सोपल यांनी पक्षाच्या बैठकीकडेही पाठ फिरवली आहे. इतकंच नाही तर त्यांनी बार्शीमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावाही घेतला. कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन आठ दिवसांत भूमिका स्पष्ट करणार असल्याचं सोपल यांनी म्हटलंय. तर दुसरीकडे इगतपुरीच्या काँग्रेस आमदार निर्मला गावित या देखील शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी गावित यांना शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी निमंत्रण दिल्याचं समजतं आहे. गावित यांच्याकडून सध्या कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाही. मात्र, कार्यकर्त्यांशी चर्चा करुन लवकरच निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे. बार्शी विधानसभा । बार्शी तिथं कुणाची व्हणार सरशी, 'साहेब' की 'भाऊ' कोण मारणार बाजी? आपल्या कार्यकर्त्यांच्या भावना आपण समजावून घेणार असून आठ दिवसात आपण आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचं सोपल यांनी सांगितलं आहे. आधी राष्ट्रवादी पक्षाचे नेते अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या राष्ट्रवादी पक्षाच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीला आमदार दिलीप सोपल यांनी दांडी मारली होती. आता मुंबईच्या बैठकीला दांडी मारून आपल्या समर्थक कार्यकर्त्यांचा निर्धार मेळावा घेतला. भाजपा-शिवसेना युतीच्या जागावाटप नुसार बार्शी विधानसभेची जागा शिवसेनेकडे येते. त्यामुळे आमदार दिलीप सोपल हे शिवसेनेचे शिवबंधन लवकरच हातात बांधणार असल्याचे बोलले जात आहे. आमदार दिलीप सोपल यांचे कट्टर विरोधक असलेले माजी आमदार राजेंद्र राऊत हे शिवसेनेतून भाजपमध्ये गेल्याने दिलीप सोपल यांचा मार्ग मोकळा झाला आहे. 'निर्धार मेळाव्याच्या माध्यमातून मी कार्यकर्त्यांची भावना समजून घेणार आहे आणि लवकरच कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवणार हे जाहीर करणार' असल्याची प्रतिक्रिया यावेळी दिलीप सोपल यांनी दिली.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंबई महापालिकेचा कबुतरांबाबत मोठा निर्णय, चार ठिकाणी नियंत्रित खाद्य टाकता येणार
मुंबई महापालिकेचा कबुतरांबाबत मोठा निर्णय, चार ठिकाणी नियंत्रित खाद्य टाकता येणार
DRI ची मोठी कारवाई, मुंबई विमानतळावर 47 कोटी रुपयांचे कोकेन जप्त; महिलेसह 5 जणांना अटक
DRI ची मोठी कारवाई, मुंबई विमानतळावर 47 कोटी रुपयांचे कोकेन जप्त; महिलेसह 5 जणांना अटक
Rohit Arya : मुलांना ओलिस ठेवणाऱ्या रोहित आर्यचा एन्काऊंटर फेक की रियल? पोस्टमॉर्टम झालं, आता रिपोर्ट येणार
मुलांना ओलिस ठेवणाऱ्या रोहित आर्यचा एन्काऊंटर फेक की रियल? पोस्टमॉर्टम झालं, आता रिपोर्ट येणार
Rohit Arya : मन वळवण्यासाठी पोलिसांनी शपथ घेतली, पायाही पडले, बाथरुमच्या खिडकीतून स्टुडिओत गेले; रोहित आर्यच्या एन्काऊंटरची इनसाईट स्टोरी
मन वळवण्यासाठी पोलिसांनी शपथ घेतली, पायाही पडले, बाथरुमच्या खिडकीतून स्टुडिओत गेले; रोहित आर्यच्या एन्काऊंटरची इनसाईट स्टोरी
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Mumbai Hostage Crisis: 'पोलिसांनी मुलांची शपथ घेतली', Powai स्टुडिओतील थरारनाट्याची इनसाइड स्टोरी!
Powai Hostage Crisis: 'चुकीच्या हालचालीने आग लावेन', पैसे थकवल्याने Rohit Arya ने उचलले टोकाचे पाऊल
Sanjay Raut Health: 'प्रकृतीत गंभीर बिघाड', Sanjay Raut दोन महिने राजकारणातून बाहेर; PM Modi म्हणाले 'लवकर बरे व्हा'.
Maharashtra Politics: 'पुढच्या आठवड्यात आचारसंहिता, निधी मिळणार नाही', Ajit Pawar यांचा इशारा
Rohit Arya Death: मृत्यूचं गूढ वाढलं! तीन डॉक्टरांकडून दोन तास शवविच्छेदन, संपूर्ण प्रक्रियेचं व्हिडीओ रेकॉर्डिंग

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबई महापालिकेचा कबुतरांबाबत मोठा निर्णय, चार ठिकाणी नियंत्रित खाद्य टाकता येणार
मुंबई महापालिकेचा कबुतरांबाबत मोठा निर्णय, चार ठिकाणी नियंत्रित खाद्य टाकता येणार
DRI ची मोठी कारवाई, मुंबई विमानतळावर 47 कोटी रुपयांचे कोकेन जप्त; महिलेसह 5 जणांना अटक
DRI ची मोठी कारवाई, मुंबई विमानतळावर 47 कोटी रुपयांचे कोकेन जप्त; महिलेसह 5 जणांना अटक
Rohit Arya : मुलांना ओलिस ठेवणाऱ्या रोहित आर्यचा एन्काऊंटर फेक की रियल? पोस्टमॉर्टम झालं, आता रिपोर्ट येणार
मुलांना ओलिस ठेवणाऱ्या रोहित आर्यचा एन्काऊंटर फेक की रियल? पोस्टमॉर्टम झालं, आता रिपोर्ट येणार
Rohit Arya : मन वळवण्यासाठी पोलिसांनी शपथ घेतली, पायाही पडले, बाथरुमच्या खिडकीतून स्टुडिओत गेले; रोहित आर्यच्या एन्काऊंटरची इनसाईट स्टोरी
मन वळवण्यासाठी पोलिसांनी शपथ घेतली, पायाही पडले, बाथरुमच्या खिडकीतून स्टुडिओत गेले; रोहित आर्यच्या एन्काऊंटरची इनसाईट स्टोरी
अकोल्यात शिंदेंना दे धक्का; शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश, हर्षवर्धन सपकाळांकडून स्वागत
अकोल्यात शिंदेंना दे धक्का; शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश, हर्षवर्धन सपकाळांकडून स्वागत
मोठी बातमी! महाराष्ट्र केसरी पैलवान सिकंदर शेखला अटक; अवैध शस्त्र तस्करीप्रकरणात कारवाई
मोठी बातमी! महाराष्ट्र केसरी पैलवान सिकंदर शेखला अटक; अवैध शस्त्र तस्करीप्रकरणात कारवाई
ड्रायव्हरच निघाला सूत्रधार; व्यापाऱ्याच्या 25 लाख रुपयांच्या लुटीचा 48 तासात उलगडा, पोलिसांनी अशी फत्ते केली मोहिम
ड्रायव्हरच निघाला सूत्रधार; व्यापाऱ्याच्या 25 लाख रुपयांच्या लुटीचा 48 तासात उलगडा, पोलिसांनी अशी फत्ते केली मोहिम
ICC Women's World Cup Final: 'जर टीम इंडियाने वर्ल्डकप जिंकला तर आम्ही...', मेगा फायनलला काही तास बाकी असतानाच बीसीसीआयची मोठी घोषणा! चाहते सुद्धा नक्की खूश होतील
'जर टीम इंडियाने वर्ल्डकप जिंकला तर आम्ही...', मेगा फायनलला काही तास बाकी असतानाच बीसीसीआयची मोठी घोषणा! चाहते सुद्धा नक्की खूश होतील
Embed widget