एक्स्प्लोर

Balasaheb Thorat Meet Prakash Ambedkar : बाळासाहेब थोरात प्रकाश आंबडेकरांच्या का पोहोचले? काँग्रेसकडील 'या' 4 जागांसाठी वंचित आग्रही??

Balasaheb Thorat Meet Prakash Ambedkar : बाळासाहेब थोरात वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या भेटीसाठी पोहोचले. चार जागांवर क्लॅश होत असल्याने तोडगा काढण्यासाठी भेट घेतल्याची चर्चा आहे. 

मुंबई : प्रचंड संभ्रमावस्था आणि ताठर भूमिकेमुळे महाविकास आघाडीमध्ये (Maha Vikas Aghadi) प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या वंचित बहुजन आघाडीचा (Vanchit Bahujan Aghadi) समावेश होणार की नाही याची चर्चा अजूनही सुरुच आहे. प्रकाश आंबेडकर यांच्याकडून सातत्याने घेतली जाणारी ताठर भूमिका महाविकास आघाडी सामील करण्यासाठी अडचणीचा ठरत असल्याचे बोलले जात असतानाच आज (6 मार्च) महाविकास आघाडीची अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक होत आहे. या बैठकीपूर्वी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या भेटीसाठी पोहोचले. या भेटीचा तपशील समोर आला नसला, तरी काँग्रेस आणि वंचितचा चार जागांवर क्लॅश होत असल्याने तोडगा काढण्यासाठी भेट घेतल्याची चर्चा आहे. 

'या' चार जागांवर वंचित आग्रही??

वंचितला आगामी लोकसभेला (Loksabha Election 2024) अकोला, सोलापूर, सांगली आणि नांदेड या जागा महाविकास आघाडीत काँग्रेसला (Congress) सुटल्या आहेत. त्यामुळे या जागांवर चर्चा करण्यासाठी ही भेट होती का? अशी चर्चा आहे. दुसरीकडे, महाविकास आघाडीची वरळीतील फोर सिझन हॉटेलला आज दुपारी एक वाजता महाविकास आघाडीची बैठक होत आहे. प्रकाश आंबेडकर यांना सुद्धा बैठकीचा निमंत्रण दिलं असल्याची महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माहिती दिली असली, तरी या बैठकीला ते उपस्थित राहणार का? अशीही चर्चा आहे. कारण वंचित बहुजन आघाडी संदर्भातच आजच्या बैठकीत महत्त्वपूर्ण चर्चा होणार आहे. या बैठकीला उद्धव ठाकरे, शरद पवार, बाळासाहेब थोरात, जयंत पाटील, संजय राऊत अनिल देशमुख सुद्धा उपस्थित राहणार आहेत. 

महाविकास आघाडीमध्ये जागावाटप निश्चित असले, तरी वंचित बहुजन आघाडीच्या संदर्भातील अजूनही काथ्याकूट सुरूच आहे. वंचितकडून अजून कोणत्याही प्रकारे स्पष्ट भूमिका केली जात नसल्याने नेमक्या त्यांना कोणत्या जागा हव्या आहेत या संदर्भात माहिती समोर आलेली नाही. मात्र, अकोला, सोलापूर, सांगली आणि नांदेड या जागांसाठी वंचित आग्रही असल्याचे समजते. दरम्यान या सर्व जागा महाविकास आघाडीच्या जागावाटपामध्ये काँग्रेसला सुटल्याची चर्चा आहे. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीला चार जागा सोडण्यासाठी शरद पवारांनी तयारी दर्शवली आहे. त्याचबरोबर त्यांनी सोबत आल्यास महादेव जानकर यांना सुद्धा माढाची जागा सोडण्याची तयारी दर्शवली आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Torres Scam : टोरेस गैरव्यवहाराबाबत मोठी अपडेट, मुंबईकरांना कोट्यवधींचा चुना लावणाऱ्या टोळीने बल्गेरियात थाटली दुकानं
टोरेस गैरव्यवहाराबाबत मोठी अपडेट, मुंबईकरांना कोट्यवधींचा चुना लावणाऱ्या टोळीने बल्गेरियात थाटली दुकानं
Maharashtra Weather: मुंबईतील तापमानात प्रचंड चढउतार, यंदाचा उन्हाळा भयंकर? हवामान खात्याचा इशारा
मुंबईतील तापमानात प्रचंड चढउतार, यंदाचा उन्हाळा भयंकर? हवामान खात्याचा इशारा
Zodiac Personality: 'या' 5 राशींसोबत 'दुश्मनी' घ्याल, तर पडेल महागात! चुकूनही पंगा घेऊ नका, ज्योतिषशास्त्रात म्हटलंय..
'या' 5 राशींसोबत 'दुश्मनी' घ्याल, तर पडेल महागात! चुकूनही पंगा घेऊ नका, ज्योतिषशास्त्रात म्हटलंय..
Gyanesh Kumar : ज्ञानेश कुमारांची 370 कलम रद्द करण्यात महत्त्वाची भूमिका, राम मंदिर ट्रस्ट निर्मितीमध्ये योगदान, निवडणूक आयोगातील वर्षपूर्तीपूर्वीच बढती 
मार्च 2024 मध्ये निवडणूक आयोगात दाखल, वर्षभरात मुख्य निवडणूक आयुक्त, ज्ञानेश कुमार कोण आहेत?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 8 AM TOP Headlines 8 AM 18 February 2025Suresh Dhas on Manoj Jarange : जरांगे पाटील आमचे दैवत;मी त्यांच्यावर काही बोलणार नाहीABP Majha Marathi News Headlines 7 AM TOP Headlines 7 AM 18 February 2025Gyanesh Kumar New Election Commissioner Of India :  ज्ञानेश कुमारांची मुख्य निवडणूक आयुक्तपदी निवड

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Torres Scam : टोरेस गैरव्यवहाराबाबत मोठी अपडेट, मुंबईकरांना कोट्यवधींचा चुना लावणाऱ्या टोळीने बल्गेरियात थाटली दुकानं
टोरेस गैरव्यवहाराबाबत मोठी अपडेट, मुंबईकरांना कोट्यवधींचा चुना लावणाऱ्या टोळीने बल्गेरियात थाटली दुकानं
Maharashtra Weather: मुंबईतील तापमानात प्रचंड चढउतार, यंदाचा उन्हाळा भयंकर? हवामान खात्याचा इशारा
मुंबईतील तापमानात प्रचंड चढउतार, यंदाचा उन्हाळा भयंकर? हवामान खात्याचा इशारा
Zodiac Personality: 'या' 5 राशींसोबत 'दुश्मनी' घ्याल, तर पडेल महागात! चुकूनही पंगा घेऊ नका, ज्योतिषशास्त्रात म्हटलंय..
'या' 5 राशींसोबत 'दुश्मनी' घ्याल, तर पडेल महागात! चुकूनही पंगा घेऊ नका, ज्योतिषशास्त्रात म्हटलंय..
Gyanesh Kumar : ज्ञानेश कुमारांची 370 कलम रद्द करण्यात महत्त्वाची भूमिका, राम मंदिर ट्रस्ट निर्मितीमध्ये योगदान, निवडणूक आयोगातील वर्षपूर्तीपूर्वीच बढती 
मार्च 2024 मध्ये निवडणूक आयोगात दाखल, वर्षभरात मुख्य निवडणूक आयुक्त, ज्ञानेश कुमार कोण आहेत?
Chhaava Box Office Collection Day 4: शेर शिवा का 'छावा' था... फक्त चारच दिवसांत वसूल केलं भांडवल; विक्की कौशलच्या फिल्मनं चौथ्या दिवशी किती कमावले?
शेर शिवा का 'छावा' था... फक्त चारच दिवसांत वसूल केलं भांडवल; विक्की कौशलच्या फिल्मनं चौथ्या दिवशी किती कमावले?
Mhada महिलेनं कार्यालयात उधळले पैसे; म्हाडा उपाध्यक्षांनी घेतली दखल; 20 वर्षांपूर्वीचं प्रकरण उघडकीस
महिलेनं कार्यालयात उधळले पैसे; म्हाडा उपाध्यक्षांनी घेतली दखल; 20 वर्षांपूर्वीचं प्रकरण उघडकीस
Atul Kulkarni Poem:
"लोक चिरडले जातात... लोकांची प्रेतं बनतात..."; अतुल कुलकर्णींनी रचलेली नवी कविता 'लोक-मताची डुबकी'
उच्चभ्रू वस्तीत घरातच वेश्याव्यवसाय, शेजाऱ्यांनी बाहेरुन कोंडलं; पोलिसांनी 4 तरुणींना बाहेर काढलं
उच्चभ्रू वस्तीत घरातच वेश्याव्यवसाय, शेजाऱ्यांनी बाहेरुन कोंडलं; पोलिसांनी 4 तरुणींना बाहेर काढलं
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.