एक्स्प्लोर
Advertisement
नागपुरात कन्हैया कुमारच्या गाडीवर दगडफेक
नागपूर : दिल्लीतील जवाहरलाला नेहरू विद्यापीठ अर्थात जेएनयूतील छात्र संघाचा अध्यक्ष कन्हैया कुमारच्या कारवर नागपुरात दगडफेक करण्यात आली. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी ही दगडफेक केली.
दगडफेक आणि निदर्शने करणाऱ्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त कन्हैया नागपुरात आला आहे. कन्हैया आज सकाळी नागपुरात दाखल झाला. मात्र विमानतळावरच बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. यानंतर कन्हैया ज्या बसमधून जात होता, त्या कारच्या दिशेने दगड भिरकावण्यात आला. त्यामुळे कन्हैया बसलेल्या सीटच्या बाजूची काच फुटली. मात्र सुदैवाने कन्हैयाला दुखापत झाली नाही.
बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी 'जय श्री राम'च्या घोषणा देत कन्हैया बसलेला गाडी रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन, कारवाई केली.
कन्हैया बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी दीक्षा भूमीवर जाणार आहे. त्यानंतर विद्यार्थी संघटनांच्या कार्यक्रमात सहभागी होईल.
कन्हैयाला होणारा विरोध पाहता, पोलिसांनी त्याला एक्स दर्जाची सुरक्षा दिली आहे.
9 फेब्रुवारीला दिल्लीतील जेएनयू विद्यापीठात संसद हल्ल्याचा दोषी अफजल गुरुचा स्मृतीदिन साजरा केला होता. त्यावेळी देशविरोधी घोषणा दिल्याचा आरोप कन्हैयासह काही विद्यार्थ्यांवर होता. या आरोपाखाली त्याची जेलमध्येही रवानगी झाली होती. तेव्हापासून कन्हैया देशभरात चर्चेत आहे.
संबंधित बातम्या
मनसे नेत्याकडून कन्हैयाला जेवणाचं आमंत्रण!
कन्हैया धाकट्या भावासारखा, पुण्यात सभा घेणार : कुमार सप्तर्षी
कन्हैया कुमारवर चप्पल भिरकावली
कन्हैयासह पाच विद्यार्थ्यांना जेएनयूमधून निलंबीत करण्याची शिफारस
जेएनयू कॅम्पसमध्ये कन्हैया कुमारवर हल्ला
अकाऊंटमध्ये 150 रुपये आणि कन्हैयाला मारण्यासाठी 11 लाखांचं इनाम
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
राजकारण
निवडणूक
क्रिकेट
Advertisement