Bacchu Kadu : मनोज जरांगे यांच्या आंदोलनसंदर्भात बच्चू कडूंचा सरकारला इशारा; म्हणाले ....
मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी उपोषण सुरू केले असून सरकारने सकारात्मकपणे समोर आलं पाहिजे. सरकारने त्यांना जे आश्वासन दिलं, त्यानुसार आता कारवाई करावी. अशी मागणी मागणी बच्चू कडू यांनी केलीय.
Bacchu Kadu on Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठीच्या मागणीला घेऊन मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी आजपासून पुन्हा उपोषण सुरू केले आहे. अंतरवाली-सराटी गावात ते उपोषणाला बसले असून पहिल्याच दिवशी त्यांनी एल्गार पुकारत राज्य सरकारला आणि मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीला पाठिंबा न देणाऱ्या आमदारांना थेट इशारा दिलाय. तसेच, आंदोलनास होत असलेल्या विरोधावर आणि जातीवादी म्हणून टीका करणाऱ्यांवरही त्यांनी भाष्य केलंय.
अशातच पहिल्यापासूनच मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला समर्थन करणारे प्रहार पक्षाचे सर्वेसर्वा आमदार बच्चू कडूंनीही (Bacchu Kadu) सरकारला इशारा दिला आहे. यावेळी बोलताना बच्चू कडू म्हणाले की, आजपासून मनोज जरांगे यांनी उपोषण सुरू केले. त्यामुळे सरकारने सकारात्मकपणे समोर आलं पाहिजे. सरकारने त्यांना जे आश्वासन दिलं, त्यानुसार आता कारवाई करावी. इतके सहज आणि सोपं हे प्रकरण असून सरकारने यावर ठोस भूमिकाघेत हा प्रश्न आता मार्गी लावावा, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली आहे.
दोन्हीकडे धर्म चालला, जात चालली
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला दारुण पराभवाला समोर जावे लागले आहे. या पराभवाची जबाबदारी स्वीकारून देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन पक्षसंघटनेत काम करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांच्या या घोषणेने भाजपसह (BJP) महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. याविषयी बोलताना बच्चू कडू म्हणाले की, या लोकसभेत मराठा आरक्षणाचाही फटका भाजपला बसलाय.
या निवडणुकीत मुस्लिम आणि बौद्ध समाजाचे मतं एकतर्फी काँग्रेसला गेले आणि हिंदूचे मतं भाजपला गेले. त्यामुळे दोन्हीकडे धर्म चालला, जात चालली. आपल्या हिंदुस्थानात वेगळं काहीही कराव लागत नाही. एकान भगवा झेंडा पकडला आणि दुसऱ्याने हिरवा आणि निळा पकडला. त्यामुळे यंदा केवळ जातीचे आणि धर्माचे राजकारण झाले असल्याचे मतही बच्चू कडूंनी बोलताना व्यक्त केले आहे.
अंतरवाली सराटीत मराठा आरक्षणासाठीच्या उपोषणाला सुरुवात
लोकसभा निवडणुकांनंतर आपण मराठा आरक्षणासाठीच्या उपोषणाला सुरुवात करण्याची घोषणा केलेल्या उपोषणकर्ते मनोज जरांगे यांनी आजपासून पुन्हा उपोषण सुरू केले आहे. अंतरवाली-सराटी गावात ते उपोषणाला बसले असून पहिल्याच दिवशी त्यांनी राज्य सरकारला आणि मराठा आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा न देणाऱ्या आमदारांना थेट इशारा दिलाय. तसेच, आंदोलनास होत असलेल्या विरोधावर आणि जातीवादी म्हणून टीका करणाऱ्यांवरही त्यांनी भाष्य केलं. जालना-अंबड आंदोलन झालं याठिकाणी आंदोलनासाठी कोणी परवानगी मागितली की, सरकार परवानगी नाकारत आहे, पण संविधानाने दिलेल्या अधिकाराचा वापर करत आपण आंदोलन करणारच, असे जरांगे यांनी म्हटलं होतं. त्यानुसार, त्यांनी आजपासून उपोषण सुरू केलं आहे.
इतर महत्वाच्या बातम्या