एक्स्प्लोर

Bachchu Kadu : आमच्यामुळे भाजप सत्तेत, आम्ही गुवाहाटीला गेलो नसतो तर...; बच्चू कडू थेटच बोलले

Bachchu Kadu On BJP : अचलपूर विधानसभा मतदारसंघातील विकास कामांच्या भूमिपूजन कार्यक्रमात बच्चू कडू यांनी हे वक्तव्य केले आहे. 

Bachchu Kadu On BJP : आगामी निवडणुकीच्या (Election) पार्श्वभूमीवर सत्तेत असणाऱ्या पक्षाच्या मित्र पक्षांमध्ये मोठी नाराजी पाहायला मिळत आहे. भाजपकडून (BJP) मित्र पक्षांचा वापर करून फेकून देण्यात येते असा आरोप कालच राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी केला होता. तर, आता बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. "काही लोकं म्हणतात आम्ही निधी आणला आणि आमचीच सरकार आहे. मात्र, भाजपवाले तर बाहेर बसले होते, आम्ही भाजपवाल्यांना सत्तेत आणलं. आम्ही जर गुवाहाटीला गेलो नसतो, तर तुमचं काय जमलं असतं, आमच्यामुळे तुम्ही सत्तेत आले असल्याचे बच्चू कडू म्हणाले आहेत. अचलपूर विधानसभा मतदारसंघातील (Achalpur Assembly Constituency) विकास कामांच्या भूमिपूजन कार्यक्रमात बच्चू कडू यांनी हे वक्तव्य केले आहे. 

दरम्यान यावेळी बोलतांना बच्चू कडू म्हणाले की, “ कोणत्याही पक्षाचा नेता असू द्या अचलपूर विधानसभा मतदारसंघात एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी आला का?, पण काही लोक म्हणतात हा निधी आम्हीच आणला आणि आमची सरकार आहे. भाजपवाले तर सत्तेच्या बाहेर बसले होते. आम्ही भाजप पक्षाला सत्तेत आणलं आहे. तुम्ही काय बोलणार. आम्ही जर गुवाहाटीला गेलो नसतो, तर तुमचं काय जमलं असते. आमच्यामुळेच तुम्ही सत्तेत आले आहेत, असे बच्चू कडू म्हणाले. 

भगव्या वाल्याचं सरकार तरीही भगव्या वाल्यांचे कामं होत नाही...

पुढे बोलतांना बच्चू कडू म्हणाले की, "मागील एक-दीड वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात मतदारसंघामध्ये निधी आणला आहे. सभागृहात देखील आम्ही तुमच्या-आमच्या सारख्या गोरगरीब लोकांचं दुःख मांडत असतो. गावात फिरत असतांना अनेक लोकं घरकुलाच्या मागणीसाठी समोर येतात. एकाच आधार कार्ड निघालं नाही म्हणून त्याचं ऑपरेशन होत नव्हतं. सरकार तर वरती आहे आणि खाली आहे. भगव्या वाल्यांचं सरकार आहे, मात्र तरीही भगव्या वाल्याचं ऑपरेशन होत नाही. जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन काम करावे लागते असेही" बच्चू कडू म्हणाले.

महादेव जानकर यांचीही टीका...

विशेष म्हणजे कालच महादेव जानकर यांनी देखील भाजपवर टीका केली होती. “भाजप मित्र पक्ष आणि छोट्या पक्षांचा वापर करून त्यांना फेकून देत असतो.  हे त्यांचं देशभरचं फार जुनं नातं आहे. आम्हाला त्यावेळी गरज होती म्हणून आम्ही त्यांच्याकडे गेलो होतो. कारण सेक्युलरचं नाव घेवून काँग्रेसही आम्हाला जवळ करीत नव्हती. पण आम्हाला गोपीनाथ मुंडे, देवेंद्र फडणवीस यांनी जवळ केले. त्यावेळी आमची ताकद 4 टक्क्यांची होती आणि त्यामुळे काँग्रेस सत्तेत येत होती. हे पाहता आम्हला बरोबर घेण्यात आले होते. परंतु, आता आमच्यापेक्षा मोठी माणसं आल्यामुळे छोट्या माणसांची गरज राहत नाही. भाजप आणि काँग्रेस नेत्यांचा वापर केल्यावर काढून फेकतात, असे जानकर म्हणाले. 

इतर महत्वाच्या बातम्या : 

'आम्ही होतो म्हणून भाजप सत्तेत, ज्यांच्यावर आरोप केले त्यांनाच पक्षात घेतलं, जनताच निवडणुकीत उत्तर देईल': महादेव जानकर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कुस्तीच्या मैदानाचा नवा राजा; मुख्यमंत्र्यांकडून महाराष्ट्र केसरी पै. पृथ्वीराज मोहोळला खास 'शाबासकी'
कुस्तीच्या मैदानाचा नवा राजा; मुख्यमंत्र्यांकडून महाराष्ट्र केसरी पै. पृथ्वीराज मोहोळला खास 'शाबासकी'
गाव असू नायतर मुंबई, शासकीय कार्यालयात मराठीतच बोलायचं, बोर्डही लावायचा; शासन आदेश जारी
गाव असू नायतर मुंबई, शासकीय कार्यालयात मराठीतच बोलायचं, बोर्डही लावायचा; शासन आदेश जारी
Shirdi : दोघांची हत्या, एकावर गंभीर वार केले; दुहेरी हत्याकांडाने शिर्डीत खळबळ, पोलिसांसमोरचं आव्हान वाढलं
दोघांची हत्या, एकावर गंभीर वार केले; दुहेरी हत्याकांडाने शिर्डीत खळबळ, पोलिसांसमोरचं आव्हान वाढलं
फडणवीस-शिंदे-फडणवीस; नाना पाटेकरांनी सांगितला 'नाम'चा प्रवास; गावागावात भेट देणार
फडणवीस-शिंदे-फडणवीस; नाना पाटेकरांनी सांगितला 'नाम'चा प्रवास; गावागावात भेट देणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 06 PM : 03 फेब्रुवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सAmbernath : प्रेमप्रकरण, पैसा आणि लग्नाचा तगादा, अंबरनाथच्या हत्याकांडाचा नवा अँगल समोर!Top 25 News : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा  : 03 February 2025 : 05PM : ABP MajhaABP Majha Headlines : 05 PM : 03 फेब्रुवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कुस्तीच्या मैदानाचा नवा राजा; मुख्यमंत्र्यांकडून महाराष्ट्र केसरी पै. पृथ्वीराज मोहोळला खास 'शाबासकी'
कुस्तीच्या मैदानाचा नवा राजा; मुख्यमंत्र्यांकडून महाराष्ट्र केसरी पै. पृथ्वीराज मोहोळला खास 'शाबासकी'
गाव असू नायतर मुंबई, शासकीय कार्यालयात मराठीतच बोलायचं, बोर्डही लावायचा; शासन आदेश जारी
गाव असू नायतर मुंबई, शासकीय कार्यालयात मराठीतच बोलायचं, बोर्डही लावायचा; शासन आदेश जारी
Shirdi : दोघांची हत्या, एकावर गंभीर वार केले; दुहेरी हत्याकांडाने शिर्डीत खळबळ, पोलिसांसमोरचं आव्हान वाढलं
दोघांची हत्या, एकावर गंभीर वार केले; दुहेरी हत्याकांडाने शिर्डीत खळबळ, पोलिसांसमोरचं आव्हान वाढलं
फडणवीस-शिंदे-फडणवीस; नाना पाटेकरांनी सांगितला 'नाम'चा प्रवास; गावागावात भेट देणार
फडणवीस-शिंदे-फडणवीस; नाना पाटेकरांनी सांगितला 'नाम'चा प्रवास; गावागावात भेट देणार
मुंबईच्या जेलमध्ये भेटले, प्लॅन ठरला, सांगलीत ड्रग्सचा कारखाना उघडला; सिनेस्टाईल गुन्ह्यात तिघांना अटक
मुंबईच्या जेलमध्ये भेटले, प्लॅन ठरला, सांगलीत ड्रग्सचा कारखाना उघडला; सिनेस्टाईल गुन्ह्यात तिघांना अटक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बीडमध्ये, 65 हजार लोकं येणार; जिल्ह्यातील मंत्र्यांबाबत सुरेश धसांचं मोठं वक्तव्य
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बीडमध्ये, 65 हजार लोकं येणार; जिल्ह्यातील मंत्र्यांबाबत सुरेश धसांचं मोठं वक्तव्य
महाराष्ट्रात अचानक हिमाचल प्रदेशच्या लोकसंख्येइतके मतदार आले कुठून? संसदेत राहुल गांधी आक्रमक  
महाराष्ट्रात अचानक हिमाचल प्रदेशच्या लोकसंख्येइतके मतदार आले कुठून? संसदेत राहुल गांधी आक्रमक  
साऊथ इंडस्ट्रीतील प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याने उचललं टोकाचं पाऊल; गोव्यात संपवलं जीवन
साऊथ इंडस्ट्रीतील प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याने उचललं टोकाचं पाऊल; गोव्यात संपवलं जीवन
Embed widget