'आम्ही होतो म्हणून भाजप सत्तेत, ज्यांच्यावर आरोप केले त्यांनाच पक्षात घेतलं, जनताच निवडणुकीत उत्तर देईल': महादेव जानकर
Mahadev Jankar : आम्ही होतो म्हणून भाजप सत्तेत होती. ज्या लोकांवर आरोप केले त्यांचा पक्षप्रवेश घेतला. याचे उत्तर येणाऱ्या निवडणुकीत जनताच देईल, असा टोला महादेव जानकर यांनी लगावला आहे.
Mahadev Jankar : आम्ही होतो म्हणून भाजप सत्तेत होती. आम्ही नसल्यावर बघू आता काय होतं. ज्या लोकांवर आरोप केले त्यांचा पक्षप्रवेश घेतला. याचे उत्तर येणाऱ्या निवडणुकीत जनताच देईल, असा टोला रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी भाजपला (BJP) लगावला आहे.
आज सोमवारी (दि. 12) काँग्रेसचे (Congress) ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला. यामुळे महाराष्ट्र मोठा राजकीय भूकंप घडला आहे. अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर महादेव जानकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
निवडणुकीत जनताच उत्तर देईल
महादेव जानकर म्हणाले की, अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्याबाबत मला कल्पना नाही. बातम्यांतून मला कळले. अभ्यास करून त्यावर बोलेन. जे खरे लोक आहेत ते राहतात. ज्यांना काही अडचणी आहेत, ते असे निर्णय घेत असतील. आम्ही होतो म्हणून भाजप सत्तेत होती. आम्ही नसल्यावर बघू आता काय होते. ज्या लोकांवर आरोप केले त्यांचा पक्ष प्रवेश घेतला. याचे उत्तर येणाऱ्या निवडणुकीत जनताच देईल, असे त्यांनी म्हटले आहे.
भारतात जिथे उमेदवार मिळतील तिथे लोकसभा लढवणार
लोकसभा निवडणुकीबाबत (Lok Sabha Election 2024) महादेव जानकर म्हणाले की, राष्ट्रीय समाज पक्ष भारतात जिथे उमेदवार मिळतील त्या सर्व ठिकाणी लोकसभेच्या जागा लढवणार आहे. यामध्ये उत्तर प्रदेशमधील 80, महाराष्ट्रातील 48, कर्नाटक, छत्तीसगढ या ठिकाणच्याही निवडणुका लढवणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
दीड लाखांच्या मताधिक्याने निवडून येणार
माढा आणि परभणी या ठिकाणी मी स्वतः निवडणूक लढवणार आहे. विरोधक कोणीही असला तरी दीड लाखांच्या मताधिक्याने निवडून येणार असल्याचेदेखील त्यांनी म्हटले आहे. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्याबाबत महादेव जानकर यांना विचारले असता त्यांनी 'नो कमेंट्स' असे उत्तर दिले आहे.
चव्हाणांच्या राजीनाम्याबाबत काय म्हणाले सतेज पाटील?
काँग्रेसचे विधानपरिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील म्हणाले की, अशोक चव्हाण यांच्यासारखे नेतृत्व काँग्रेसमधून जाणं हे मोठं नुकसान आहे. आम्ही तरुण काँग्रेसच्या विचारांचा झेंडा पुढे घेऊन जाऊ. अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सोडण्याची भूमिका काय याबाबत माहिती नाही. मी सकाळपासून वीस ते 22 आमदारांशी बोललो. काँग्रेस आमदार जाणार यामध्ये काहीही तथ्य नाही. राज्यात काँग्रेससाठी चांगलं वातावरण असल्यानेच आपण एकत्र लढू, अशी आमदारांची भूमिका आहे.
आणखी वाचा
BJP Plan for Rajya Sabha Election : मविआला राज्यसभेची एकही जागा न देण्याचा भाजपचा मेगाप्लॅन!