Bachchu Kadu Meets Raj Thackeray: पहिल्यांदा शेकापच्या व्यासपीठावर अन् आता बच्चू कडूंचं मराठवाड्यात कर्जमाफी यात्रेत सहभागी होण्यासाठी मनसे 'निमंत्रण'! राज ठाकरे काय म्हणाले?
Bachchu Kadu Meets Raj Thackeray: बच्चू कडू यांनी म्हटलं आहे की, राज ठाकरे यांच्या भेटीमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती सविस्तर चर्चा करण्यात आली. कर्जमाफी यात्रेसाठी औपचारिक आमंत्रण देण्यात आलं..

Bachchu Kadu Meets Raj Thackeray: प्रहार संघटनेचे अध्यक्ष माजी आमदार बच्चू कडू यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थावर निवासस्थानावर जात भेट घेतली. यावेळी बच्चू कडू यांनी राज ठाकरे यांना मराठवाड्यामध्ये काढण्यात येणाऱ्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफी यात्रेमध्ये सहभागी होण्याचा आवाहन केलं. या आवाहनानंतर राज ठाकरे यांनी सुद्धा सकारात्मक प्रतिसाद दिला. राज ठाकरे यांच्या भेटीनंतर बोलताना बच्चू कडू यांनी सांगितलं की, शेतकऱ्यांचा राज ठाकरे यांना अभ्यास आहे. मात्र, शेतकरी म्हणून शेतकरी एकत्र येत नाहीत, ही राज ठाकरे यांची खंत असल्याचं बच्चू कडू यांनी सांगितलं.
बच्चू कडूंच्या आवाहनाला राज ठाकरेंचा सकारात्मक प्रतिसाद
बच्चू कडू यांनी म्हटलं आहे की, राज ठाकरे यांच्या भेटीमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती सविस्तर चर्चा करण्यात आली. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी होणाऱ्या आगामी आंदोलनाची दिशा, धोरणे आणि मागणी मागण्या यावर राजसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली विचार मंथन करण्यात आले. मराठवाड्यातून निघणाऱ्या कर्जमाफी यात्रेसाठी राज साहेबांना औपचारिक आमंत्रण देण्यात आलं आह. त्यांनी याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी सर्व पातळ्यांवर संघर्ष करण्याचा निर्धार या भेटीतून पुन्हा अधोरेखित झाल्याचं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.
शेतकऱ्यांसाठी मुंबई, महाराष्ट्र बंद करण्यासाठी आमचा पाठिंबा असेल
या भेटीवेळी बाळा नांदगावकर सुद्धा उपस्थित होते. बाळा नांदगावकर म्हणाले की बच्चू कडूंच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी राज ठाकरे यांनी आम्हाला पाठवलं होतं. चक्काजाम आंदोलनाला देखील आमचा पाठिंबा होता. शेतकऱ्यांना मदत करण्याची राज ठाकरे यांची भावना असल्याचे बाळा नांदगावकर म्हणाले. त्यांनी पुढे सांगितले की मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आणि दिव्यांगांच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. बच्चू कडू यांनी परभणीतील पदयात्रेत सहभागी होण्याची विनंती केली आहे. याबाबत राज ठाकरे सकारात्मक आहेत. शेतकऱ्यांसाठी मुंबई महाराष्ट्र बंद करण्यासाठी आमचा पाठिंबा असेल, असंही नांदगावकर यांनी म्हटलं आहे.
शेतकऱ्यांसाठी एक दोन तास मुंबई बंद झाली पाहिजे
दुसरीकडे, बच्चू कडू यांनी आजवर मुंबई अनेक मुद्यांवर बंद होताना आम्ही पाहिली आहे. मात्र शेतकऱ्यांसाठी एक दोन तास मुंबई बंद झाली पाहिजे असं म्हटलं होतं. या पार्श्वभूमीवर बाळा नांदगावकर यांनी भूमिका मांडली. ते म्हणाले की हा शेतकऱ्यांसाठी लढा आहे. दरम्यान, राजकीय युती संदर्भात बोलताना बाळा नांदगावकर यांनी सांगितले की निवडणूक येत असतात, जात असतात प्रत्येक गोष्टीसाठी निवडणुकीतून पाहता कामा नये. सध्या विचारांची देवाण-घेवाण सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं.
इतर महत्वाच्या बातम्या























