(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मनोज जरांगेंवर आरोप करणाऱ्या अजय महाराज बारसकरांची 'प्रहार'मधून हकालपट्टी; बच्चू कडूंचा मोठा निर्णय
Ajay Maharaj Baraskar vs Manoj Jarange : मनोज जरांगे खोटारडा माणूस, रोज पलटी मारतो, त्याच्या अनेक गुप्त बैठका होतात असा आरोप गंभीर आरोप अजय महाराज बारसकर यांनी केला होता.
मुंबई : मराठा आंदोलनावरून मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्यावर आरोप करणाऱ्या अजय महाराज बारसकर (Ajay Maharaj Baraskar) यांची प्रहार पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. प्रहारचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी हा निर्णय घेतला आहे. मनोज जरांगे हे खोटं बोलतात, ते हेकेखोर आहेत, त्यांचा कारभार पारदर्शक नसून ते गुप्त मिटिंग घेतात असा आरोप अजय महाराज बारसकर यांनी केला होता. अजय बारस्कर यांची भूमिका मान्य नसून त्यांचा आता प्रहार संघटनेशी संबंध नाही असं आमदार बच्चू कडू यांनी म्हटलंय.
मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलन आणि मराठा आरक्षण विषयी कोणीही भूमिका मांडू नये असे आदेश प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि आमदार बच्चू कडू यांची प्रहार कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना दिले आहेत.
मराठा आरक्षणा विषयी बोलणारे अजय बारस्कर यांना प्रहार संघटना आणि प्रहार वारकरी संघटनेमधून बडतर्फ करण्याचा निर्णय घेतला आहे. अजय बारस्कार यांची मराठा आंदोलना विषयीची भूमिका मान्य नाही आणि त्यांचे समर्थन प्रहार करत नाही असं आमदार बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.
अजय महाराज बारसकर यांचे आरोप
मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणातील लढाईमधील महत्वाचे सदस्य असलेले अजय महाराज बारसकर यांनी जरांगेंवर तुफान हल्लाबोल केला. मनोज जरांगे हे रोज पलटी मारतात, रोज खोटं बोलतात असा आरोप बारसकर यांनी केला. अजय बारसकर यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेऊन, जरांगे पाटलांवर घणाघाती टीका केली.
अजय महाराज बारसकर काय म्हणाले? (Ajay Maharaj Baraskar on Manoj Jarange)
मी गेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढत आहे. मधल्या काळात अंतरवालीत घटना घडली आणि मी आंदोलन लढ्यात पुन्हा सहभागी झालो. मराठवाड्यात ओबीसी नोंदीसाठी मीदेखील अनेक वर्षांपासून काम करतोय. त्यामुळे जरांगे पाटील यांच्यासोबत कृतीत सहभागी झालो. मी यापूर्वी कधीच माध्यमासमोर आलो नाही. मी जरांगे यांना पाटील म्हणणार नाही. कारण जरांगेकडे पाटील पदासाठी काही नाही. तो हेकेखोर आहे, कोणत्याही शब्दावर अडून राहायचा. आमचा समाज खूप भोळा आहे.
अजय बारसकर हा सरकारचा ट्रॅप, हा भोंदू महाराज
जय बारसकर यांनी केलेल्या टीकेनंतर मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. अजय बारसकर हा सरकारचा ट्रॅप असून हा भोंदू महाराज असल्याची सडकून टीका जरांगे पाटील यांनी केली. अजय बारसकर यांनी केलेल्या आरोपांवर मनोज जरांगे पाटील यांनी हा सरकारी ट्रॅप असल्याचा आरोप केला.
ही बातमी वाचा: