एक्स्प्लोर

Bacchu Kadu : बच्चू कडूंचा राणा दाम्पत्याला टोला; म्हणाले, "फक्त पुतळा बसवल्याने..."

Bachchu Kadu: बिना परवानगी मंदिर बांधता येते, तर मग शिवरायांचा पुतळा का नाही, असे स्पष्ट मत आमदार बच्चू कडू यांनी राजापेठ उड्डाणपुलावरील शिवरायांच्या पुतळ्या संदर्भात व्यक्त केले आहे.

Amravati News अमरावती :  अमरावतीच्या (Amravati News) सामाजिक आणि राजकीय वर्तुळात गाजलेल्या राजापेठ उड्डाणपुलावर पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati shivaji maharaj) पुतळा बसवण्याची जोरदार चर्चा रंगत आहे. त्यामागील एक कारण म्हणजे काल 18 फेब्रुवारीला अवघ्या काही तासात तयार करण्यात आलेला उड्डाणपुलावरील भला मोठा उंचवटा होय. विशेष बाब म्हणजे आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी 11 जानेवारी 2022 च्या रात्री कुठलीही परवानगी न घेता यांच ठिकाणी शिवरायांचा पुतळा बसविला होता.

त्यानानंतर महानगरपालिका प्रशासनाने पोलिसांच्या मदतीने तो अनधिकृत पुतळा पोलीस बंदोबस्तात (Amravati Police) हटवला होता. त्यावरून पालिका प्रशासन आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) यांच्यात मोठा वाद निर्माण होऊन बरेच राजकारण तापले होते. आता पुन्हा त्याच ठिकाणी तयार झालेल्या ओट्यामुळे अनेक तर्क-वितर्क लावले जात आहे. या प्रकरणी आमदार बच्चू कडू यांनी प्रश्न उपस्थित करत अप्रत्यक्षपणे आमदार रवी राणा यांना टोला लगावला आहे. 

पुतळा बसविला म्हणजे मतात परिवर्तन होत नाही

राजापेठ उड्डाणपुलावर जर कोणी शिवरायांचा पुतळा बसवत असेल तर त्यात वाईट काय, पुतळा बसविण्यास कुणाची हरकत असायला कुणाला कुठलेही कारण असायला नको. आपण मंदिर तयार करताना कुणाची परवानगी न घेता बांधतो, तर मग शिवरायांचा पुतळा बिना परवानगी बसविणे त्यात काय नवल आहे. मात्र हे करत असताना शिवरायांच्या नावाने कुणी राजकारण करू नये, असे आमदार बच्चू कडू म्हणाले.

शिवरायांच्या पुतळा बसविला म्हणजे मतात परिवर्तन होईल असे होत नसते. राजकीय फायद्यासाठी असं डोकं न लावता ते भक्त आहे, अंध भक्त नाही, असा टोला देखील बच्चू कडू यांनी रवी राणा यांना लगावला आहे. पुढे ते म्हणाले, शिवरायांचा पुतळा बसविणे म्हणजे तो सन्मानानेच बसविला पाहिजे. हल्ली जय श्रीराम लोकांच्या मुखात आहे, तर श्रीराम आमच्या हृदयात आहे. हा दोघांमध्ये फरक असल्याचे देखील बच्चू कडू म्हणले.

पुतळ्याच्या वादावरून तापले होते राजकारण  

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असताना आमदार रवी राणा यांनी स्वतः अमरावतीच्या राजापेठ उड्डाणपुलावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला होता. मात्र परवानगी न घेता शिवरायांचा पुतळा बसविण्यात आल्याने अमरावती महानगरपालिकेने तो पुतळा हटवला होता. त्यानंतर रवी राणा यांनी थेट तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप करत जाणीवपूर्वक पुतळा हटवण्यात आल्याचा आरोप केला होता. तर याच कारणावरून तत्कालीन महानगरपालिका आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांच्या अंगावर रवी राणा यांच्या कार्यकर्त्यांनी शाईफेक केली होती.

या प्रकरणी रवी राणा यांच्यासह 12 ते 13 कार्यकर्त्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले होते. त्यानंतर हा वाद अमरावतीमध्ये सलग दोन महिने चालला. सोबतच या उड्डाणपुलावर दोन वर्ष सतत 24 तास पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा याच उडानपुलावर ज्या ठिकाणी पूर्वी रवी राणा यांनी पुतळा बसवला होता त्या ठिकाणी उंचवटा तयार करण्यात आल्याने पुन्हा चर्चेला उधाण आले आहे. 

इतर संबंधित बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लोकसभा निवडणुकीत 14 मतदारसंघात व्होट जिहाद, फडणवीसांचा दावा, संजय राऊतांचा जोरदार पलटवार; म्हणाले...
लोकसभा निवडणुकीत 14 मतदारसंघात व्होट जिहाद, फडणवीसांचा दावा, संजय राऊतांचा जोरदार पलटवार; म्हणाले...
Maharashtra Rainfall: महाराष्ट्रात यंदा सरासरीहून अधिक पावसाची नोंद, परतीच्या पावसाचा मुक्काम अजून किती दिवस? 
महाराष्ट्रात यंदा सरासरीहून अधिक पावसाची नोंद, परतीच्या पावसाचा मुक्काम अजून किती दिवस? 
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस मध्यरात्री एकटेच घराबाहेर पडले, स्वत: गाडी चालवत मातोश्रीवर गेले? वंचितचा खळबळनजक दावा
वंचितचा खळबळजनक दावा, देवेंद्र फडणवीस 'मातोश्री'वर जाऊन उद्धव ठाकरेंना भेटले, दाव्यात किती तथ्य?
Sarva Pitri Amavasya 2024 : 2 की 3 ऑक्टोबर? कधी आहे सर्वपित्री अमावस्या? याच दिवशी वर्षातील शेवटचं सूर्यग्रहण; अचूक तिथी, श्राद्ध वेळ जाणून घ्या
2 की 3 ऑक्टोबर? कधी आहे सर्वपित्री अमावस्या? याच दिवशी वर्षातील शेवटचं सूर्यग्रहण; अचूक तिथी, श्राद्ध वेळ जाणून घ्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  12 PM : 1 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सDeepak Sawant Meet Govinda :  माजी आरोग्यमंत्री डॉ.दीपक सावंतांकडून गोविंदाची विचारपूसCity 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 11 AM : 1 ऑक्टोबर 2024 :  ABP MajhaMVA Seat Sharing : महाविकास आघाडी याच आठवड्यात जागावाटप पूर्ण करणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लोकसभा निवडणुकीत 14 मतदारसंघात व्होट जिहाद, फडणवीसांचा दावा, संजय राऊतांचा जोरदार पलटवार; म्हणाले...
लोकसभा निवडणुकीत 14 मतदारसंघात व्होट जिहाद, फडणवीसांचा दावा, संजय राऊतांचा जोरदार पलटवार; म्हणाले...
Maharashtra Rainfall: महाराष्ट्रात यंदा सरासरीहून अधिक पावसाची नोंद, परतीच्या पावसाचा मुक्काम अजून किती दिवस? 
महाराष्ट्रात यंदा सरासरीहून अधिक पावसाची नोंद, परतीच्या पावसाचा मुक्काम अजून किती दिवस? 
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस मध्यरात्री एकटेच घराबाहेर पडले, स्वत: गाडी चालवत मातोश्रीवर गेले? वंचितचा खळबळनजक दावा
वंचितचा खळबळजनक दावा, देवेंद्र फडणवीस 'मातोश्री'वर जाऊन उद्धव ठाकरेंना भेटले, दाव्यात किती तथ्य?
Sarva Pitri Amavasya 2024 : 2 की 3 ऑक्टोबर? कधी आहे सर्वपित्री अमावस्या? याच दिवशी वर्षातील शेवटचं सूर्यग्रहण; अचूक तिथी, श्राद्ध वेळ जाणून घ्या
2 की 3 ऑक्टोबर? कधी आहे सर्वपित्री अमावस्या? याच दिवशी वर्षातील शेवटचं सूर्यग्रहण; अचूक तिथी, श्राद्ध वेळ जाणून घ्या
Maharashtra Assembly Election 2024 : मोठी बातमी : मविआचं ठरलं, दसऱ्याला जागावाटप जाहीर करणार, 250 जागांवर एकमत!
मोठी बातमी : मविआचं ठरलं, दसऱ्याला जागावाटप जाहीर करणार, 250 जागांवर एकमत!
Govinda Gunfire: गोविंदाच्या गुडघ्यातून डॉक्टरांनी बंदुकीची गोळी काढली; प्रचंड रक्तस्राव, नेमकं घडलं काय?
गोविंदाच्या गुडघ्यातून डॉक्टरांनी बंदुकीची गोळी काढली; प्रचंड रक्तस्राव, नेमकं घडलं काय?
ऐश्वर्याला झालाय 'हा' आजार, सारखं वाढतंय वजन? सोशल मीडियावर दावा, नेटकरी म्हणाले,
दुर्धर आजारानं ग्रस्त ऐश्वर्या, सारखं वाढतंय वजन? नेटकरी म्हणाले, "अच्छा, म्हणूनच अभिषेकसोबत घटस्फोट..."
Weekly Lucky Zodiacs : पुढचे 7 दिवस 5 राशींसाठी ठरणार चमत्कारी; उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले, वेळोवेळी धनलाभाचे संकेत
पुढचे 7 दिवस 5 राशींसाठी ठरणार चमत्कारी; उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले, अपार धनलाभाचे संकेत
Embed widget