एक्स्प्लोर

Amravati News: राजापेठ उड्डापुलावर पुन्हा शिवरायांचा पुतळा बसणार?, चर्चेला उधाण, तर खुद्द आमदार रवी राणा म्हणाले की.... 

Amravati : अमरावतीच्या राजापेठ उड्डाणपुलावर परत एकदा शिवरायांचा पुतळा बसविला जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तशी जोरदार चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगत आहे.

Amravati News अमरावती : अमरावतीच्या (Amravati News) राजापेठ उड्डाणपुलावर आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी 11 जानेवारी 2022 च्या रात्री छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati shivaji maharaj) यांचा पुतळा स्थापन केला होता. मात्र तो पुतळा कुठलीही परवानगी न घेता बसविल्याने महानगरपालिका प्रशासनाने पोलिसांच्या मदतीने तो अनधिकृत पुतळा पोलीस बंदोबस्तात (Amravati Police)हटवला होता. त्यावरून पालिका प्रशासन आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) यांच्यात मोठा वाद निर्माण होऊन बरेच राजकारण तापले होते.

उद्या 19 फेब्रुवारीला सर्वत्र साजऱ्या होणाऱ्या शिवजयंतीच्या निमित्याने, त्याच ठिकाणी परत एकदा शिवरायांचा पुतळा बसवला जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तशी जोरदार चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगत आहे. सोबतच, आज एकाच दिवसात उड्डाणपुलावर उंचवटा तयार करण्यात आला आहे. मात्र अद्याप त्या उंचवट्या मागिले नेमके प्रयोजन काय हे जारी स्पष्ट नसले तरी शिवरायांच्यांच पुतळ्यासाठी ही लगबग सुरू असल्याचे बोलले जात आहे. 

पुतळ्याच्या वादावरून तापले होते राजकारण  

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असताना आमदार रवी राणा यांनी स्वतः अमरावतीच्या राजापेठ उड्डाणपुलावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला होता. मात्र परवानगी न घेता शिवरायांचा पुतळा बसविण्यात आल्याने अमरावती महानगरपालिकेने तो पुतळा हटवला होता. त्यानंतर रवी राणा यांनी थेट तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप करत जाणीवपूर्वक पुतळा हटवण्यात आल्याचा आरोप केला होता. तर याच कारणावरून तत्कालीन महानगरपालिका आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांच्या अंगावर रवी राणा यांच्या कार्यकर्त्यांनी शाईफेक केली होती. या प्रकरणी रवी राणा यांच्यासह 12 ते 13 कार्यकर्त्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले होते. त्यानंतर हा वाद अमरावतीमध्ये सलग दोन महिने चालला. सोबतच या उड्डाणपुलावर दोन वर्ष सतत 24 तास पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा याच उडानपुलावर ज्या ठिकाणी पूर्वी रवी राणा यांनी पुतळा बसवला होता त्या ठिकाणी उंचवटा तयार करण्याचे काम आज सकाळ पासून चालू आहे.

शिवरायांचा पुतळा बसणार तर पूर्ण परवानगी घेऊनच 

याबत महानगरपालिका प्रशासनाला विचारले असता, त्यांनी राजापेठ उडान पुलावर ट्राफिक आयलँड निर्मिती सुरू असल्याचे म्हटले आहे. तर पोलिसांनी सुद्धा या ठिकाणी पुतळा बसणार नाही, असं सांगितलं आहे. दुसरीकडे याबाबत खुद्द आमदार रवी राणा यांना विचारले असता ते म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसणार तर पूर्ण परवानगी घेऊनच बसवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केल. मात्र या ठिकाणी मध्यरात्री शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवला जाणार, अशी जोरदार चर्चा सध्या परिसरात सुरू असून  राणा दाम्पत्याच्या कार्यकर्त्यांकडून त्याला सोशल मीडियावर दुजोरा देण्यात येत आहे. त्यामुळे आगामी काळात या ठिकाणी शिवरायांचा पुतळा बसणार की नाही याबत साऱ्यांना उत्सुकता लागली आहे. 

इतर संबंधित बातम्या 

एबीपी माझाच्या स्थापनेपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Crime News :  मास्क घालून एका दुचाकीवरून बाजीराव रोडवर आले; तरूणाच्या डोक्यात अन् तोडांवर वार, पुण्यात भरदुपारी रस्त्यावर नेमकं काय घडलं?
मास्क घालून एका दुचाकीवरून बाजीराव रोडवर आले; तरूणाच्या डोक्यात अन् तोडांवर वार, पुण्यात भरदुपारी रस्त्यावर नेमकं काय घडलं?
हेच खरं प्रेम... अर्धांगवायु झालेल्या प्रेयसीच्या आयुष्यातील खरा 'हिरो'; सोलापूरची रिअल लव्हस्टोरी साऊथच्या 70 मिमि पडद्यावर
हेच खरं प्रेम... अर्धांगवायु झालेल्या प्रेयसीच्या आयुष्यातील खरा 'हिरो'; सोलापूरची रिअल लव्हस्टोरी साऊथच्या 70 मिमि पडद्यावर
चक दे इंडिया... मुंबई विमानतळावर विश्वविजेत्या टीम इंडियाचं दणक्यात स्वागत, लेकींना मानवंदना,पाहा फोटो
चक दे इंडिया... मुंबई विमानतळावर विश्वविजेत्या टीम इंडियाचं दणक्यात स्वागत, लेकींना मानवंदना,पाहा फोटो
Chhattisgarh Train Accident : छत्तीसगडमध्ये पॅसेंजर- मालगाडीची समोरासमोर धडक, सहा प्रवाशी ठार, रेल्वेचे अनेक डबे रुळावरून खाली
छत्तीसगडमध्ये पॅसेंजर- मालगाडीची समोरासमोर धडक, सहा प्रवाशी ठार, रेल्वेचे अनेक डबे रुळावरून खाली
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sangli Politics: 'खासदारांचे जास्त मनावर घेऊ नका, ते अपक्ष आहेत', Jayant Patil यांचा Vishal Patil यांना टोला
Washim News : प्रशिक्षण, शेतमाल विक्री केंद्राची इमारत झालीय पांढरा हत्ती
Maharashtra Civic Polls: 'युती की स्वबळ?'; निवडणुकीआधीच BJP ची फिल्डिंग
Vote Jihad: 'उद्धव ठाकरेंना एका खानाला Mumbai वर लादायचं आहे', Ashish Shelar यांचा गंभीर आरोप
Pre-Poll Vigilance: 'गुंड, समाजकंटकांबरोबर शक्तिप्रदर्शन करू नका', Dhule पोलिसांचा इशारा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Crime News :  मास्क घालून एका दुचाकीवरून बाजीराव रोडवर आले; तरूणाच्या डोक्यात अन् तोडांवर वार, पुण्यात भरदुपारी रस्त्यावर नेमकं काय घडलं?
मास्क घालून एका दुचाकीवरून बाजीराव रोडवर आले; तरूणाच्या डोक्यात अन् तोडांवर वार, पुण्यात भरदुपारी रस्त्यावर नेमकं काय घडलं?
हेच खरं प्रेम... अर्धांगवायु झालेल्या प्रेयसीच्या आयुष्यातील खरा 'हिरो'; सोलापूरची रिअल लव्हस्टोरी साऊथच्या 70 मिमि पडद्यावर
हेच खरं प्रेम... अर्धांगवायु झालेल्या प्रेयसीच्या आयुष्यातील खरा 'हिरो'; सोलापूरची रिअल लव्हस्टोरी साऊथच्या 70 मिमि पडद्यावर
चक दे इंडिया... मुंबई विमानतळावर विश्वविजेत्या टीम इंडियाचं दणक्यात स्वागत, लेकींना मानवंदना,पाहा फोटो
चक दे इंडिया... मुंबई विमानतळावर विश्वविजेत्या टीम इंडियाचं दणक्यात स्वागत, लेकींना मानवंदना,पाहा फोटो
Chhattisgarh Train Accident : छत्तीसगडमध्ये पॅसेंजर- मालगाडीची समोरासमोर धडक, सहा प्रवाशी ठार, रेल्वेचे अनेक डबे रुळावरून खाली
छत्तीसगडमध्ये पॅसेंजर- मालगाडीची समोरासमोर धडक, सहा प्रवाशी ठार, रेल्वेचे अनेक डबे रुळावरून खाली
कोण आहे ते कॉन्ट्रॅक्टर, उभं करा त्याला ? मुख्यमंत्र्यांकडून ठेकेदारांची खरडपट्टी, व्हिडिओ व्हायरल
कोण आहे ते कॉन्ट्रॅक्टर, उभं करा त्याला ? मुख्यमंत्र्यांकडून ठेकेदारांची खरडपट्टी, व्हिडिओ व्हायरल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 नोव्हेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 नोव्हेंबर 2025 | मंगळवार
Video: तळपायाची आग मस्तकात गेली; निवडणूक आयुक्तांचा व्हिडिओ पाहून संतापले राज ठाकरे, महाराष्ट्राला आवाहन
Video: तळपायाची आग मस्तकात गेली; निवडणूक आयुक्तांचा व्हिडिओ पाहून संतापले राज ठाकरे, महाराष्ट्राला आवाहन
Election Commission : शौचालयात नोंदवलेला मतदार कुठला, राज ठाकरेंचा प्रश्न, निवडणूक आयोगाचं उत्तर ऐका!
शौचालयात नोंदवलेला मतदार कुठला, राज ठाकरेंचा प्रश्न, निवडणूक आयोगाचं उत्तर ऐका!
Embed widget