एकाच झाडाला डझनभर गोगलगायी; रात्रीतून पिकं करतायत फस्त, शेतकऱ्यांची चिंता वाढवणारा व्हिडीओ
Aurangabad Snail Issue Farmers : अपेक्षित पाऊस झाला नाही, त्यातच आता गोगलगायीच्या प्रादुर्भावमुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडले आहेत.
Aurangabad Snail Issue Farmers : औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यात बऱ्यापैकी सोयाबीनचा (Soybeans) पेरा आहे. अधून- मधून पडलेल्या पावसावर (Rain) सोयाबीनही जोमात आले आहेत. मात्र, सध्या रात्री अचानकपणे सोयाबीन पिकांवर गोगलगायी (Snail) हल्ला करताना पाहायला मिळत आहे. एकाच झाडाला तब्बल डझनभर गोगलगायी हल्ला करताना दिसत आहे. त्यामुळे पिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान होताना दिसत आहे. आधीच अपेक्षित पाऊस झाला नाही, त्यातच आता गोगलगायीच्या प्रादुर्भावमुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडले आहेत.
औरंगाबाद तालुक्यातील रामवाडी या शिवारातील सोयाबीन पिकावर गोगलगायीचे आक्रमण होत आहे. शेबी गोगलगायीच्या आक्रमणाची ही पहिलीच वेळ आहे. या गोगलगायी रात्रीतून पिके फस्त करीत आहेत. त्यामुळे, सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत. तर, गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळं सोयाबीन पिवळं पडलं आहे. यंदा पावसा अभावी पिकं जळू लागली आहे. तर, दुसरीकडे जिल्ह्यातील सोयाबीनचा गोगलगाय फडशा पाडत असल्यानं शेतकऱ्यांपुढं मोठ संकट निर्माण झालं आहे. त्यामुळे, शासनाने गोगलगायीनी केल्या सोयाबीनचे नुकसानीचे पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
चिंता वाढवणारा व्हिडीओ
गोगलगायीच्या रात्रीच्या हल्ल्याचे काही व्हिडीओ समोर आले आहेत. ज्यात एका सोयाबीनच्या झाडावर डझनभर गोगलगायी आक्रमण करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे, प्रत्येक झाडावर तेवढ्याच गोगलगायी आहेत. त्यामुळे एवढ्या मोठ्याप्रमाणात गोगलगायी हल्ला करत असल्याने रात्रीतून पिकाचे होत्याचं नव्हतं अशी परिस्थिती झाली आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्याप्रमाणात या गोगलगायी कोठून येतायत असा प्रश्न उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे, अनेक उपाययोजना करूनही गोगलगायीवर नियंत्रण मिळवणे शक्य होत नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. तर, कृषी विभागाकडून देखील यासाठी कोणतेही हालचाली होत नसून, शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळत नसल्याचा आरोप शेतकरी करत आहेत.
एकाच झाडाला डझनभर गोगलगायी; रात्रीतून पिकं करतायत फस्त, शेतकरी दुहेरी संकटात@abpmajhatv pic.twitter.com/Q7tXJERxhk
— Mosin Shaikh (@mosinKS) August 20, 2023
शेतकऱ्यांवर दुहेरी संकट...
यंदा पावसाने उशिरा हजेरी लावली. त्यात मागील काही दिवसांपासून पावसाने पाठ फिरवल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. अपेक्षित पाऊस पडत नसल्याने अनेक पिके माना टाकत आहेत. तर, सोयाबीन पिवळे पडत आहे. त्यामुळे पिकांना वाचवण्यासाठी शेतकरी धडपड करत आहेत. एकीकडे असे संकट असताना, दुसरीकडे गोगलगायीचे संकट उभं राहिल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी केली जात आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या: