एक्स्प्लोर
Advertisement
सोलापुरात एमआयएमच्या रॅलीवर हल्ला, राष्ट्रवादीवर आरोप
सोलापूर : सोलापुरात एमआयएमच्या प्रचार रॅलीत कार्यकर्त्यांवर हल्ला केल्याची घटना घडली असून यात एमआयएमचे तीन कार्यकर्ते जखमी झाले आहेत. राजकीय वैमनस्यातून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला केल्याचा आरोप एमआयएमने केला आहे.
सोलापुरातील अमन चौकात पदयात्रा सुरु असताना हा हल्ला करण्यात आला. कार्यकर्त्यांच्या बाचाबाचीत काही पोलिस कर्मचारीही जखमी झाल्याची माहिती आहे. उपचारासाठी जखमींना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
एमआयएमच्या रॅलीमध्ये प्रचंड गर्दी होती. तसंच एमआयएमचा उमेदवार आणि राष्ट्रवादीचा उमेदवार यांच्यात एका प्रभागातून अटीतटीची लढत होणार आहे. त्यामुळे एमआयएमच्या रॅलीला मिळालेला प्रतिसाद पाहून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला, असा आरोप एमआयएमने केला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
राजकारण
कोल्हापूर
बातम्या
Advertisement