एक्स्प्लोर
राणेंनी त्याच वेळी अभ्यास करायला हवा होता : आशिष शेलार
मुंबईः नारायण राणे यांना विनंती आणि सल्ला आहे की, त्यांनी योग्य वेळी योग्य अभ्यास केला असता तर आज आरक्षणासाठी लढाई लढावी लागली नसती, असा टोला भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी लगावला आहे.
काँग्रेस नेते नारायण राणे यांनी आज मराठा आरक्षण प्रकरणी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्र्यांवर वेळकाढूपणाचा आरोप केला. त्यानंतर आशिष शेलारांनी नारायण राणेंच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं.
वेळकाढूपणा काँग्रेस आणि राष्ट्रवादीनेच केलाः शेलार
मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाची दिशाभूल केल्याने त्यांच्यावर हक्कभंग आणणार,असा इशारा नारायण राणेंनी दिला. मात्र मुख्यमंत्री कधीही खोटं बोलत नाहीत, राणेंनी तसा ठराव आणला तर कायद्याच्या चौकटीत राहून उत्तर देऊ, असं शेलार यांनी सांगितलं.
खोट बोलणं आणि दिशाभूल करणं हे नारायण राणे यांच्या स्वभावात आहे, अशी जहरी टीकाही शेलारांनी केली.
काँग्रेस आणि राष्ट्रवादीने वेळकाढूपणा केल्यामुळे आज ही वेळ आली आहे. शिवाय काँग्रेसच आता सार्वजनिक कोल्हेकुई करत आहे, असा आरोपही शेलार यांनी केला.
संबंधित बातमीः खोटं बोलणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा : राणे
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement