एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Ashadhi Wari 2023: नामदेव महाराज आणि कैकाडी महाराजांची दिंडी पंढरपूरकडे रवाना, जाणून घ्या प्रमुख पालख्या कुठे मुक्क्कामी

Ashadhi Wari Latest news: राज्यभरातून पालख्यांनी आता पंढरपूरकडे प्रस्थान सुरू ठेवलं असून नामदेव महाराज पालखीचा आज रिंगण सोहळा पार पडला. 

Ashadhi Wari Latest news: ग्यानबा तुकारामच्या गजरात राज्यभरातील प्रमुख पालख्या पंढरपूरच्या ( Pandharpur Wari) दिशेने चालल्या आहेत. त्यामध्ये आज नामदेव महाराजांच्या पालखीने नरसी नामदेव येथून पंढरपूरकडे प्रस्थान केलं आहे. तर मनमाडहून कैकाडी महाराजांच्या दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान सुरू झालं आहे. 

निवृत्ती महाराजांची पालखी गोगलगावमध्ये तर मुक्ताबाईंची पालखी देऊळगाव राजामध्ये 

संत निवृत्तीनाथांची पालखीने (Sant Nivruttinath Palkhi) नगर जिल्ह्यात प्रवेश केला असून कालच्या पारेगाव मुक्कामानंतर दिंडीने गोगलगावकडे प्रस्थान केले आहे. तर गुरुवारी देऊळगाव मही इथे मुक्कामी असलेली मुक्ताबाईंची पालखीचं आज देऊळगाव राजाकडे प्रस्थान झाले आहे. 

संत मुक्ताबाईंसह (Sant Muktabai) संत निवृत्तीनाथांची पालखी 2 जून रोजी निघालेली असून हजारो वारकऱ्यांचा पायी प्रवासाचा आजचा सातवा दिवस आहे. दातलीच्या रिंगणानंतर संत निवृत्तीनाथांची पालखी खंबाळे येथे मुक्कामी होती. त्यानंतर पालखी खंबाळेहून निघून पुढे पारेगावला विसावली होती. आज पारेगावहून संत निवृत्तीनाथांची पालखी पुढे मार्गस्थ झाली आहे. याबरोबर दिंडीने अहमदनगर जिल्ह्यात प्रवेश केला आहे. आज पारेगावहून निघून पुढे संगनमनेर तालुक्यातील काकडवाडी मार्गे गोगलगावकडे मुक्कामी प्रस्थान करणार आहे. 

नामदेव महाराजांच्या पालखीचे प्रस्थान 

संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या पालखीने पंढरपूरकडे प्रस्थान केलंय. नामदेव महाराज यांचं जन्मगाव आसलेल्या नरसी नामदेव येथून पालखी पंढरपूरकडे निघाली आहे. पुढील 21 दिवसांचा प्रवास करून पालखी पंढरपुरात पोहोचणार आहे. पालखीचे हे 28 वे वर्ष आहे. या प्रवासादरम्यान पालखीचे 4 रिंगण सोहळे होणार आहेत. त्यातील पाहिला रिंगण सोहळा आज हिंगोलीत पार पडला.

मनमाडहून कैकाडी महाराजांच्या दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान

ज्ञानोबा माउली... तुकाराम, हरी नामाचा जयघोष, टाळमृदंगाच्या गजरात खांद्यावर भगवी पताका आणि डोक्यावर तुळशीवृंदावन घेतलेले वारकरी हातात टाळ आणि मुखात अभंग, श्री संत कैकाडी महाराज आणि श्रीसंत कोंडीराम काका यांच्या मूर्ती, पादुका असलेला बैल जोडीचा रथ आणि त्यापुढे मानाचा अश्व अशा भक्तिमय वातावरणात कैकाडी महाराजांची दिंडी पंढरपूरकडे रवाना झाली. दिंडीचे यंदाचे हे 43 वे वर्ष आहे. मनमाड शहरातून अखंडित परंपरा असलेल्या आणि श्री क्षेत्र पंढरपूरच्या पवित्र भूमीत नाशिकच्या मनमाड शहराची पताका फडकावणाऱ्या महान तपस्वी श्री. संत कैकाडी महाराज आणि श्री. संत कोंडीराम काका यांनी सुरु केलेल्या दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान झाले. रामदास महाराज यांच्या नेतृत्वाखाली  नित्यनेमाने शिवाजी नगर येथील महादेव मंदिराच्या प्रांगणातून कीर्तन प्रवचन झाल्यानंतर सजवलेल्या आणि मानाची बैलजोड असलेला रथ घेवून दिंडीने पंढरपूरकडे प्रस्थान केले.

सायकल वारी पंढरपूरकडे 

सायकल वारीने नाशिकहून पंढरपूरकडे आज पहाटे 6 वाजता प्रस्थान केले असून यंदाचे त्यांचे हे अकरावे वर्ष आहे. गोविंदनगर परिसरात जवळपास दोनशे सायकलिस्ट एकत्र आले त्यानंतर ढोल ताशाच्या तालावर हरिनामाचा जयघोष करण्यात येऊन वारीला सुरुवात झाली. यंदा विठ्ठलाचा पालखी रथही तयार करण्यात आला असून या वारीतून सायकलचे महत्व पटवून देण्यासोबतच पर्यावरण रक्षणाचाही संदेश देण्यात येतो आहे, 200 झाडे सोबत घेऊन पंढरपूरला ते वृक्षारोपण करणार आहेत. पहिल्याच दिवशी पावणे दोनशे किलोमीटर अंतर पार केल्यानंतर अहमदनगरला पहिला मुक्काम असणार आहे. 10 जूनला पंढरपूरला नाशिकसह राज्यभरातून जवळपास 4 हजार सायकलिस्ट एकत्र येणार असून 11 जूनला सकाळी प्रभात फेरी काढली जाईल आणि त्यानंतर विठूरायाचे दर्शन घेऊन रात्री सायकलिस्ट माघारी फिरतील. 

आषाढी वारीसाठी दरवर्षी महाराष्ट्रातून (Maharashtra) प्रमुख 43 पालख्या पंढरपुरात (Pandhapur) दाखल होतात. या पालख्यांमध्ये तुकोबारायांची पालखी, माऊलींची पालखी, गजानन महाराजांची पालखी, सोपानकाकांची पालखी, मुक्ताईंची पालखी या पालख्या आकर्षणाच्या केंद्रबिंदू ठरतात. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 25 November 2024 : आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
Eknath Shinde: निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde All MLA | शिवसेनेचे निवडून आलेले सर्व आमदार एकच फ्रेममध्ये!Eknath Shinde MLA Welcome | निवडून आलेल्या सर्व नवनिर्वाचित आमदारांचं शिंदेंकडून स्पेशल वेलकमDevendra Fadnavis CM? | संघाची फडणवीसांना पसंती असू शकते का? Special ReportMahayuti Ladki bahin Yojana | महायुतीसाठी लाडकी बहीण योजना ठरली गेमचेंजर! Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Horoscope Today 25 November 2024 : आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
Eknath Shinde: निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
एकाच घरात खासदारकी अन् आमदारकी, मुंबई, नांदेडसह राज्यातील 5 जोड्या; भाऊ-भाऊही विधानसभेत
एकाच घरात खासदारकी अन् आमदारकी, मुंबई, नांदेडसह राज्यातील 5 जोड्या; भाऊ-भाऊही विधानसभेत
सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर? घाई न करता व्यवस्थित निर्णय घेऊन सरकार स्थापन करणार, एक मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री पॅटर्न कायम राहणार
सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर? घाई न करता व्यवस्थित निर्णय घेऊन सरकार स्थापन करणार, केंद्राशी चर्चेनंतर अंतिम निर्णय
Rashmi Shukla Meet Devendra Fadnavis :माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
Rashmi Shukla Meet Devendra Fadnavis :माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
Rashmi Shukla : महायुतीचं सरकार येताच रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, निवडणुकीपूर्वी केलं होतं पदमुक्त
महायुतीचं सरकार येताच रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, निवडणुकीपूर्वी केलं होतं पदमुक्त
Embed widget