एक्स्प्लोर

आषाढी वारीच्या काळात पंढरपुरात सलग 10 दिवस मास विक्रीस बंदी, पालकमंत्री गोरेंची घोषणा

यंदा प्रथमच आषाढी वारीच्या इतिहासात यात्रा कालावधीतील सलग 10 दिवस पंढरपुरातील मास मटन विक्रीस बंदी करण्यात आली आहे. 

Ashadhi Wari Pandharpur :  आषाढी वारीचा (Ashadhi Wari)  सोहळा जवळ येत आहे. लाखो वारकरी पालख्यांसोबत पंढरीच्या दिशेनं आपल्या लाडक्या विठुरायाच्या भेटीसाठी मार्गस्थ होत आहेत. या काळात रस्त्यावर ठिकठिकाणी उघडपणे मास मटन विक्रीची दुकाने मार्गात लागत असतात. याशिवाय पंढरपुरात (Pandharpur)  प्रवेश करतानाही विविध मार्गावर अशी मास मटन विक्रीची दुकाने आहे. गेल्या अनेक वर्षापासून पालखी सोहळा प्रमुख आणि वारकरी संप्रदायाचे संत मंडळी यांनी यात्रा कालावधीत पंढरपूर शहरातील आणि पालखी सोहळा येताना संबंधित गावातील मास मटन विक्री बंद ठेवण्याची मागणी करत होते. अखेर त्यांच्या या मागणीला यश आलं आहे. यंदा प्रथमच आषाढी वारीच्या इतिहासात यात्रा कालावधीतील सलग 10 दिवस पंढरपुरातील मास मटन विक्रीस बंदी करण्यात आली आहे. 

पंढरपूर शहरात सलग 10 दिवस मास मटन विक्रीस पूर्णपणे बंदी 

यावर्षी पहिल्यांदाच सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना आषाढी एकादशी पूर्वी सात दिवस व एकादशीनंतर तीन दिवस पंढरपूर शहरातील मास विक्री पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश देण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्या पद्धतीने जिल्हाधिकाऱ्यांनी पंढरपूर शहरातील मास मटन विक्रीस यात्रा कालावधी मध्ये दहा दिवस पूर्णपणे बंदी घातली आहे. दरवर्षी केवळ तीन दिवस ही बंदी असायची मात्र आता वारकऱ्यांच्या आग्रही मागणीनंतर पंढरपूर शहरात सलग 10 दिवस मास मटन विक्रीस पूर्णपणे बंदी राहणार असल्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले.

ज्या गावात पालखी येईल तिथेही त्या दिवशी मास विक्रीस बंदी

दरम्यान, याच पद्धतीने पालखी मार्गावर ज्या दिवशी पालखी ज्या गावात प्रवेश करेल आणि त्या गावातून प्रस्थान ठेवेल तेवढा संपूर्ण कालावधी संबंधित गावातील मटन विक्रीस बंदी घालण्यात आलेली आहे. याचे वारकरी संप्रदायातून स्वागत होत आहे. गेल्या अनेक वर्षापासून केलेल्या मागणीला अखेर फडणवीस सरकारने मान्यता दिली आहे.

पुण्यातील दोन दिवसांच्या मुक्कामानंतर पालख्या पंढरीच्या दिशेनं मार्गस्थ

दोन दिवसांच्या मुक्कामानंतर संत तुकाराम महाराज (Sant Tukaram Maharaj Palkhi) आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी (Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi) आज पुण्यातून मार्गस्थ झाली आहे. गेले दोन दिवसा पुणेकरांनी आणि आजूबाजूच्या भागातून आलेल्या भाविकांनी पालख्यांचं दर्शन घेतलं. यानंतर दोन्ही पालख्या आता पुण्याहून निघाल्या आहेत. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी पुण्यातील विठोबा मंदिरातून सकाळी 6 वाजता मार्गस्थ झाली आहे. ज्ञानेश्वरांची पालखी आज दिवेघाटमार्गे सासवडला जाणार आहे. दुसरीकडे तुकाराम महाराज पालखीचा मुक्काम आज लोणी काळभोर येथे असणार आहे.  

महत्वाच्या बातम्या:

Ashadhi Wari 2025 : यंदाही वारकऱ्यांना टोलमाफी, पंढरपूर पालखी मार्गावर टोल नाही; टोलमाफीचे स्टिकर्स मिळवण्यासाठी नेमकी प्रक्रिया काय? 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Goregaon Fire: मुंबईत पुन्हा अग्नितांडव, गोरेगावमधील 45 मजली इमारतीला आग; मुंबईत पुन्हा अग्नितांडव, रहिवाशांना सुरक्षितस्थळी हलवले!
मुंबईत पुन्हा अग्नितांडव, गोरेगावमधील 45 मजली इमारतीला आग; मुंबईत पुन्हा अग्नितांडव, रहिवाशांना सुरक्षितस्थळी हलवले!
Bangladesh Election Result 2026: तब्बल वीस वर्षांनी बीएनपीला बांगलादेशमध्ये सत्ता, 35 वर्षांनी पुरुष पंतप्रधान लाभणार; भारताची डोकेदुखी किती वाढणार? शेख हसीनांची सत्तापालट करणाऱ्या पक्षाचं काय झालं?
तब्बल वीस वर्षांनी बीएनपीला बांगलादेशमध्ये सत्ता, 35 वर्षांनी पुरुष पंतप्रधान लाभणार; भारताची डोकेदुखी किती वाढणार? शेख हसीनांची सत्तापालट करणाऱ्या पक्षाचं काय झालं?
Pune Crime News: पत्नीसोबत वारंवार वाद; नंबर ब्लॉक, वाढदिवसाच्या दिवशी बोलण्याचा प्रयत्न पण...,मित्राला अन् पत्नीला मेसेज, मेल करून दरीत मारली उडी
पत्नीसोबत वारंवार वाद; नंबर ब्लॉक, वाढदिवसाच्या दिवशी बोलण्याचा प्रयत्न पण...,मित्राला अन् पत्नीला मेसेज, मेल करून दरीत मारली उडी
NCP Merger: राष्ट्रवादीच्या विलिनीकरणानंतर आम्ही पक्षाचं नेतृत्व अजित पवारांकडे देणार होतो; शरद पवार गटाच्या साप्ताहिकातून मोठा दावा
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणानंतर आम्ही पक्षाचं नेतृत्व अजित पवारांकडे देणार होतो; शरद पवार गटाच्या साप्ताहिकातून मोठा दावा

व्हिडीओ

Narhari Zirwal On Bribe Case : लाच प्रकरणाचा माझ्याशी संबंध सिद्ध झाला तर राजीनामा दईन
Monkey Attack School Student In Nandurbar : नंदूरबारच्या शाळेत माकडांचा उच्छाद,वनविभाग त्रासातून कधी सुटका करणार? Special Report
Ahilyanagar Saundala : जातमुक्तीच्या संकल्पातून घडलेलं आदर्शगाव 'सौंदाळा' Special Report
NCP Merger : विलिनीकरणाचा हुकलेला मुहूर्त, अजितदादांच्या नेत्यांकडून सावध भूमिका Special Report
Special Report Pune Police : बांगलादेशी तरुणीची पोलिसांकडे धाव, मदतीऐवजी महिला पोलिसाकडून विश्वासघात

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Goregaon Fire: मुंबईत पुन्हा अग्नितांडव, गोरेगावमधील 45 मजली इमारतीला आग; मुंबईत पुन्हा अग्नितांडव, रहिवाशांना सुरक्षितस्थळी हलवले!
मुंबईत पुन्हा अग्नितांडव, गोरेगावमधील 45 मजली इमारतीला आग; मुंबईत पुन्हा अग्नितांडव, रहिवाशांना सुरक्षितस्थळी हलवले!
Bangladesh Election Result 2026: तब्बल वीस वर्षांनी बीएनपीला बांगलादेशमध्ये सत्ता, 35 वर्षांनी पुरुष पंतप्रधान लाभणार; भारताची डोकेदुखी किती वाढणार? शेख हसीनांची सत्तापालट करणाऱ्या पक्षाचं काय झालं?
तब्बल वीस वर्षांनी बीएनपीला बांगलादेशमध्ये सत्ता, 35 वर्षांनी पुरुष पंतप्रधान लाभणार; भारताची डोकेदुखी किती वाढणार? शेख हसीनांची सत्तापालट करणाऱ्या पक्षाचं काय झालं?
Pune Crime News: पत्नीसोबत वारंवार वाद; नंबर ब्लॉक, वाढदिवसाच्या दिवशी बोलण्याचा प्रयत्न पण...,मित्राला अन् पत्नीला मेसेज, मेल करून दरीत मारली उडी
पत्नीसोबत वारंवार वाद; नंबर ब्लॉक, वाढदिवसाच्या दिवशी बोलण्याचा प्रयत्न पण...,मित्राला अन् पत्नीला मेसेज, मेल करून दरीत मारली उडी
NCP Merger: राष्ट्रवादीच्या विलिनीकरणानंतर आम्ही पक्षाचं नेतृत्व अजित पवारांकडे देणार होतो; शरद पवार गटाच्या साप्ताहिकातून मोठा दावा
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणानंतर आम्ही पक्षाचं नेतृत्व अजित पवारांकडे देणार होतो; शरद पवार गटाच्या साप्ताहिकातून मोठा दावा
'ते मला धाकट्या भावासारखे होते', अजित पवारांच्या निधनावर नाना पाटेकर गहिवरले, सुनेत्रा पवारांबाबत म्हणाले..
'ते मला धाकट्या भावासारखे होते', अजित पवारांच्या निधनावर नाना पाटेकर गहिवरले, सुनेत्रा पवारांबाबत म्हणाले..
Nikki Tamboli Gets Emotional As Arbaaz Patel Proposed: 'आमचा धर्म वेगळा, माझ्या वडिलांचा आमच्या नात्याला विरोध...'; अरबाजनं गुडघ्यावर बसून प्रपोज केल्यानंतर गहिवरली निक्की
'आमचा धर्म वेगळा, माझ्या वडिलांचा आमच्या नात्याला विरोध...'; अरबाजनं गुडघ्यावर बसून प्रपोज केल्यानंतर गहिवरली निक्की
मुंबईच्या सांताक्रुझमध्ये बंद खोलीत आढळला तरुणाचा मृतदेह, बोथट हत्याराने मारहाण झाल्याची माहिती, पोलिसांकडू तपास सुरु 
मुंबईच्या सांताक्रुझमध्ये बंद खोलीत आढळला तरुणाचा मृतदेह, बोथट हत्याराने मारहाण झाल्याची माहिती, पोलिसांकडू तपास सुरु 
Mrunal Thakur Shuts Down Wedding Rumours: 'आज माझी हळद अन् उद्या संगीत...'; धनुषसोबतच्या लग्नाच्या चर्चांवर प्रश्न, मृणाल ठाकूरनं थेट आमंत्रणच दिलं
'आज माझी हळद अन् उद्या संगीत...'; धनुषसोबतच्या लग्नाच्या चर्चांवर प्रश्न, मृणाल ठाकूरनं थेट आमंत्रणच दिलं
Embed widget