Ashadhi Wari 2022 : वैष्णवमय झालं पंढरपूर, वारकऱ्यांना आस विठूरायाची, विठूमाऊलीच्या भेटीसाठी संतांच्या पालख्या पंढरीच्या वेशीवर
Ashadhi Wari 2022 : जवळपास सगळ्याच पालख्या आज वाखरी मुक्कामी पोहोचल्या आहेत. उर्वरित पालख्यांचं प्रस्थान आज नेमकं कुठे आहे हे जाणून घेऊयात.
Ashadhi Wari 2022 : कोरोना काळानंतर तब्बल दोन वर्षांनी महाराष्ट्रात ठिकठिकाणी पालखी सोहळा सुरु झाला. यंदाची वारी निर्बंधमुक्त असल्यामुळे भाविकांमध्येही मोठ्या उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. 6 जूनला सुरु झालेला पालख्यांचा प्रवास जवळपास पंढरपुरात दाखल होण्याच्या मार्गावर आहेत. काही पालख्या दाखल झाल्या आहेत. जवळपास सगळ्याच पालख्या आज वाखरी मुक्कामी पोहोचल्या आहेत. उर्वरित पालख्यांचं प्रस्थान आज नेमकं कुठे आहे हे जाणून घेऊयात.
संत गजानन महाराजांची पालखीचं आज दुपारी श्री क्षेत्र मंगळवेढा येथून प्रस्थान झालं तर जवळपास 1 महिन्याचा प्रवास आज ही पालखी पंढरपूर मुक्कामी पोहोचणार आहे.
संत निवृत्तीनाथांच्या पालखीचा आजचा मुक्काम चिंचोली या ठिकाणी असणार आहे. तर उद्या चिंचोली येथून पालखी प्रस्थान करेल तर रात्री पालखी पंढरपूर मुक्कामी पोहोचणार आहे. 13 जूनला पालखीच्या प्रस्थान सोहळ्याला सुरुवात झाली होती. अखेर उद्या हा पालखीचा प्रवास पूर्ण होणार आहे. पालखीचा शेवटचा मुक्काम चिंचोली या ठिकाणी असणार आहे.
संत ज्ञानेश्वरांची पालखी आज वाखरी मुक्कामी तर उद्या पालखी पंढरपुरात दाखल होणार आहे. संत तुकारामांची पालखी आज वाखरी मुक्कामी असणार आहे. तर पालखी उद्या पंढरपुरात दाखल होणार आहे. मानाच्या पालख्यांपैकी मुक्ताई, संत गजानन महाराज पालखी, रूक्मिणी यांच्या पालख्या पंढरीत दाखल झाल्या आहेत. तर उर्वरित पालख्यांचा प्रवास उद्या पूर्ण होणार आहे.
3 जूनला सुरु झालेला पालख्यांचा हा प्रवास आता विठुरायाच्या भेटीसाठी आतुर झाला आहे. पालख्यांचा उद्या प्रवास पंढरपुरात दाखल होणार आहे. त्यामुळे प्रत्येक वारकऱ्याचा उत्साह वाढलेला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Ashadhi Wari 2022 : पंढरीचा कळस दिसला अन् वारकरी धावा करत पळाले, अशी आहे तुकाराम महाराजांच्या पालखीतील वारकऱ्यांची प्रथा
- Ashadhi Wari 2022 : चित्ररथाला विठूभक्तांचा उत्तम प्रतिसाद; विठ्ठल रखुमाईच्या दर्शनाची भक्तांना मिळतेय अनुभूती
- विठ्ठलभक्तांसाठी खुशखबर; वारकऱ्यांच्या गाड्यांना टोल माफ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा