एक्स्प्लोर
Advertisement
हुंडा घेणारे षंढ, असदुद्दीन ओवेसींचा घणाघात
लातूर : जे भारतीय आपल्या मुलाच्या लग्नात हुंडा घेतात ते षंढ आहेत. जनावर आहेत. ते खरे भारतीय नाहीत. हुंड्याची प्रथा हिंदू, मुस्लिम आणि भारतातील सर्वच समाजाला लागलेली कीड आहे, असा घणाघात एमआयएमचे सर्वेसर्वा असदुद्दीन ओवेसी यांनी केला. शिवाय, हुंडा घेऊ नका असे आवाहनही ओवेसींनी केले. लातुरात महापालिकेच्या प्रचारादरम्यान ते बोलत होते.
घरातील आर्थिक परिस्थितीला कंटाळून शेतकऱ्यांच्या मुलीने आत्महत्या केल्याचे पडसाद राज्यात उमटत आहेत. एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी हुंड्याच्या प्रथेवर जोरदार टीका केली आहे.
हुंडा घेणे हे महापाप आहे. आपण जर भारतीय असाल तर अशी पाप आपण करू नये. हिंदू, मुस्लिम या सर्वच समाजात अशी अनिष्ट प्रथा आहे. हिचा अंत झाला पाहिजे असे आवाहन त्यांनी केले आहे.
लातूरच्या भिसे वाघोली या गावात तीन दिवसापूर्वी शीतल वायाळ या मुलीने विहिरीत उडी आत्महत्या केली. पाच वर्षांची नापिकी आणि आर्थिक विवंचना यामुळे तिने हे पाऊल उचलले. वडिलांकडे तिचे लग्न करण्यासाठी पैसे नव्हते. यामुळे एका निष्पाप मुलीला जीव द्यावा लागला होता. याच घटनेवर असदुद्दीन ओवेसींनी मत व्यक्त केले.
लातूरच्या श्रद्धा मेगनशेट्टे या मुलीस पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते एक कॉर्डचे बक्षीस मिळाले. किती विटंबना आहे, दोन लाखासाठी एकीचा बळी जातोय आणि दुसरीला कोट्यावधींची कमाई, असेही ओवेसी म्हणाले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
क्रिकेट
सोलापूर
Advertisement