एक्स्प्लोर

केळी उत्पादकांना पीक विम्याच्या निकषांमुळे लाभ मिळत नसल्यामुळे मुख्यमंत्री लिहिणार केंद्राला पत्र

योजनेसंबंधी विमा हप्ते स्वीकारण्याचे काम 31 ऑक्टोबरपर्यंत सुरु राहणार आहे. त्यामुळे तातडीने विमा कंपन्यांसमवेत बैठक आयोजित करावी व चर्चा करून मार्ग काढावा असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मुंबई : केळी पिकासाठी लागू केलेल्या निकषांमुळे शेतकऱ्यांना लाभ न मिळता विमा कंपन्यांना फायदा होणार आहे या तक्रारींची दखल घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कृषी विभागाने तातडीने संबंधीत पीक विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक आयोजित करून निकष तसेच नुकसानभरपाई संदर्भात मार्ग काढण्याचे आदेश दिले आहेत. यासंदर्भात मुख्यमंत्री केंद्राला पत्र देखील लिहिणार आहेत.

आज वर्षा या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात आयोजित बैठकीत जळगावच्या केळी उत्पादक संघाच्या तक्रारी एकूण घेतल्या व यावर मार्ग काढण्यासंदर्भात आदेश दिले. बैठकीस कृषिमंत्री दादा भुसे, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, आमदार चंद्रकांत पाटील, शिरीष चौधरी, केळी उत्पादक शिष्टमंडळाचे प्रतिनिधी भागवत पाटील, रमेश पाटील यांची उपस्थिती होती. या योजनेसंबंधी विमा हप्ते स्वीकारण्याचे काम 31 ऑक्टोबरपर्यंत सुरु राहणार आहे. त्यामुळे तातडीने विमा कंपन्यांसमवेत बैठक आयोजित करावी व चर्चा करून मार्ग काढावा असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

विविध कारणांमुळे पिकांचे आणि फळपिकांचे नुकसान होते मात्र विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यात मोठा त्रास होतो. यावर केंद्राने कायमस्वरूपी उपाययोजना केली पाहिजे असेही मुख्यमंत्री म्हणाले. ही बैठक घेण्याबरोबरच एनडीआरएफच्या धर्तीवर काही प्रमाणात नुकसान भरपाई देता येते का तसेच एकूणच या पीक विम्यासंदर्भात समिती स्थापन करून त्यात तज्ज्ञांचा समावेश करावा व विम्याच्या विविध मॉडेल्सचा अभ्यास करावा यावर ही कृषी मंत्री दादा भुसे यांनी बैठकीत सूचना केली.

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी माहिती देतांना सांगितले की, जळगाव भागात केळीचा 6 कोटी रुपयांचा व्यवसाय आहे. सुमारे दीड लाख लोकांचा रोजगार यावर अवलंबून आहे. जिल्ह्यातील 4 तालुक्यात मोठ्या प्रमाणावर केळीचे उत्पादन होते. देशातील 22 टक्के केळी उतपादन जळगाव मध्ये होते. केळीसाठी पीक विम्याचे निकष बदलल्याने शेतकऱ्यांना नुकसान होणार असून यावर राज्य मंत्रिमंडळ बैठकीतही आपण मुद्दा उपस्थित केला आहे.

कृषी सचिव एकनाथ डवले यांनी प्रारंभी याविषयी माहिती दिली. केंद्राने पीक विमा ऐच्छिक केला असून आपला विमा हप्त्यातील सहभागही आणखी मर्यादित केला आहे. सध्याच्या कंपन्यांची निविदा रद्द करण्याबाबत केंद्राकडे तीनदा विनंती केली आहे मात्र त्यास मान्यता मिळाली नाही. बीड येथे देखील विमा कंपन्यांचा प्रतिसाद न मिळाल्याने एग्रीकल्चर इन्शुरन्स कम्पनी लिमिटेड यांना जिल्ह्याचा पीक विमा स्वीकारण्यासाठी भाग पाडण्यात आले. ही कंपनी पुढील तीन वर्षांसाठी करारबद्ध असणार आहे. तसेच, कंपनीवर अधिकचा बोजा पडत असल्यास तो राज्य शासनामार्फत उचलण्यात येईल, अशाच स्वरूपाचा करार केळी पिकाबाबत करता येईल का याबाबतही विचार करता येईल असे ते म्हणाले.

CM Uddhav Thackeray VS Devendra Fadnavis | केंद्राच्या मदतीवरून आजी-माजी मुख्यमंत्र्यांमध्ये 'सामना'

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

दोन भावांची भांडणं सोडवायला गेला, मध्यस्थी करणाऱ्या सचिनचाच खून झाला; आरोपीला पोलिसांनी उचचलं
दोन भावांची भांडणं सोडवायला गेला, मध्यस्थी करणाऱ्या सचिनचाच खून झाला; आरोपीला पोलिसांनी उचचलं
पुढील अडीच वर्षात काय होईल ते आज सांगता येणार नाही; सत्काराच्या भाषणात अब्दुल सत्तांरांनी सगळंच काढलं
पुढील अडीच वर्षात काय होईल ते आज सांगता येणार नाही; सत्काराच्या भाषणात अब्दुल सत्तांरांनी सगळंच काढलं
Shirdi News : नववर्षात शिर्डी संस्थानचा मोठा निर्णय; सर्वसामान्य भाविकाला थेट आरतीचा मान, साई दरबारीही पंढरीचा पॅटर्न
नववर्षात शिर्डी संस्थानचा मोठा निर्णय; सर्वसामान्य भाविकाला थेट आरतीचा मान, साई दरबारीही पंढरीचा पॅटर्न
Adani Group News: तामिळानाडू सरकारकडून स्मार्ट मीटर प्रकल्पाचं टेंडर रद्द, अदानी ग्रुपच्या कंपनीनं लावलेली सर्वात कमी दरावर बोली 
तामिळानाडू सरकारकडून स्मार्ट मीटर प्रकल्पाचं टेंडर रद्द, अदानी ग्रुपच्या कंपनीनं लावलेली सर्वात कमी दरावर बोली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Naresh Mhaske : ठाकरेंचे मुंबईतील आमदार पक्ष सोडणार? नरेश म्हस्केंचं खळबळजनक वक्तव्यRaj Thackeray On Marathi Manus : मराठी हल्ला केल्यास मराठी म्हणून अंगावर येईनDevendra Fadnavis Gadchiroli : गडचिरोलीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते विविध कामांच्या उद्धाटनCM Devendra Fadnavis Full Speech : उत्तर गडचिरोली नक्षलवाद मुक्त, फडणवीसांचं गडचिरोलीत भाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दोन भावांची भांडणं सोडवायला गेला, मध्यस्थी करणाऱ्या सचिनचाच खून झाला; आरोपीला पोलिसांनी उचचलं
दोन भावांची भांडणं सोडवायला गेला, मध्यस्थी करणाऱ्या सचिनचाच खून झाला; आरोपीला पोलिसांनी उचचलं
पुढील अडीच वर्षात काय होईल ते आज सांगता येणार नाही; सत्काराच्या भाषणात अब्दुल सत्तांरांनी सगळंच काढलं
पुढील अडीच वर्षात काय होईल ते आज सांगता येणार नाही; सत्काराच्या भाषणात अब्दुल सत्तांरांनी सगळंच काढलं
Shirdi News : नववर्षात शिर्डी संस्थानचा मोठा निर्णय; सर्वसामान्य भाविकाला थेट आरतीचा मान, साई दरबारीही पंढरीचा पॅटर्न
नववर्षात शिर्डी संस्थानचा मोठा निर्णय; सर्वसामान्य भाविकाला थेट आरतीचा मान, साई दरबारीही पंढरीचा पॅटर्न
Adani Group News: तामिळानाडू सरकारकडून स्मार्ट मीटर प्रकल्पाचं टेंडर रद्द, अदानी ग्रुपच्या कंपनीनं लावलेली सर्वात कमी दरावर बोली 
तामिळानाडू सरकारकडून स्मार्ट मीटर प्रकल्पाचं टेंडर रद्द, अदानी ग्रुपच्या कंपनीनं लावलेली सर्वात कमी दरावर बोली
राजन साळवी शिवसेनेला जय महाराष्ट्र करणार?; उद्धव ठाकरेंसोबत फोनवर चर्चा, दोन दिवसांत निर्णय
राजन साळवी शिवसेनेला जय महाराष्ट्र करणार?; उद्धव ठाकरेंसोबत फोनवर चर्चा, दोन दिवसांत निर्णय
अभिनेता एजाज खानकडून दोघांना मारहाण, व्हिडिओ व्हायरल; 31 डिसेंबरच्या 2 घटना, पोलिसांकडून दखल
अभिनेता एजाज खानकडून दोघांना मारहाण, व्हिडिओ व्हायरल; 31 डिसेंबरच्या 2 घटना, पोलिसांकडून दखल
अमेरिका हादरली,नववर्षाचा जल्लोष करणाऱ्यांना चारचाकी वाहनानं चिरडलं अन् गोळीबार,12 जणांचा मृत्यू 30 जखमी, दहशतवादी हल्ल्याचा दावा
अमेरिकेत नववर्षाचा जल्लोष करणाऱ्यांवर कार चढवली, अंदाधुंद गोळीबार,12 जणांचा मृत्यू,दहशतवादी हल्ल्याचा दावा
सरपंच हत्याप्रकरणात SIT स्थापन, IPS बसवराज तेलींसह 10 जणांची टीम; बीडमधील तपासाला वेग
सरपंच हत्याप्रकरणात SIT स्थापन, IPS बसवराज तेलींसह 10 जणांची टीम; बीडमधील तपासाला वेग
Embed widget