एक्स्प्लोर

'एक घाव दोन तुकडे होऊन जाऊदे'; शिंदे गटाच्या नेत्याचा भाजपला थेट इशारा

Mahayuti Seat Sharing Dispute : महायुतीत जागावाटपाच्या निर्णयावरून रस्सीखेच सुरु असतानाच शिंदे गटाचे नेत्याने थेट भूमिका घेण्याबाबत वक्तव्य केले आहे.

Arjun Khotkar On BJP : लोकसभा उमेदवारीवरून महायुतीमध्ये (Mahayuti) सुरु असलेली खदखद आता थेट समोर येऊ लागली आहे. 'शिवसेनेच्याच (Shiv Sena) जागेवर कशासाठी गोंधळ केला जातोय, भाजप (BJP) आमच्याच जागेवर का हट्ट करत आहेत. त्यामुळे एक घाव दोन तुकडे होऊन जाऊदे असा थेट इशारा शिंदेसेनेचे नेते अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) यांनी दिला आहे. त्यामुळे महायुतीमधील वाद (Mahayuti Dispute) टोकाला पोहचला असल्याचे दिसून येत आहे. 

'एबीपी माझा'ला प्रतिक्रिया देतांना अर्जुन खोतकर म्हणाले की, "भाजपला 20 जागा जाहीर करण्याचा  जसा अधिकार आहे, तसाच आमच्या 18 जागा जाहीर करण्याचा आम्हाला अधिकार होताच ना?, आम्ही चौकट ओलांडली नाही, पण त्यांनी उमेदवार जाहीर केले आणि आम्हाला ताटकळत ठेवलं. परभणी, संभाजीनगर, हिंगोली, धाराशिव, वाशिम आमचं आहे. मात्र, या जागेबाबत रिपोर्टचा आधार घेऊन तुम्ही माघात असाल तर हे न्यायसंगत नाही, असे खोतकर म्हणाले. 

'एक घाव दोन तुकडे होऊन जाऊदे'

नाशिकच्या जागेवर देखील आमचा विद्यमान खासदार आहे. मात्र, तिथे राष्ट्रवादीचा उमेदवार किंवा भाजपचा उमेदवार पुढे केला जातोय. माझ्यामते एक घाव दोन तुकडे व्हायला पाहिजेत. आमच्या जागेवरच का हट्ट? तुमच्या जागा आम्ही मागितल्या का? असा सवाल देखील खोतकर यांनी विचारला आहे. 

दानवे-खोतकर वाद मिटला का? 

जालना लोकसभा मतदारसंघातील (Jalna Lok Sabha Constituency) भाजप उमेदवार रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांच्याबद्दल खोतकरांच्या कार्यकर्त्यांनी मागील आठवड्यात थेट नाराजी व्यक्त केली होती. दरम्यान यावरच बोलतांना खोतकर म्हणाले की, "रावसाहेब दानवे यांच्या वागणुकीमध्ये अजून बदल होत नाहीये. मात्र, मी माझी जबाबदारी शंभर टक्के पार पाडणार. दानवे फेअर पद्धतीने वागताना दिसत नाहीयेत. तोंडावर चांगलं बोलायचं आणि माघारी वाईट बोलायचं हे चांगलं नाही. आमचा नेता एकनाथ शिंदे खंबीर सक्षम आहे. माझ्याकडून दानवेंबाबत मनोमिलन पूर्ण आहे. माझ्या मनात काहीही नाही. मी माझं 100 टक्के काम करणार, जे पहिले होतं तसं आता राहिलं नाही, असेही खोतकर म्हणाले. विशेष म्हणजे मागील लोकसभा निवडणुकीत खोतकर विरुद्ध दानवे असा थेट वाद पाहायला मिळाला होता. शेवटी पक्षश्रेष्ठींनी हस्तक्षेप केल्याने वाद मिटला होता. 

इतर महत्वाच्या बातम्या : 

Mahayuti Meeting : नाराजीनाट्यावर शिंदे, फडणवीसांसह अजित पवारांची वर्षावर मध्यरात्री बैठक; नेमकं बैठकीत काय ठरलं?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

जिल्हाधिकाऱ्यांची महसूल कर्मचाऱ्यास हिंदीतून शिवीगाळ; मंत्री उदय सामंतांसह संघटनेकडं लेखी तक्रार
जिल्हाधिकाऱ्यांची महसूल कर्मचाऱ्यास हिंदीतून शिवीगाळ; मंत्री उदय सामंतांसह संघटनेकडं लेखी तक्रार
Santosh Deshmukh Case : दोन तासांच्या विनवणीनंतर धनंजय देशमुख पाण्याच्या टाकीवरुन खाली उतरले, जरांगेंना मिठी मारत ढसाढसा रडले, म्हणाले...
दोन तासांच्या विनवणीनंतर धनंजय देशमुख पाण्याच्या टाकीवरुन खाली उतरले, जरांगेंना मिठी मारत ढसाढसा रडले, म्हणाले...
उद्विग्न धनंजय देशमुख आत्महत्येला प्रवृत्त होतात, याला कारण समस्त
धनंजय देशमुख आत्महत्येला प्रवृत्त होतात, याला कारण समस्त "आकां" चे सरताज देवेंद्र फडणवीसजी; सुषमा अंधारेंची शेलक्या शब्दात टीका
Gold Rate Today:एकीकडे रुपया कमजोर, शेअर बाजारात घसरण, दुसरीकडे सोने -चांदीच्या दरात तेजी, जाणून घ्या दर
रुपया कमजोर, बाजारात घसरण,गुंतवणूकदारांची सोने चांदीला पसंती, दरात तेजी, जाणून घ्या दर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dhananjay Deshmukh Protest : जरांगेंनी हात जोडले, एसपींनी विनंती केली;अखेर 2 तासांनी देशमुख खाली आलेDhananjay Deshmukh Beed Protest:मनोज जरांगेंच्या विनंतीला प्रतिसाद, धनंजय देशमुख टाकीवरुन खाली उतरलेDhananjay Deshmukh Beed Protest : धनंजय देशमुख यांचं पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन; मनोज जरांगे आंदोलनस्थळी दाखल100 Headlines : 100 हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जिल्हाधिकाऱ्यांची महसूल कर्मचाऱ्यास हिंदीतून शिवीगाळ; मंत्री उदय सामंतांसह संघटनेकडं लेखी तक्रार
जिल्हाधिकाऱ्यांची महसूल कर्मचाऱ्यास हिंदीतून शिवीगाळ; मंत्री उदय सामंतांसह संघटनेकडं लेखी तक्रार
Santosh Deshmukh Case : दोन तासांच्या विनवणीनंतर धनंजय देशमुख पाण्याच्या टाकीवरुन खाली उतरले, जरांगेंना मिठी मारत ढसाढसा रडले, म्हणाले...
दोन तासांच्या विनवणीनंतर धनंजय देशमुख पाण्याच्या टाकीवरुन खाली उतरले, जरांगेंना मिठी मारत ढसाढसा रडले, म्हणाले...
उद्विग्न धनंजय देशमुख आत्महत्येला प्रवृत्त होतात, याला कारण समस्त
धनंजय देशमुख आत्महत्येला प्रवृत्त होतात, याला कारण समस्त "आकां" चे सरताज देवेंद्र फडणवीसजी; सुषमा अंधारेंची शेलक्या शब्दात टीका
Gold Rate Today:एकीकडे रुपया कमजोर, शेअर बाजारात घसरण, दुसरीकडे सोने -चांदीच्या दरात तेजी, जाणून घ्या दर
रुपया कमजोर, बाजारात घसरण,गुंतवणूकदारांची सोने चांदीला पसंती, दरात तेजी, जाणून घ्या दर
Santosh Deshmukh : मुख्य सूत्रधार मोकाट, त्याला मोक्का का नाही? पोलिसांची भूमिका संशयास्पद; मस्साजोगमध्ये  महिलांनी बीड एसपींच्या अंगावर बांगड्या फेकल्या
मुख्य सूत्रधार मोकाट, त्याला मोक्का का नाही? पोलिसांची भूमिका संशयास्पद; मस्साजोगमध्ये महिलांनी बीड एसपींच्या अंगावर बांगड्या फेकल्या
Yohan Poonawalla : ना अदानी, ना अंबानी! तब्बल 22 रोल्स रॉयस एकट्याच्या ताफ्यात ठेवणारा 'भारताचा रोल्स-रॉयस किंग' माहीत आहे का?
ना अदानी, ना अंबानी! तब्बल 22 रोल्स रॉयस एकट्याच्या ताफ्यात ठेवणारा 'भारताचा रोल्स-रॉयस किंग' माहीत आहे का?
Sick Leave : सावधान... आजारी असल्याचं सांगून सुट्टी घेणाऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट, कंपन्यांकडून डिटेक्टिव्ह एजन्सीची नेमणूक
वैद्यकीय रजा घेणाऱ्यांमागं खासगी कंपन्यांकडून गुप्तहेर, नेमकं काय घडलं? कुणी घेतली अनोखी सेवा
तब्बल 60 लाख लाडक्या बहिणी बाद ठरणार, राऊतांचा दावा, तुमचंही नाव बाद होणार?
तब्बल 60 लाख लाडक्या बहिणी बाद ठरणार, राऊतांचा दावा, तुमचंही नाव बाद होणार?
Embed widget