एक्स्प्लोर

Anil Deshmukh Arrested : आरोप ते अटक... अनिल देशमुख यांच्यावर आरोप झाल्यापासून अटकेपर्यंत काय घडलं?

Anil Deshmukh Arrested : महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप... माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीकडून अटक. तब्बल 13 तास चौकशी केल्यानंतर ईडीकडून कारवाई

Anil Deshmukh Arrested : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (ANIL DESHMUKH) यांना ईडीनं अटक केली आहे. कथित 100 कोटींच्या वसुली प्रकरणात तब्बल 13 तास चौकशी केल्यानंतर ईडीनं अनिल देशमुख यांना अटक केली. आज सकाळी त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. जवळपास दोन महिने नॉट रिचेबल असलेले अनिल देशमुख काल स्वतःहून ईडी कार्यालयात दाखल झाले. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी अनिल देशमुखांवर 100 कोटी वसुलीचे आरोप लावले होते. त्या प्रकरणी ईडीच्या अधिकाऱ्यांनी देशमुखांची तेरा तास चौकशी केली. त्यानंतर रात्री दीड वाजता त्यांना अटक करण्यात आली. महाविकास आघाडीसाठी हा मोठा झटका मानला जातोय. अशातच आता अनिल देशमुखांनंतर अनिल परब यांचा नंबर, असा दावा भाजप नेते किरीट सोमय्यांनी केल्यामुळं महाविकास आघाडीच्या अडचणींमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.  

Anil Deshmukh Arrested : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीकडून अटक

अनिल देशमुख यांच्यावर आरोप झाल्यापासून अटक होईपर्यंत काय घडलं?

  • मार्च 2021 : देशमुख यांच्याविरोधात परमबीर सिंह यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र
  • 5 एप्रिल : अनिल देशमुख यांचा मंत्रिपदाचा राजीनामा
  • 10 मे : मनी लॉन्ड्रिंगच्या आरोपावरून ईडीकडून देशमुख यांच्याविरोधात गुन्हा
  • 26 जून : ईडीकडून अनिल देशमुख यांना समन्स
  • 29 जून : अनिल देशमुख यांना ईडीचं दुसरं समन्स
  • 5 जुलै : ईडीकडून अनिल देशमुख यांना तिसरं समन्स
  • 16 जुलै : अनिल देशमुख यांना ईडीचं चौथं समन्स
  • 17 ऑगस्ट : देशमुख यांना ईडीचं पाचवं समन्स
  • 2 सप्टेंबर : ईडीचं समन्स  रद्द करण्यासाठी देशमुख यांची न्यायालयात याचिका
  • 29 ऑक्टोबर : अनिल देशमुख यांची याचिका हायकोर्टानं फेटाळली

पाहा व्हिडीओ : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ED कडून अटक

वारंवार समन्स बजावल्यानंतरही अनिल देशमुख राहिले होते गैरहजर 

अनिल देशमुख यांना पाचवेळा तर त्यांचे चिरंजीव ऋषिकेश देशमुख यांना ईडीकडून वारंवार समन्स बजावण्यात आलं होतं. मात्र सुरुवातीला अनिल देशमुख यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांचा जबाब नोंदवला जाण्याची मागणी ईडीकडे केली आणि त्यानंतर प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचं कारण देत पाचही वेळा ते ईडीसमोर आले नाहीत.

पाचही वेळा अनिल देशमुख यांनी आपल्या वकिलांमार्फत ईडीला पत्र पाठवून हजर होण्यासाठी मुदत मागितली होती. मात्र अनिल देशमुख कधीच ईडीपुढे चौकशीला हजर झाले नाही. त्यातच ईडीनं त्यांच्यावरील कारवाईचा धडाका सुरुच ठेवला आहे. अनिल देशमुख आणि त्यांच्या निकटवर्तीयांच्या ठिकाणांवर छापे टाकले, तर अनिल देशमुख यांची साडेचार कोटींची संपत्ती जप्त केली. अनिल देशमुख असं म्हणाले होते की, कोर्टाचा निकाल आल्यानंतर ते ईडीसमोर हजर होतील. मात्र कोर्टानं त्यांची याचिका फेटाळून लावली, पण त्यांनतरही ते ईडीसमोर हजर झाले नाहीत..

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Kirit Somaiya on Anil Deshmukh Arrest : अनिल देशमुख यांच्यानंतर आता अनिल परब : किरीट सोमय्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

गारठाही अन् उकाडाही! राज्यात येत्या 2 दिवसांत तापमानाचा अंदाज काय? मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात..
गारठाही अन् उकाडाही! राज्यात येत्या 2 दिवसांत तापमानाचा अंदाज काय? मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात..
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Saif ali khan Attack: सैफ अली खानवर हल्ला करणारा सापडला, ठाण्यातील  लेबर कॅम्पला पोलिसांनी घेरलं, आरोपी मोहम्मद अलियानला अलगद जाळ्यात पकडलं
सैफ अली खानवर हल्ला करणारा सापडला, ठाण्यातील लेबर कॅम्पमध्ये सापळ रचून मोहम्मद अलियानच्या मुसक्या आवळल्या
Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January  2024Special Report Saif Ali Khan : करिनाचा जबाब, कोणते धागेदोरे? करिनाने सांगितला हत्येचा घटनाक्रमBeed Santosh Deshmukh Accuse CCTV : संतोष देशमुख यांच्या आरोपींचे तिरंगा हॉटेल येथिल CCTV पोलिसांच्या हातीABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 18 January  2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गारठाही अन् उकाडाही! राज्यात येत्या 2 दिवसांत तापमानाचा अंदाज काय? मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात..
गारठाही अन् उकाडाही! राज्यात येत्या 2 दिवसांत तापमानाचा अंदाज काय? मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात..
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Saif ali khan Attack: सैफ अली खानवर हल्ला करणारा सापडला, ठाण्यातील  लेबर कॅम्पला पोलिसांनी घेरलं, आरोपी मोहम्मद अलियानला अलगद जाळ्यात पकडलं
सैफ अली खानवर हल्ला करणारा सापडला, ठाण्यातील लेबर कॅम्पमध्ये सापळ रचून मोहम्मद अलियानच्या मुसक्या आवळल्या
Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Embed widget