एक्स्प्लोर

Amravati Loksabha Election : नवनीत राणांच्या विजयासाठी अमरावतीत भाजपचा मेगा प्लॅन; नेमकी रणनीती काय?

Amravati Loksabha Election : गेल्या काही दिवसापासून कायम चर्चेत आलेल्या महायुतीतील अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार खासदार नवनीत राणा यांच्यासाठी भाजपने मेगा प्लॅन आखल्याचा दावा करण्यात आला आहे.

Amravati Lok Sabha Election 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आगामी निवडणुकांमध्ये चारशे जागा निवडून आणण्याचा संकल्प केला आहे. त्यामुळे 'अबकी बार 400 पार'चा नारा देत देशभरात भाजप (BJP) मोठ्या ताकदीने मैदानात उतरल्याचे बोलले जात आहे. अशातच गेल्या काही दिवसापासून कायम चर्चेत आलेल्या महायुतीतील (Mahayuti) अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार नवनीत राणा (Navneet Rana)यांच्यासाठी भाजपने मेगा प्लॅन आखल्याचा दावा करण्यात आला आहे. अमरावतीची जागा ही सर्वात जास्त मतांनी निवडून आली पाहीजे यासाठी अमरावती भाजपने नवनीत राणासाठी मोठी रणनीती आखली आहे. 

नवनीत राणांच्या विजयासाठी भाजपचा मेगा प्लॅन

अमरावती भाजपचे अध्यक्ष प्रवीण पोटे यांच्या कार्यालयात नुकतीच भाजपची महत्त्वाची बैठक पार पडली. यावेळी भाजपचे नेते, पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. सोबतच भाजपच्या उमेदवार नवनीत राणा या देखील हजर होत्या. यावेळी भाजप नेत्यांनी एकही मतदार मतदानाच्या दिवशी घरी राहिला नाही पाहीजे, यासाठी संकल्प केला आहे. सगळ्यांनी नवनीत राणा यांच्या विजयासाठी 26 दिवस प्रचंड मेहनत करत दिवस-रात्र एक करायची आहे. तसंच 4 तारखेला नामांकन दाखल करताना जास्तीत जास्त कार्यकर्ते आणि नागरिक हजर राहतील याचं नियोजन यावेळी करण्यात आलंय.

भाजपची नेमकी रणनीती काय?

एकीकडे राज्यातील बहुचर्चित अशा अमरावती लोकसभा मतदारसंघातील महायुती मधील डोकेदुखी काही केल्या कमी होतांना दिसत नसतांना खासदार नवनीत राणांच्या प्रचारासाठी भाजप मैदानात उतल्याचे चित्र आहे. गेल्या काही दिवसापासून महायुती मधील घटक पक्ष असलेल्या प्रहारचे आमदार बच्चू कडू आणि नवनीत राणा यांच्यातील वादामुळे सध्या अमरावती लोकसभा मतदारसंघ प्रचंड चर्चेत आहे. भाजपने नुकतेच अमरावतीमधून नवनीत राणा यांना लोकसभेची उमेदवारी दिली होती. त्यानंतर नवनीत राणा (Navneet Rana) यांनी रितसर भाजपमध्ये प्रवेश केला होता. भाजपच्या या निर्णयामुळे नाराज झालेल्या बच्चू कडू यांनी प्रहार संघटनेच्यावतीने दिनेश बुब यांना अमरावतीच्या मैदानातून रिंगणात उतरवण्याची घोषणा केली आहे. 

तसेच, याठिकाणी वंचित बहुजन आघाडीने (VBA) अगोदरच उमेदवार जाहीर केला आहे. त्यामुळे अमरावतीची लोकसभा मतदारसंघाची (Amravati Loksabha) लढत रंगतदार होण्याची शक्यता आहे. अशातच आता आणखी एका बड्या नेत्याने अमरावती लोकसभेच्या रिंगणात उडी घेतली आहे. रिपब्लिकन सेनेचे सर्वेसर्वा आनंदराज आंबेडकर (Anandraj Ambedkar) यांनी शनिवारी अमरावतीमधून लोकसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केलीय.

तर, दुसरीकडे स्थानिकांचा देखील नवनीत राणांना विरोध होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे अमरावतीच्या मैदानात भाजपला विजय संपादन करणे काही अंशी जिकरीचे जाणार आहे. याच अनुषंगाने भाजपने आता प्रत्यक्ष मैदानात उतरून मोर्चे बांधणी करण्यास सुरुवात केली असल्याचे बोलले जात आहे. असे असले तरी या मतदारसंघात अमरावतीकर नेमकी कोणाला साथ देणार, हे पाहणे अधिक उत्सुकतेचे ठरणार आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

एबीपी माझाच्या स्थापनेपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Karmala : करमाळ्यात शिंदे गटाला मोठा हादरा, विधानसभेच्या उमेदवारासह 55 शाखाप्रमुख, 20 हजार शिवसैनिकांचा सामूहिक राजीनामा, सगळेच भाजपच्या वाटेवर
करमाळ्यात शिंदे गटाला मोठा हादरा, विधानसभेच्या उमेदवारासह 55 शाखाप्रमुख, 20 हजार शिवसैनिकांचा सामूहिक राजीनामा, सगळेच भाजपच्या वाटेवर
मोठी बातमी! नागपुरात भाजपच्या वार्ड अध्यक्षाची भरदिवसा हत्या, मुलाच्या वाढदिवसाचे सामना आणण्यास जाताना हल्ला
मोठी बातमी! नागपुरात भाजपच्या वार्ड अध्यक्षाची भरदिवसा हत्या, मुलाच्या वाढदिवसाचे सामना आणण्यास जाताना हल्ला
Dhule: हृदयद्रावक! आईची पोटच्या दोन्ही चिमुकल्यांना घेऊन विहिरीत उडी, 30 फुट खोल पाण्यात बुडून मृत्यू
हृदयद्रावक! आईची पोटच्या दोन्ही चिमुकल्यांना घेऊन विहिरीत उडी, 30 फुट खोल पाण्यात बुडून मृत्यू
दोन कोटी भारतीयांच्या नोकऱ्या जाऊ शकतात, AI आणि व्यापारातील अस्थिरतेमुळे मध्यमवर्गीयांसमोर मोठं संकट
दोन कोटी भारतीयांच्या नोकऱ्या जाऊ शकतात, AI आणि व्यापारातील अस्थिरतेमुळे मध्यमवर्गीयांसमोर मोठं संकट
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Mahapalikecha Mahasangram Pune गुन्हेगारीवर आळा कधी? वाहतूक कोंडी कधी सुटणार?;पालिका निवडणूक चुरशीची
Mahapalikecha Mahasangram Jalna जालन्यात व्यापाऱ्यांच्या पक्षांकडून अपेक्षा काय? कोण मारणार बाजी?
Mahapalikecha Mahasangram Mira Bhayandar : कोण मारणार मिरा-भाईंदरमध्ये बाजी? स्थानिकांना काय वाटतं?
Mahapalikecha Mahasangram Solapur : सोलापूर महापालिकेतील राजकीय गणित बदलणार? कोण बाजी मारणार?
Mahapalikecha Mahasangram Vasai Virar पालिकेत कोणाची बाजी? अनधिकृत बांधकामामुळे पालिका चर्चेत

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Karmala : करमाळ्यात शिंदे गटाला मोठा हादरा, विधानसभेच्या उमेदवारासह 55 शाखाप्रमुख, 20 हजार शिवसैनिकांचा सामूहिक राजीनामा, सगळेच भाजपच्या वाटेवर
करमाळ्यात शिंदे गटाला मोठा हादरा, विधानसभेच्या उमेदवारासह 55 शाखाप्रमुख, 20 हजार शिवसैनिकांचा सामूहिक राजीनामा, सगळेच भाजपच्या वाटेवर
मोठी बातमी! नागपुरात भाजपच्या वार्ड अध्यक्षाची भरदिवसा हत्या, मुलाच्या वाढदिवसाचे सामना आणण्यास जाताना हल्ला
मोठी बातमी! नागपुरात भाजपच्या वार्ड अध्यक्षाची भरदिवसा हत्या, मुलाच्या वाढदिवसाचे सामना आणण्यास जाताना हल्ला
Dhule: हृदयद्रावक! आईची पोटच्या दोन्ही चिमुकल्यांना घेऊन विहिरीत उडी, 30 फुट खोल पाण्यात बुडून मृत्यू
हृदयद्रावक! आईची पोटच्या दोन्ही चिमुकल्यांना घेऊन विहिरीत उडी, 30 फुट खोल पाण्यात बुडून मृत्यू
दोन कोटी भारतीयांच्या नोकऱ्या जाऊ शकतात, AI आणि व्यापारातील अस्थिरतेमुळे मध्यमवर्गीयांसमोर मोठं संकट
दोन कोटी भारतीयांच्या नोकऱ्या जाऊ शकतात, AI आणि व्यापारातील अस्थिरतेमुळे मध्यमवर्गीयांसमोर मोठं संकट
लोकांनी राहुल गांधींना गटांगळ्या खायला लावल्या;राधाकृष्ण विखे पाटलांची बोचरी टीका,शरद पवारांनाही टोला
लोकांनी राहुल गांधींना गटांगळ्या खायला लावल्या;राधाकृष्ण विखे पाटलांची बोचरी टीका,शरद पवारांनाही टोला
मुंबईत इमारतीच्या पायाभरणीवेळी दुर्घटना, मातीच्या ढिगाऱ्याखाली 2 कामगारांचा मृत्यू, 3 जखमी
मुंबईत इमारतीच्या पायाभरणीवेळी दुर्घटना, मातीच्या ढिगाऱ्याखाली 2 कामगारांचा मृत्यू, 3 जखमी
Bihar Election Result 2025: नितीश कुमार सरकारवर 62 हजार कोटींच्या घोटाळ्यांचा आरोप केला अन् निकाल लागताच भाजपकडून माजी केंद्रीय मंत्र्याची हकालपट्टी
नितीश कुमार सरकारवर 62 हजार कोटींच्या घोटाळ्यांचा आरोप केला अन् निकाल लागताच भाजपकडून माजी केंद्रीय मंत्र्याची हकालपट्टी
PM नरेंद्र मोदी चंद्रावरही शिवशक्ती कॉलनी उघडणार; भाजपच्याच मंत्र्यांचा दावा, आदित्य ठाकरेंना टोला 
PM नरेंद्र मोदी चंद्रावरही शिवशक्ती कॉलनी उघडणार; भाजपच्याच मंत्र्यांचा दावा, आदित्य ठाकरेंना टोला 
Embed widget