माझा फोटो वापरु नका, अन्यथा... महायुतीच्या नेत्याने नवनीत राणांना झाप झाप झापलं
Navneet Rana and Sanjay Khodke, अमरावती : अमरावती लोकसभेतून भाजपने उमेदवारी जाहीर केल्यानंतर विद्यमान खासदार नवनीत राणा यांनी प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे.
Navneet Rana and Sanjay Khodke, अमरावती : अमरावती लोकसभेतून भाजपने उमेदवारी जाहीर केल्यानंतर विद्यमान खासदार नवनीत राणा यांनी प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे. दरम्यान, नवनीत राणांनी प्रचारादरम्यान अजित पवार यांचे निकटवर्तीय संजय खोडके यांचा फोटो वापरला. यानंतर अजित पवार यांचे निकटवर्तीय संजय खोडके यांनी नवनीत राणा यांना सज्जड दम दिलाय.
सर्व नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून आशीर्वाद द्यावेत, ही विनंती.🙏🏻#PhirEkBaarModiSarkar#AbkiBaar400Paar#LokSabhaElections2024#GeneralElections2024 pic.twitter.com/eqigRajrpR
— Navnit Ravi Rana (Modi Ka Parivar) (@navneetravirana) March 30, 2024
काय म्हणाले संजय खोडके ?
अमरावती लोकसभेसाठी तयार करण्यात आलेल्या पोस्टर्सवर माझा फोटो संमती न घेता का वापरला? असा सवाल संजय खोडके यांनी नवनीत राणांना केला आहे. कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता फोटो वापरल्याने थेट निवडणूक आयोगात तक्रार करण्याचा इशाराच संजय घोडके यांनी दिला आहे.
भारतीय जनता पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष माननीय श्री जगत प्रकाश जी नड्डा साहब से दिल्ली केंद्रीय कार्यालय पर मुलाकात करके आभार व्यक्त किया और आशीर्वाद लिया और भाजपा की कार्यकर्ता बनकर आगे काम करुंगी pic.twitter.com/j8FHxW3j1n
— Navnit Ravi Rana (Modi Ka Parivar) (@navneetravirana) March 30, 2024
कोण आहेत संजय खोडके ?
संजय खोडके अजित पवारांचे निकटवर्तीय मानले जातात. 2019 च्या निवडणुकीत संजय खोडके राष्ट्रवादीकडून अमरावती लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक होते. ऐनवेळी संजय खोडके यांचा पत्ता कट करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नवनीत राणा यांना पाठिंबा जाहीर केला होता. पक्षाने घेतलेल्या निर्णयानंतर काही काळ खोडके पक्षापासून दूर देखील होते. संजय खोडके यांच्या पत्नी सध्या अमरावती विधानसभेच्या काँग्रेसच्या विद्यमान आमदार आहेत.
फोटोंबाबत जाहीर खुलासा द्या
नवनीत राणा यांनी वापरलेल्या फोटोमुळे सोशल मीडियावर तसेच प्रिंट मीडियातून जाहीर खुलासा करा अन्यथा कारवाईला सामोरे जा,असा इशारा खोडके यांनी दिला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या