एक्स्प्लोर

Today In History : माजी पंतप्रधान पीव्ही नरसिंह राव यांचं निधन, चौधरी चरण सिंह यांचा जन्म, इतिहासात आज

23 December In History: आजच्या दिवशी इतिहासात (Din Vishesh) काय घडलं हे जाणून घेण्याची इच्छा सर्वांनाच असते. अनेक चांगल्या वाईट घटनांनी इतिहासातील तारखा नोंदलेल्या (Today History) असतात. आज म्हणजे 23 डिसेंबर रोजी इतिहासात अनेक महत्वाच्या घटना घडल्या आहेत.

What Happened on December 23th This Day in History : आजच्या दिवशी इतिहासात (Din Vishesh) काय घडलं हे जाणून घेण्याची इच्छा सर्वांनाच असते. अनेक चांगल्या वाईट घटनांनी इतिहासातील तारखा नोंदलेल्या (Today History) असतात. आज म्हणजे 23 डिसेंबर रोजी इतिहासात अनेक महत्वाच्या घटना घडल्या आहेत. भारतात 23 डिसेंबर हा दिवस शेतकरी दिवस म्हणून साजरा केला जातो. 23 डिसेंबर हा दिवस भारताचे पाचवे पंतप्रधान चौधरी चरण सिंह यांचा जन्मदिन. पश्चिम बंगालमधील प्रसिद्ध विश्व भारती विद्यापीठाची (Visva-Bharati University)स्थापना आजच्याच दिवशी झाली.  तसेच आजच्या दिवशी देशाचे माजी पंतप्रधान पी व्ही नरसिंह राव आणि देशभक्त रत्नाप्पा कुंभार यांचे निधन झालं होतं.  याशिवाय इतिहासात अनेक महत्वाच्या घडामोडी घडल्या आहेत. तसंच, आजच्या दिवशी असणारे दिग्गजांचे जन्मदिवस आणि निधन झालेल्या महत्वपूर्ण व्यक्तींबद्दल थोडक्यात जाणून घेणार आहोत.

2004- पी व्ही नरसिंह राव यांचे निधन 
देशाचे माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिह राव (P.V. Narasimha Rao) यांचे 23 डिसेंबर 2004 रोजी निधन झाले. राजीव गांधी यांच्या निधनानंतर देशात पन्हा एकदा काँग्रेसची सत्ता आली आणि पी व्ही नरसिंह राव पंतप्रधान झाले.  1991 ते 1996 या दरम्यान ते देशाचे नववे पंतप्रधान होते. 1991 साली भारतीय अर्थव्यवस्था डबघाईला आली असताना, देशावर आर्थिक संकट आलं असताना त्यांनी नव्या आर्थिक सुधारणा हाती घेतल्या. त्यावेळचे अर्थमंत्री डॉ. मनमोहन सिंह यांच्या साथीने त्यांनी 1991 साली भारतीय अर्थव्यवस्था खुली केली आणि जागतिकीकरण, खासगीकरण आणि उदारीकरणाचे धोरण राबवले. आज जो काही भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दिसतोय त्यामध्ये पी व्ही नरसिंह राव यांचे महत्त्वाचे योगदान होतं. 

1902- भारताचे पाचवे पंतप्रधान चौधरी चरणसिंह यांचा जन्म 

चौधरी चरण सिंह (Chaudhary Charan Singh) यांचा जन्म 1902 मध्ये उत्तरप्रदेशच्या मेरठ जिल्हयातील नूरपूर येथे एका मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबात झाला. ते सर्वप्रथम 1937 मध्ये छपरोली येथून उत्तरप्रदेश विधानसभेसाठी निवडले गेले. त्यांनंतर त्यांनी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी काम केलं. त्यावेळी त्यांनी शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. 1979 साली ते देशाची अर्थमंत्री आणि उपपंतप्रधान बनले. त्याच वर्षी त्यांनी राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक म्हणजे नाबार्डची स्थापना केली. 28 जुलै 1979 रोजी चौधरी चरण सिंह समाजवादी पक्ष आणि काँग्रेसच्या पाठिंब्याने देशाचे पंतप्रधान बनले. चौधरी चरण सिंह यांना वाचणाची आणि लिखाणाची आवड होती. त्यांनी जमीनदारी निर्मूलन, भारतातील गरीबी व त्यावरील उपाय, शेतकऱ्यांची मालकी की शेतकऱ्यांसाठी जमीन, प्रिवेन्शन ऑफ डिविजन ऑफ होल्डिंग्स बिलो ए सर्टन मिनिमम, को-ऑपरेटीव फार्मिंग एक्स-रेड या पुस्तकांचे लिखाण केलं. 

2019- पत्रकार जमाल खाशोगी हत्याप्रकरणात पाच लोकांना मृत्यूदंड 
अमेरिकन नागरिक आणि वॉशिंग्टन पोस्टमध्ये कॉलम लिहिणारे पत्रकार जमाल खाशोगी (Jamal Khashoggi) यांची हत्या करणाऱ्या पाच जणांना 23 डिसेंबर 2019 रोजी मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली. मात्र या प्रकरणात अमेरिकेने यू टर्न घेत सौदी अरबचे राजपुत्र मोहम्मद बिन सलमान (Saudi Crown Prince Mohammed bin Salman) यांची मुक्तता केली.

वॉशिंग्टन पोस्ट या वृत्तपत्रात जमाल खाशोगी हे सौदी अरबवर एक कॉलम लिहायचे. आपल्या लेखनातून त्यांनी सौदी अरबचे राज्यकर्ते आणि राजपूत्र मोहम्मद बिन सलमान यांच्यावर टिका केली होती. खाशोगी हे जेव्हा इस्तंबुलमधील गेले तेव्हा त्यांची हत्या करण्यात आली होती. ही घटना 2018 साली घडली होती. खाशोगी यांच्या हत्येचा थेट संशय सौदी अरबचा राजपूत्र मोहम्मद बिन सलमान यांच्यावर व्यक्त करण्यात येत होता. इस्तंबुलमध्ये खाशोगींची हत्या करण्यात आली होती ती मोहम्मद बिन सलमान यांच्या आदेशावरुनच करण्यात आली होती, असं अमेरिकेने आधी म्हटलं होतं. मात्र आता सौदी अरेबियाचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांना बायडेन प्रशासनाकडून जमाल खाशोगी यांच्या हत्येप्रकरणी खटल्यातून मुक्तता करण्यात आली. 

1921- विश्व भारती विद्यापीठाची स्थापना 
पश्चिम बंगालमधील प्रसिद्ध विश्व भारती विद्यापीठाची (Visva-Bharati University)स्थापना आजच्याच दिवशी म्हणजे 23 डिसेंबर 1921 रोजी झाली. हे विद्यापीठ देवेंद्रनाथ टागोर (Rabindra Nath Tagore) यांनी 1863 मध्ये स्थापन केलेल्या शांतिनिकेतन आश्रमातून विकसित झाले. 1901 मध्ये रवींद्रनाथ टागोर यांनी शांतिनिकेतन येथे आश्रम विद्यालय सुरू केले. त्याचाच एक भाग म्हणून हे विद्यापीठ उभं राहिलं. भारतीय संसदेच्या कायद्यान्वये 1951 साली या विद्यापीठाला कायदेशीर मान्यता देण्यात आली. हे विद्यापीठ केंद्रीय विद्यापीठांपैकी एक विद्यापीठ आहे. 

1922- बीबीसी रेडिओचे दैनिक बातम्यांचे प्रसारण सुरू
आजच्याच दिवशी म्हणजे 23 डिसेंबर 1922 रोजी बीबीसी रेडिओचे दैनिक बातम्यांचे प्रसारण सुरू झाले. 

1926- स्वातंत्र्यसेनानी आणि समाजसुधारक स्वामी श्रद्धानंद यांची हत्या 
सुप्रसिद्ध स्वातंत्र्यसेनानी, समाजसुधारक आणि समाजसुधारक आणि सामाजिक चळवळीचे नेते स्वामी श्रद्धानंत यांची 23 डिसेंबर 1926 रोजी हत्या करण्यात आली. स्वामी श्रद्धानंद, ज्यांना महात्मा मुन्शी राम विज म्हणूनही ओळखले जाते, हे भारतीय स्वातंत्र्य सेनानी आणि आर्य समाज संन्यासी होते. त्यांनी स्वामी दयानंद सरस्वतींच्या शिकवणींचा प्रचार केला. यामध्ये गुरुकुल कांगरी विद्यापीठासारख्या शैक्षणिक संस्थांच्या स्थापनेचा समावेश होता आणि 1920 च्या दशकातील हिंदू सुधारणा चळवळीमध्ये संघटना आणि शुद्धीकरण चळवळीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली.

1998- देशभक्त रत्नाप्पा कुंभार यांचे निधन
देशभक्त रत्नाप्पा कुंभार (Ratnappa Kumbhar) यांचे निधन 23 डिसेंबर 1998 रोजी इचलकरंजी या ठिकाणी झाले. रत्नाप्पांचा जन्म 15 सप्टेंबर 1909 रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील निमशिरगाव या खेडेगावात कुंभार काम करणाऱ्या शेतकरी कुटुंबात झाला. ते भारताच्या घटना मसूदा समितीचे सदस्य व घटनेच्या अंतिम मसुद्यावर स्वाक्षरी करणाऱ्या व्यक्तींपैकी एक होते. ते पहिल्या लोकसभेचे खासदार, तसेच महाराष्ट्र विधानसभेत ६ वेळा निवडून गेलेले आमदार व महाराष्ट्र सरकारमधील गृहमंत्री,अन्न व नागरी पुरवठा मंत्री होते. ते देशभक्त रत्नाप्पा कुंभार नावाने परिचित होते.

रत्नाप्पा कुंभार हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीत अग्रेसर होते. स्वातंत्र्यानंतर डेक्कन स्टेटमधील 21 संस्थाने त्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या चळवळीमुळेच भारतीय संघराज्यात विलीन झाली. ते भारताच्या घटना मसूदा समितीचे सदस्य व घटनेच्या अंतिम मसुद्यावर स्वाक्षरी करणाऱ्या व्यक्तींपैकी एक होते. ते पहिल्या लोकसभेचे खासदार, तसेच महाराष्ट्र विधानसभेत सहा वेळा निवडून गेलेले आमदार आणि महाराष्ट्र सरकारमधील गृहमंत्री,अन्न व नागरी पुरवठा मंत्री होते. ते देशभक्त रत्नाप्पा कुंभार नावाने परिचित होते 1985 साली त्यांना त्यांच्या सामाजिक कार्यासाठी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याच वर्षी साली सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने त्यांना सन्माननीय डी.लिट् पदवी दिली. 

2000- प्रसिद्ध अभिनेत्री आणि गायिका ‘मलिका-ए-तरन्नुम’ नूरजहां यांचं निधन
चाळीसच्य दशकात आपल्या अभिनयाने आणि गायकीने रसिकांच्या मनावर राज्य करणाऱ्या नूरजहां यांचं निधन 23 डिसेंबर 2000 रोजी झालं. नूरजहांला 'मलिका ए तरन्नुम' (MALIKA-E-TARANNUM Noor Jehan )असं म्हटलं जायचं. खानदान, दोस्त, झीनत, गाव की गोरी ,बडी मां आणि जुगनू या चित्रपटातून त्यांनी अभिनय आणि गायन केलं होतं. 'जवां है मुहोब्बत हंसी है जमाना', 'आवाज दे कहां है दुनिया मेरी जवां है…' या त्यांच्या गाण्याने रसिकमनांना वेड लावलं होतं. फाळणीनंतर नूरजहां पाकिस्तानमध्ये गेल्या. 

2000- कलकत्त्याचं नाव बदलून कोलकाता केलं
पश्चिम बंगालची राजधानी कलकत्ता या शहराचं नाव 23 डिसेंबर 2000 रोजी बदलवण्यात आलं आणि ते कोलकाता असं ठेवण्यात आलं. 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Arshdeep Singh : ना बुमराह, ना हार्दिक पांड्या, ICC चा मोठा निर्णय,टी 20 प्लेअर ऑफ द इयर पुरस्कारासाठी अर्शदीपला मानांकन
टी 20 प्लेअर ऑफ द इयरसाठी बुमराह, हार्दिक पांड्या यांना मानांकन न देता अर्शदीपचं नाव, सर्वजण थक्क
मालाडमध्ये धक्कादायक घटना, मदरशातच 11 वर्षीय मुलाने संपवलं जीवन, मालवणी पोलिसांचा तपास सुरु
मालाडमध्ये धक्कादायक घटना, मदरशातच 11 वर्षीय मुलाने संपवलं जीवन, मालवणी पोलिसांचा तपास सुरु
WTC 2025 Final:दक्षिण आफ्रिका अंतिम फेरीत दाखल,जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत भारत कितव्या स्थानी?   
दक्षिण आफ्रिका अंतिम फेरीत दाखल,जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत भारत कितव्या स्थानी?   
वाल्मिक कराड CID पोलिसांना शरण येणार; राजकीय, सामाजिक दवाब वाढल्याने तपासाला वेग
वाल्मिक कराड CID पोलिसांना शरण येणार; राजकीय, सामाजिक दवाब वाढल्याने तपासाला वेग
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Prajakta Mali Meet CM Devendra Fadnavis : प्राजक्ता माळीनं घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेटNavi Mumbai Airport :  काय आहेत नवी मुंबई विमानतळाची वैशिष्ट्ये ?Ethiopian Airlines Accidents : इथिओपियात विमान दुर्घटनाग्रस्त, 157 ठारABP Majha Marathi News Headlines 10PM TOP Headlines 10 PM 29 December 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Arshdeep Singh : ना बुमराह, ना हार्दिक पांड्या, ICC चा मोठा निर्णय,टी 20 प्लेअर ऑफ द इयर पुरस्कारासाठी अर्शदीपला मानांकन
टी 20 प्लेअर ऑफ द इयरसाठी बुमराह, हार्दिक पांड्या यांना मानांकन न देता अर्शदीपचं नाव, सर्वजण थक्क
मालाडमध्ये धक्कादायक घटना, मदरशातच 11 वर्षीय मुलाने संपवलं जीवन, मालवणी पोलिसांचा तपास सुरु
मालाडमध्ये धक्कादायक घटना, मदरशातच 11 वर्षीय मुलाने संपवलं जीवन, मालवणी पोलिसांचा तपास सुरु
WTC 2025 Final:दक्षिण आफ्रिका अंतिम फेरीत दाखल,जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत भारत कितव्या स्थानी?   
दक्षिण आफ्रिका अंतिम फेरीत दाखल,जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत भारत कितव्या स्थानी?   
वाल्मिक कराड CID पोलिसांना शरण येणार; राजकीय, सामाजिक दवाब वाढल्याने तपासाला वेग
वाल्मिक कराड CID पोलिसांना शरण येणार; राजकीय, सामाजिक दवाब वाढल्याने तपासाला वेग
सेबीनं 15000 वेबसाइटस अन् सोशल मीडिया स्टार्सवर बंदी घालत दिला दणका, शेअर मार्केट गुतवणुकीबाबत चुकीचा सल्ला देणं भोवलं
शेअर मार्केट गुंतवणूक सल्ला देणाऱ्या वेबसाइट अन् सोशल मीडिया स्टार्सवर सेबीची बंदी, नेमकं काय घडलं?
ना भारत, ना ऑस्ट्रेलिया, अशी एक शक्यता तिसराच संघ WTC फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भिडणार? जाणून घ्या समीकरण
ना भारत, ना ऑस्ट्रेलिया, अशी एक शक्यता तिसराच संघ WTC फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भिडणार? जाणून घ्या समीकरण
5 लाखात बांगलादेशी नागरिकास बनवायचा भारतीय, बनावट पासपोर्टद्वारे पाठवायचा परदेशात; कसं फुटलं बिंग?
5 लाखात बांगलादेशी नागरिकास बनवायचा भारतीय, बनावट पासपोर्टद्वारे पाठवायचा परदेशात; कसं फुटलं बिंग?
Kalyan Crime : कल्याण अत्याचार व हत्या प्रकरणात सरकारकडून नियुक्ती होताच उज्वल निकम म्हणाले, ताबडतोब शिक्षा होणं...
कल्याणच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार व हत्या प्रकरणात उज्वल निकम बाजू मांडणार, मुख्यमंत्र्यांकडून नियुक्तीचा फोन
Embed widget