Weather Update : लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यात अवकाळी बरसणार
Unseasonal Rain Update : आज कोकण, मध्य महाराष्ट्रासह देशात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे.
Maharashtra Weather Update : आज लक्ष्मीपूजनाच्या (Laxmi Pujan) मुहूर्तावरही राज्यात अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. आज कोकण-गोवा आणि मध्य महाराष्ट्रात पाऊस पडण्याची शक्यता आहे. रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्येही पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. दरम्यान, कोकण, पुणे, सातारा या ठिकाणी काही भागात शनिवारीही पाऊस झाला, तर काही भागात ढगाळ वातावरण पाहायला मिळालं.
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी
गोवा, केरळ, तामिळनाडूसह देशाची राजधानी दिल्लीमध्येही ऐन दिवाळीत वरुणराजानं हजेरी लावली आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने मान्सून अनुकूल परिस्थिती निर्माण झाल्याने राज्यासह देशात विविध ठिकाणी पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात काही भागात शनिवारी पावसाची रिमझिम पाहायला मिळाली.
🌧️#तमिलनाडु में दर्ज की गई भारी वर्षा!
— India Meteorological Department (@Indiametdept) November 11, 2023
💦 #रामनाथपुरम जिले के #थंगाचिमादम में 15 सेमी, #मंडपम में 14 सेमी और #पंबन में 8 सेमी वर्षा दर्ज की गई। 💦
वर्षा के इस मौसम में जल भराव, कच्चे रास्तों व भीड़ भाड़ वाले क्षेत्रों में जाने से बचें।
सावधान रहें, सुरक्षित रहें! pic.twitter.com/MeYng6XeJ6
'या' भागात बर्फवृष्टीचा अंदाज
देशभरात गुलाबी थंडी जाणवत आहे. काही भागात मात्र, ऊन पावसाचा खेळ कायम आहे. महाराष्ट्रातसह दिल्ली पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. मुंबईसह दिल्लीत शुक्रवारी झालेल्या पावसानंतर तापमानात घट झाली अस वायू प्रदूषणातदेखील घट झाली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील काही दिवस वातावरण थंड राहील. आयएमडी (IMD) ने आजत रविवारी उत्तराखंडमध्ये पाऊस आणि बर्फवृष्टीचा अंदाज वर्तवला आहे. याशिवाय जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि इतर भागात पाऊस आणि बर्फवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :