एक्स्प्लोर

PM Modi : पंतप्रधानांकडून देशवासियांना दिपावलीच्या शुभेच्छा, सीमेवर जवानांसोबत साजरी करणार दिवाळी

Diwali 2023 : पंतप्रधान नरेंद्र मोदी दरवर्षी दिवाळी सीमेवर जवानांसोबत साजरी करतात. यावेळी जम्मू-काश्मीरच्या अखनूरमध्ये लष्कराच्या जवानांसोबत दिवाळी साजरी करतील.

PM Modi Diwali Celebration with Indian Army : आज दिवाळीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी देशातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधानांनी ट्विटर म्हणजेच X मीडियावर पोस्ट करत लिहिलं आहे की, "देशातील आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांना दिवाळीच्या शुभेच्छा. हा विशेष सण तुमच्या आयुष्यात आनंद, समृद्धी आणि चांगले आरोग्य घेऊन येवो."

यंदा पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हिमाचल प्रदेशातील (Himachal Pradesh) लेप्चा येथे लष्कराच्या (Indian Army) जवानांसोबत दिवाळी (Diwali 2023) साजरी करणार आहेत. पंतप्रधान झाल्यापासून नरेंद्र मोदी सैनिकांसोबत दिवाळी साजरी करतात. आज रविवारी, 12 नोव्हेंबर रोजी देशभरात दिवाळीचा उत्साह पाहायला मिळत आहे. सर्वत्र जोरदार तयारी सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळी सैनिकांसोबत साजरी करणार आहेत.

पंतप्रधान मोदी सैनिकांसोबत साजरी करणार दिवाळी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यंदाची दिवाळी हिमाचल प्रदेशातील लेप्चा येथे भारतीय लष्कराच्या जवानांसोबत साजरी करणार आहेत. पंतप्रधानांच्या दौऱ्याबाबत शनिवारी रात्रीपर्यंत कोणतंही अधिकृत वक्तव्य जारी केलं नव्हते, पण संबंधित लष्करी तुकडीमध्ये त्यांच्या आगमनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.

अखनूर येथील झोरियन भागात लावणार हजेरी

हिमाचल प्रदेशातील लेप्चा येथे दिवाळीनिमित्त पंतप्रधान मोदी उपस्थित राहणार आहेत. याशिवाय पंतप्रधान बीएसएफ जवानांसोबतही दिवाळी साजरी करण्याची शक्यता आहे. याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. 

पंतप्रधान लष्करी परिषदेला संबोधित करणार

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी दुपारी दिल्लीला परतण्यापूर्वी लष्करी परिषदेला संबोधितही करतील. पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर पंतप्रधान मोदी दरवर्षी आंतरराष्ट्रीय सीमा, नियंत्रण रेषा किंवा प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील सैनिकांमध्ये दिवाळी साजरी करत आहेत. यंदाही त्यांनी हे कायम ठेवलं आहे.

पंतप्रधान मोदी यांनी कुठे-कुठे दिवाळी साजरी केली?

पंतप्रधानांनी 2014 मध्ये सियाचीन ग्लेशियर, 2015 मध्ये पंजाबमधील अमृतसर, 2016 मध्ये हिमाचल प्रदेशातील किन्नौर आणि 2017 मध्ये काश्मीरमधील गुरेझ येथे सैनिकांसोबत दिवाळी साजरी केली होती. यानंतर, 2018 मध्ये, पंतप्रधानांनी उत्तराखंडमधील केदारनाथमध्ये आणि 2019 मध्ये जम्मू विभागातील राजौरीमध्ये लष्करी जवानांसोबत दिवाळी साजरी केली. पंतप्रधानांनी 2020 मध्ये राजस्थानमधील जैसलमेर, 2021 मध्ये राजौरी जिल्ह्यातील नौशहरा आणि 2022 मध्ये कारगिलमध्ये दिवाळी साजरी केली.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

12 November In History : पंतप्रधान असताना इंदिरा गांधींची काँग्रेसमधून हकालपट्टी, 'गब्बर सिंह' अमजद खान यांचा जन्म; आज इतिहासात

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेरBIg Fight West Maharashtra : पश्चिम महाराष्ट्रातील प्रचारानंतरचा विचार, प्रचारानंतर कोणता मु्द्दा गजला?ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07 PM 18 November 2024Maharashtra Assembly Update :विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Jayant Patil : हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
Sujay Vikhe : आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
Embed widget