विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक नवीन नियमानुसार कशी असणार?
विधानसभा अध्यक्ष निवडणुकीत होण्याची भीती महाविकास आघाडीला आहे. त्यामुळं थेट विधानसभा अध्यक्ष निवडणुकीचे नियम बदलण्यात आले आहेत.
मुंबई : विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपने महाविकास आघाडीला धक्का दिल्यानंतर विधानसभा अध्यक्षाच्या निवडणुकीकडे सर्वांच लक्ष लागलंय. यातच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी तर महाविकास आघाडीला थेट आव्हान दिलंय. जर हिंमत असेल तर नियमांत बदल न करता निवडणूक लढवून दाखवा. तर दुसरीकडे विधान परिषदेच्या निवडणुकीत मत फुटण्याच्या प्रकार घडला. तसाच प्रकार विधानसभा अध्यक्ष निवडणुकीत होण्याची भीती महाविकास आघाडीला आहे. त्यामुळं थेट विधानसभा अध्यक्ष निवडणुकीचे नियम बदलण्यात आले आहेत.
अध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया कशी असणार आहे.
- नियमांत बदल केल्यामुळे विधानसभेच्या अध्यक्ष पदाची निवड विधान परिषदेच्या सभापती प्रमाणे होणारं आहे
- यापूर्वी बॅलेट पेपरवर गोपनिय पद्धतीने मतदान करण्यात येत होते. आता मात्र आवाजी पद्धतीने मतदान होणार आहे.
- ही निवडणूक दोन दिवसात होण्याची शक्यता आहे.
- जे नियमांत बदल केले आहेत त्याचा अहवाल नियम समितीच्या समोर सादर करणे.
- त्यानंतर अधिवेशन दरम्यान अहवाल पटलावर ठेवला जाईल
- यावरती हरकती मागविण्यासाठी दोन दिवसांचा कालावधी सदस्यांना द्यावा लागेल (नियमानुसार 10 दिवस द्यावे लागतात).
- हरकती आल्यानंतर नियम समितीची बैठक होईल त्यानंतर त्या हरकती ललक्षात घेउन अंतीम अहवाल सभागृहाच्या पटलावर ठेवला जाईल.
- गॅजेट संसदीय कामकाज विभाग किंवा मुख्यमंत्री यांच्या सचिवालयाकडून राज्यपाल यांच्या सहीसाठी पाठवला जाईल.
- त्यानंतर निवडणूक कधी घ्यायची याची राज्यपाल तारीख जाहीर करतील त्यानुसार निवडणूक जाहीर होईल
- सभागृहात प्रस्ताव आल्यानंतर जर एकच अर्ज असेल तर बिनविरोध निवड होईल आणि एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास प्रस्ताव मतदानाला टाकला जाईल.
- त्यानंतर मतदान होऊन अध्यक्षांची निवड जाहीर केली जाईल
नियमात बदल केल्यामुळे एवढी साधी प्रक्रिया या निवडणुकीची असणार आहे . मात्र या निवडणुकीत सुद्धा राज्यपालांच्या तारखेवरती बरेच काही अवलंबून आहे. ज्या दिवशी राज्यपाल तारीख देतील त्याच दिवशी निवडणूक घ्यावी लागेल. त्याही पेक्षा महाविकास आघाडीला काही दगाफटका होऊ शकतो का? आणि सध्या विधानसभेत पक्षीय बलाबल काय आहे.
महाविकास आघाडीकडे एकूण संख्याबळ
- शिवसेना 56
- राष्ट्रवादी 53
- काँग्रेस 43
- क्रांतिकारी शेतकरी पक्ष 1
- प्रहार 2
- बहुजन विकास आघाडी 3
- समाजवादी 2
- शेकाप 1
- माकप 1
- स्वाभिमानी शेतकरी पक्ष 1
- अपक्ष 7
- एकूण- 171
- भाजप 106
- भाजप सहयोगी पक्ष आणि अपक्ष आमदार 7
- एकूण- 113
- तटस्थ आमदार
- एमआयएम- 2
- मनसे 1
- एकूण 3
महाविकास आघाडीकडे विधानसभेत बहुमताचा आकडा असताना ही सावध पावित्रा घेत नियमात बदल करण्यात आले आहेत. मात्र ही निवडणूक घेण्यात महाविकास आघाडीच्या तीन ही पक्षांच एकमत होण ही तेवढंच महत्वाचं आहे.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
इतर महत्त्वाच्या बातम्या: