एक्स्प्लोर

राहुल गांधी देशाबाहेर जाऊन देशाची बदनामी करतात, त्यांचे पासपोर्ट रद्द करा; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंची मागणी

Ramdas Athawale on Rahul Gandhi : राहुल गांधी देशाच्या बाहेर जाऊन देशाची बदनामी करतात. त्यांचे पासपोर्ट रद्द केले पाहिजे, अशी मागणी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.

Ramdas Athawale नागपूर : आरक्षण कोणीही हटवू शकत नाही. राहुल गांधी मात्र आरक्षण हटवू शकतात. तसेच ते देशाच्या बाहेर जाऊन देशाची बदनामी करतात. मी तर मागणी करतो त्यांचे पासपोर्ट जप्त केले पाहिजे. राहुल गांधींच्या विरोधात देशभर निषेध आंदोलन झाले आहेत.  त्यांचे जीभ छाटली पाहिजे, असे वक्तव्य करणे योग्य नाही. अशा शब्दात केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी राहूल गांधी यांच्यावर टीका केली आहे.

मला मोदी सरकारमध्ये तीन वेळा मंत्रीपद मिळाले, हे कार्यकर्त्यांमुळे शक्य झाले आहे. मला रिपब्लिकन पँथरच्या काळापासून नागपूर आणि विदर्भाने भक्कम साथ दिली. सध्या ज्या सरकार मध्ये मी आहे, ते पाच वर्ष चालणारे सरकार असून पूर्ण बहुमत आपल्याकडे आहे. नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू आमच्यासोबत असून पुढे ही ते सोबत राहतील. पूर्वीही असे सरकार चालले आहे. आम्हाला विदर्भात कमी जागा मिळाल्या, तो भाजपचा बालेकिल्ला होता. मात्र, जागा मिळाल्या नाही. मराठवाड्यात ही यश आले नाही.

सविधान बदलले जाईल या चर्चेमुळे असे घडले. मात्र, इथे आंबेडकरी विचार भक्कम आहे. मोदी यांनी संविधानाला डोकं टेकवून शपथ घेतली आहे. लंडनचे घर असो, इंदु मिलचे काम असो, सर्वात मोदींचे योगदान आहे. त्यांच्या काळात हे काम झाले असताना मोदी कधी ही संविधान बदलणार नाही. असा विश्वास केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी बोलताना व्यक्त केला आहे.  

मल्लिकार्जुन खरगे कर्नाटकात कधी मुख्यमंत्रीही झाले नाही

मल्लिकार्जुन खरगे यांना काँग्रेस पक्षाने कधी कर्नाटकात मुख्यमंत्री केले नाही. खरगे म्हणतात आमचे सरकार आले असते तर NDA चे सर्व नेते आत राहिले असते. आता NDA चे सरकार असताना तुम्ही आणि तुमच्या पक्षातील सर्व नेते बाहेर आहे. त्यामुळे खोटे प्रचार करू नका,असेही मंत्री रामदास आठवले म्हणाले. 

फडणवीस हे चतुर नेते आहेत - रामदास आठवले

येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आमच्या पक्षाला किमान 10 ते 12 जागा द्याव्या. माझ्या पक्षासोबत मोठ्या प्रमाणात दलित मतदार आहेत. वंचित बहुजन आघाडीला राज्यात म्हणावे तसे यश मिळालेले नाही. आम्ही लोकसभेला 2 जागा मागितल्या होत्या, मात्र मिळाल्या नाही. आता विधानसभा निवडणुकीत आम्हाला 12 जागा द्या. सोबतच विदर्भात किमान 4 जागा द्याव्या, अशी मागणीही मंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.

महाराष्ट्रात आम्ही 18 जागांची यादी केली आहे. त्यापैकी 12 जागा आम्हाला द्याव्या. आम्हाला भाजपच्या कोट्यातून मागू नये. तर भाजप, शिंदे आणि अजित दादा या तिघांनी आम्हाला त्यांच्या कोट्यातून 4-4 जागा द्याव्या. म्हणजे आम्हाला 12 जागा मिळतील, असेही ते म्हणाले. येणाऱ्या एनडीए सरकारमध्ये आम्हाला मंत्री पद द्यावे, तसेच 2 महामंडळ तरी द्याव्या.  किंबहुना फडणवीस हे चतुर नेते आहे. ते आमची ताकत ओळखतील. असेही मंत्री रामदास आठवले म्हणाले.

हे ही वाचा 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सोयाबीन खरेदीला 1 महिना मुदतवाढ द्या, अन्यथा राहिलेलं सोयाबीन अरबी समुद्रात फेकून देऊ, तुपकरांचा इशारा
सोयाबीन खरेदीला 1 महिना मुदतवाढ द्या, अन्यथा राहिलेलं सोयाबीन अरबी समुद्रात फेकून देऊ, तुपकरांचा इशारा
शॉकींग! सांगलीत 4 वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करुन पेटीत ठेवलं; नराधमास ठोकल्या बेड्या
शॉकींग! सांगलीत 4 वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करुन पेटीत ठेवलं; नराधमास ठोकल्या बेड्या
Shreyas Iyer : 11 चौकार आणि षटकार! श्रेयस अय्यरची तोडफोड फलंदाजी; फक्त इतक्या चेंडूत ठोकले अर्धशतक, पाहा तुफानी फटकेबाजीचा Video
11 चौकार आणि षटकार! श्रेयस अय्यरची तोडफोड फलंदाजी; फक्त इतक्या चेंडूत ठोकले अर्धशतक, पाहा तुफानी फटकेबाजीचा Video
Video: आया रे तुफान...  सिंहाच्या जबड्यात हात; 'छावा' सिनेमातील नवं गाणं लाँच; शंभुराजेंचा लेझीम डान्स वगळला
Video: आया रे तुफान... सिंहाच्या जबड्यात हात; 'छावा' सिनेमातील नवं गाणं लाँच; शंभुराजेंचा लेझीम डान्स वगळला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Job Majha:भारतीय राष्ट्रीय महासागर सूचना सेवा केंद्र येथे विविध क्षेत्रात नोकरीच्या संधी 06 Feb 2025Ajit Pawar AK 47 Funny : महायुतीच्या बातम्या नीट द्या...नाहीतर उडवून टाकू! दादांची फटकेबाजीKaruna Sharma : मुंडे घराण्याचा एकमेवं वारस बेरोजगार आहे,करुणा शर्मांची स्फोटक मुलाखतGunaratna Sadavarte : अंजली दमानियांचा मुंडेंच्याशी काय संबंध? गुणरत्न सदावर्ते नेमकं का संतापले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सोयाबीन खरेदीला 1 महिना मुदतवाढ द्या, अन्यथा राहिलेलं सोयाबीन अरबी समुद्रात फेकून देऊ, तुपकरांचा इशारा
सोयाबीन खरेदीला 1 महिना मुदतवाढ द्या, अन्यथा राहिलेलं सोयाबीन अरबी समुद्रात फेकून देऊ, तुपकरांचा इशारा
शॉकींग! सांगलीत 4 वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करुन पेटीत ठेवलं; नराधमास ठोकल्या बेड्या
शॉकींग! सांगलीत 4 वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करुन पेटीत ठेवलं; नराधमास ठोकल्या बेड्या
Shreyas Iyer : 11 चौकार आणि षटकार! श्रेयस अय्यरची तोडफोड फलंदाजी; फक्त इतक्या चेंडूत ठोकले अर्धशतक, पाहा तुफानी फटकेबाजीचा Video
11 चौकार आणि षटकार! श्रेयस अय्यरची तोडफोड फलंदाजी; फक्त इतक्या चेंडूत ठोकले अर्धशतक, पाहा तुफानी फटकेबाजीचा Video
Video: आया रे तुफान...  सिंहाच्या जबड्यात हात; 'छावा' सिनेमातील नवं गाणं लाँच; शंभुराजेंचा लेझीम डान्स वगळला
Video: आया रे तुफान... सिंहाच्या जबड्यात हात; 'छावा' सिनेमातील नवं गाणं लाँच; शंभुराजेंचा लेझीम डान्स वगळला
Nashik Crime : पोलीस वेश बदलून बांधकाम साईटवर गेले अन्..., नाशिकमध्ये 8 बांगलादेशी नागरिकांना बेड्या, नेमकं काय घडलं?
पोलीस वेश बदलून बांधकाम साईटवर गेले अन्..., नाशिकमध्ये 8 बांगलादेशी नागरिकांना बेड्या, नेमकं काय घडलं?
MSEB मध्ये वायरी जोडणारे हात जेव्हा 'महावितरण श्री' जिंकतात; कोल्हापूरच्या पठ्ठ्यानं पटकावला किताब
MSEB मध्ये वायरी जोडणारे हात जेव्हा 'महावितरण श्री' पटकावतात; कोल्हापूरच्या पठ्ठ्यानं पटकावला किताब
महायुतीच्या चांगल्या बातम्या द्या, अन्यथा उडवून टाकू; हाती बंदूक घेऊन अजित दादांचा मिश्कीलपणे इशारा
महायुतीच्या चांगल्या बातम्या द्या, अन्यथा उडवून टाकू; हाती बंदूक घेऊन अजित दादांचा मिश्कीलपणे इशारा
मुख्यमंत्र्यांच्या कानावर या गोष्टी जात कशा नाहीत; धनंजय मुंडेंविरुद्ध कोर्टाच्या निर्णयावर आदित्य ठाकरेंचा सवाल
मुख्यमंत्र्यांच्या कानावर या गोष्टी जात कशा नाहीत; धनंजय मुंडेंविरुद्ध कोर्टाच्या निर्णयावर आदित्य ठाकरेंचा सवाल
Embed widget