एक्स्प्लोर

ठाकरे गटाचे खंदे कार्यकर्ते शिंदेंच्या शिवसेनेत; संघटनेची इत्यंभूत माहिती असलेला मोहरा शिंदेंच्या गळाला

Maharashtra Politics: मारुती साळुंखे हे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सचिव आणि खासदार अनिल देसाई यांचे अत्यंत निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. गटातील आणि संघटनेची घडी कशी बसवावी तसेच प्रत्येकाशी संपर्क ठेवून संघटना तळागाळात कशी पोहचवावी याची जबाबदारी ही त्यांच्या खांद्यावर होती. 

Maharashtra Politics: उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Balasaheb Thackeray) गटाचे खासदार आणि सचिव अनिल देसाई (Anil Desai) यांचे निकटवर्तीय, आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची संघटना आणि प्रशासकीय कामाची इत्यंभूत माहिती असलेले माहीतगार मारुती साळुंखे (Maruti Salunkhe) यांनी आज शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या वर्षा या निवासस्थानी हा पक्षप्रवेश पार पडला. मुख्यमंत्र्यांनी हातात भगवा झेंडा देत साळुंखे यांचे पक्षात स्वागत केलं.  

मारुती साळुंखे हे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सचिव आणि खासदार अनिल देसाई यांचे अत्यंत निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. गटातील आणि संघटनेची घडी कशी बसवावी तसेच प्रत्येकाशी संपर्क ठेवून संघटना तळागाळात कशी पोहचवावी याची जबाबदारी ही त्यांच्या खांद्यावर होती. 

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरुद्ध उठाव करून एकनाथ शिंदे वेगळे झाल्यानंतरही संघटनेची नव्यानं बांधणी करण्यासाठी मारुती साळुंखे यांच्यावर अनेक जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या होत्या. मात्र गेल्या काही दिवसांपासून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीशी सलगी करून घेतलेली भूमिका त्यांना पटेनाशी झाली होती. तसेच बाळासाहेबांचे विचार खऱ्या अर्थानं पुढे घेऊन जायचं असेल तर एकनाथ शिंदे यांच्या अधिपत्याखालील शिवसेनेत जाण्यावाचून दुसरा पर्याय नाही, हे त्यांनी ठरवलं आणि त्यानंतर शिवसेनेत (शिंदे गटात) जाहीर प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती मारुती साळुंखे यांनी दिली आहे.  

साळुंखे यांच्या शिवसेना प्रवेशामुळे पक्षाची नव्यानं बांधणी करण्याच्या कामाला बळ मिळणार आहे. तसेच बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारानं प्रेरित झालेली संघटना तळागाळापर्यंत पोहचवण्यासाठी त्यांचा मोठा उपयोग होणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांचं पक्षात स्वागत करून त्यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच सोबत मिळून संघटना अधिक जोमानं वाढवू असंही सांगितलं. 

मारुती साळुंखे यांच्या शिवसेना प्रवेशामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मोठा धक्का बसला असून संघटनेची अचूक बांधणी करणारा एक मोहरा शिंदे यांना मिळल्यानं पक्षवाढीसाठी त्याचा त्यांना मोठा उपयोग होणार आहे. काल (रविवारी) पक्षप्रवेशावेळी शिवसेना सचिव संजय मोरे, शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे यादेखील उपस्थित होत्या.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

देव जरी आला तरी तुमच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, पण धनगरांनी विरोध केला तर...; मनोज जरांगेंचा इशारा
देव जरी आला तरी तुमच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, पण धनगरांनी विरोध केला तर...; मनोज जरांगेंचा इशारा
Mhada :  ठाण्यात 20 ते 30 लाखांत घरं, म्हाडाच्या कोकण मंडळाकडून 7 हजार घरांसाठी लवकरच लॉटरी, आचारसंहितेपूर्वी जाहिरात येणार?
म्हाडाच्या कोकण मंडळाकडून 7 हजार घरांसाठी लवकरच लॉटरी, आचारसंहिता लागू होण्यापूर्वी जाहिरात येणार?
Lucknow Accident Video : दारुच्या नशेत क्रेटा कार चालकाने पाच जणांना चिरडले, समोर येईल त्याला धडक; एक किमी पोलिस आणि जमावाकडून पाठलाग
Video : दारुच्या नशेत क्रेटा कार चालकाने पाच जणांना चिरडले, समोर येईल त्याला धडक; एक किमी पोलिस आणि जमावाकडून पाठलाग
Maratha- OBC Reservation: मराठा ओबीसी आंदोलक मध्यरात्री आमनेसामने, अंतरवली सराटीच्या वेशीवर पोलिसांचा तगडा बंदोबस्त
मराठा ओबीसी आंदोलक मध्यरात्री आमनेसामने, अंतरवली सराटीच्या वेशीवर पोलिसांचा तगडा बंदोबस्त
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Manoj Jarange Beed : मनोज जरांगेंच्या समर्थनात आज बीड बंदची हाक : गंगाधर काळकुटेManoj Jarange Health Update : मध्यरात्री पावणेदोन वाजता उपचार, मनोज जरांगे यांना सलाईनJalna Kreat Competition : इंजिनिअरींग विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा, 200 महाविद्यालयांचा समावेशManoj Jarange Jalna : वडीगोद्री येथील बॅरिकेड्स 15 मिनिटात काढा, जरांगे का संतापले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
देव जरी आला तरी तुमच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, पण धनगरांनी विरोध केला तर...; मनोज जरांगेंचा इशारा
देव जरी आला तरी तुमच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, पण धनगरांनी विरोध केला तर...; मनोज जरांगेंचा इशारा
Mhada :  ठाण्यात 20 ते 30 लाखांत घरं, म्हाडाच्या कोकण मंडळाकडून 7 हजार घरांसाठी लवकरच लॉटरी, आचारसंहितेपूर्वी जाहिरात येणार?
म्हाडाच्या कोकण मंडळाकडून 7 हजार घरांसाठी लवकरच लॉटरी, आचारसंहिता लागू होण्यापूर्वी जाहिरात येणार?
Lucknow Accident Video : दारुच्या नशेत क्रेटा कार चालकाने पाच जणांना चिरडले, समोर येईल त्याला धडक; एक किमी पोलिस आणि जमावाकडून पाठलाग
Video : दारुच्या नशेत क्रेटा कार चालकाने पाच जणांना चिरडले, समोर येईल त्याला धडक; एक किमी पोलिस आणि जमावाकडून पाठलाग
Maratha- OBC Reservation: मराठा ओबीसी आंदोलक मध्यरात्री आमनेसामने, अंतरवली सराटीच्या वेशीवर पोलिसांचा तगडा बंदोबस्त
मराठा ओबीसी आंदोलक मध्यरात्री आमनेसामने, अंतरवली सराटीच्या वेशीवर पोलिसांचा तगडा बंदोबस्त
Nitin Gadkari: 'घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ...', राजकारणातील घराणेशाहीवर नितीन गडकरींचं रोखठोक भाष्य
'घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ...', राजकारणातील घराणेशाहीवर नितीन गडकरींचं रोखठोक भाष्य
Jalgaon : चिमुकल्यांच्या जीवाशी खेळ! अंगणवाडीतील पोषणात आहारात आढळल्या आळ्या, जळगावातील धक्कादायक प्रकार
चिमुकल्यांच्या जीवाशी खेळ! अंगणवाडीतील पोषणात आहारात आढळल्या आळ्या, जळगावातील धक्कादायक प्रकार
Tirupati Laddu Controversy : प्रसादाच्या लाडूत जनावरांची चरबी अन् माशाचे तेल; आता तिरुपती देवस्थान समितीच्या खुलाशाने भूवया उंचावल्या!
प्रसादाच्या लाडूत जनावरांची चरबी अन् माशाचे तेल; आता तिरुपती देवस्थान समितीच्या खुलाशाने भूवया उंचावल्या!
Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकणार नाहीत; शिवसेना आमदाराचं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'स्वप्नाला...'
उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकणार नाहीत; शिवसेना आमदाराचं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'स्वप्नाला...'
Embed widget