एक्स्प्लोर

Sushma Andhare In Kolhapur : फडणवीस आणि टीम भाजप विष पेरत आहे; विघटनवादी विचार हिंदुत्व असू शकत नाही; सुषमा अंधारेंचा कडाडून प्रहार

Sushma Andhare In Kolhapur : शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी महाप्रबोधन यात्रेतून शिंदे गट आणि भाजपवर कडाडून टीकास्त्र सोडले. फडणवीस आणि टीम भाजप विष पेरत आहे, अशी टीका त्यांनी केली.

Sushma Andhare In Kolhapur : शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी महाप्रबोधन यात्रेतून शिंदे गट आणि भाजपवर कडाडून टीकास्त्र सोडले. सुषमा अंधारे यांनी दसरा मेळावा कसा झाला याचा व्हिडिओ लावून भाषणाची सुरुवात केली. सुषमा अंधारे म्हणाल्या की, भाजपने द्वेषाचं राजकारण सुरु केलं आहे. त्यामुळे एकमेकांकडे सगळे संशयाने पाहत आहेत. आफताबसारखी विकृतच आहेत, मरेपर्यंत शिक्षा झाली पाहिजे, पण हेच बिल्कीस बानोत शांत आहेत, धर्म पाहून ठरवतात. फडणवीस आणि टीम भाजप विष पेरत आहे, एकसंध महाराष्ट्रासाठी प्रबोधनकार ठाकरेंनी सर्वस्व पणाला लावले.  

राज्यात मध्यावधी निवडणुका होणार असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. त्या म्हणाल्या की, 2023 मध्ये मध्यावधी निवडणूक लागतील. सरकारमधील मंत्र्यांकडून महिलांवर होत असलेल्या असभ्य टीकांवरूनही त्यांनी टीका केली. महिलेवर कमरेखालचे वार केले जातात. मिंधे गटाचे कौटुंबिक पातळीवर टीका करायला उतरले असल्याचे त्यांनी सांगितले. 

हिंदुत्व सोडलं, पण यांना व्याख्या कळलीच नाही 

सुषमा अंधारे यांनी हिंदुत्वावरून टोला लगावला. हिंदुत्व सोडलं म्हणून सांगत असतात, पण यांना त्याची व्याख्या कळलीच नाही. डोळ्यातील पाणी पुसणारं आम्हाला हिंदुत्व हवं आहे. विघटनवादी विचार हिंदुत्व असू शकत नाही. दीपकभाऊ लय चांगला माणूस आहे. हिंदुत्व सोडल्याचे ते सांगतात. मात्र, त्यांची आणि बाळासाहेबांची गाठ कधी पडली? त्यापूर्वी काय करत होता? अशी विचारणा त्यांनी केली. अंधारे यांनी गुलाबराव पाटील यांनी केलेल्या टीकेचा समाचार घेतला. त्या म्हणाल्या, मी राष्ट्रवादीचे पार्सल आहे, तर मग उदयराव, केसरकर कोठून पार्सल आले? मी यादी वाचल्यास पळायला जागा मिळल्या नाही. भाजपने 2019 काँग्रेस राष्ट्रवादीचे उमेदवार पळवून आणून त्यांना तिकिट दिलं. 

शिवसेनेतून अनेकजण आले गेले, पण शिवसेनाला काही फरक पडला नाही, राज ठाकरे, भुजबळ यांनी शिवसेना संपवायचा कधी प्रयत्न केला नाही. सुषमा अंधारे म्हणाल्या की, मोदी टेलिप्रॉम्प्टरवर बोलतात आणि एकनाथ शिंदे फडणवीसांनी दिलेल्या चिठ्ठ्यांवर बोलतात, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. अंधारे म्हणाल्या की, माझ्या उंचीवरुनही टीका केली गेली, पण फडणवीस यांची उंची आणि वजनही माहीत आहे, पण फडणवीस यांनी नेमका कशाचा त्याग केला? 

त्या पुढे म्हणाल्या की, मी राष्ट्रवादीची कधीही सदस्य नव्हते, तरीही गुलाबराव पाटील म्हणतात, मी राष्ट्रवादीतून आले. भाजपकडे स्वतःचे असे काय होते? काँग्रेस-राष्ट्रवादीच्या लोकांना मांडीवर घेऊन भाजपने त्यांना मोठे केले. खोके शब्द उचारला, तर कायदेशीर कारवाई करणार असे म्हटले जाते. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी एक टक्के निधी राखीव ठेवा, राज्य शासनाचे निर्देश
दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी एक टक्के निधी राखीव ठेवा, राज्य शासनाचे निर्देश
अनैतिक संबंधातून गरोदर, 18 वर्षीय तरुणीची ओढणीने गळा आवळून हत्या, विट भट्टी मालकाला बेड्या
अनैतिक संबंधातून गरोदर, 18 वर्षीय तरुणीची ओढणीने गळा आवळून हत्या, विट भट्टी मालकाला बेड्या
चौकशी होणारच, पुण्यात परतताच तानाजी सावंतांच्या मुलाबाबत पोलीस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा स्पष्टच बोलले
चौकशी होणारच, पुण्यात परतताच तानाजी सावंतांच्या मुलाबाबत पोलीस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा स्पष्टच बोलले
ढोलकीच्या तालावर... 'लावणी'ला प्रोत्साहन, नवे कलाकार घडवणार; लोकनाट्य कला केंद्रासाठी शासनाची नवी नियमावली
ढोलकीच्या तालावर... 'लावणी'ला प्रोत्साहन, नवे कलाकार घडवणार; लोकनाट्य कला केंद्रासाठी शासनाची नवी नियमावली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Shole on Raj Thackeray | महापालिका निवडणुकांसाठी 'राज'कीय समीकरण ठरतंय?Rajkiya Shole on Raj Thackeray | मनपा निवडणुकीत मनसे आणि भाजप एकत्रित नाष्टा करणार का?Zero Hour Full | देवेंद्र फडणवीसांनी घेतली राज ठाकरेंची भेट? कारण काय? ABP MajhaBeed Sarpanch Death : संतोष देशमुख हत्येदिवशीचा CCTV;  स्कॉर्पियो सोडून सहा आरोपी पळाले!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी एक टक्के निधी राखीव ठेवा, राज्य शासनाचे निर्देश
दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी एक टक्के निधी राखीव ठेवा, राज्य शासनाचे निर्देश
अनैतिक संबंधातून गरोदर, 18 वर्षीय तरुणीची ओढणीने गळा आवळून हत्या, विट भट्टी मालकाला बेड्या
अनैतिक संबंधातून गरोदर, 18 वर्षीय तरुणीची ओढणीने गळा आवळून हत्या, विट भट्टी मालकाला बेड्या
चौकशी होणारच, पुण्यात परतताच तानाजी सावंतांच्या मुलाबाबत पोलीस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा स्पष्टच बोलले
चौकशी होणारच, पुण्यात परतताच तानाजी सावंतांच्या मुलाबाबत पोलीस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा स्पष्टच बोलले
ढोलकीच्या तालावर... 'लावणी'ला प्रोत्साहन, नवे कलाकार घडवणार; लोकनाट्य कला केंद्रासाठी शासनाची नवी नियमावली
ढोलकीच्या तालावर... 'लावणी'ला प्रोत्साहन, नवे कलाकार घडवणार; लोकनाट्य कला केंद्रासाठी शासनाची नवी नियमावली
धक्कादायक! सोयाबीन केंद्रावर अधिकाऱ्यांचा गैरव्यवहार; रिकाम्या पोत्यासाठी शेतकरीकन्येस रात्री उशिरापर्यंत ताटकळवले
धक्कादायक! सोयाबीन केंद्रावर अधिकाऱ्यांचा गैरव्यवहार; रिकाम्या पोत्यासाठी शेतकरीकन्येस रात्री उशिरापर्यंत ताटकळवले
मोठी बातमी! सोयाबीन खरेदीसाठी केंद्र सरकारकडून 24 दिवसांची मुदतवाढ, शेतकऱ्यांना दिलासा, किसान सभेकडून निर्णयाचं स्वागत 
मोठी बातमी! सोयाबीन खरेदीसाठी केंद्र सरकारकडून 24 दिवसांची मुदतवाढ, शेतकऱ्यांना दिलासा, किसान सभेकडून निर्णयाचं स्वागत 
Kolhapur News : बारावी परीक्षेच्या हॉल तिकिटावर वेगळे विषय आल्याने विद्यार्थी पालक हैराण; कोल्हापुरातील विमला गोयंका शाळेवर कारवाई होणार
बारावी परीक्षेच्या हॉल तिकिटावर वेगळे विषय आल्याने विद्यार्थी पालक हैराण; कोल्हापुरातील विमला गोयंका शाळेवर कारवाई होणार
Nashik Crime : गोवा फेडरेशनकडून 'नाफेड'ला साडेपाच कोटींना गंडा, 1500 टन कांद्याची चढ्या दराने परस्पर विक्री; नेमकं प्रकरण काय?
गोवा फेडरेशनकडून 'नाफेड'ला साडेपाच कोटींना गंडा, 1500 टन कांद्याची चढ्या दराने परस्पर विक्री; नेमकं प्रकरण काय?
Embed widget