एक्स्प्लोर
Gunratna Sadavarte : आज कोर्टात काय घडलं? अॅड. सदावर्ते, आंदोलक आणि सरकारी वकील... तिन्ही बाजूंचा युक्तीवाद जसाच्या तसा
ST Strike : अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना काल अटक झाल्यानंतर त्यांच्या वतीने तसेच एसटी आंदोलक आणि सरकारी बाजूच्या वतीने आज कोर्टात युक्तीवाद करण्यात आला.
मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांना चिथावणी देण्याचा आरोप असलेल्या अॅड. गुणरत्न सदावर्तेंना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यांच्यासोबतच्या इतर 109 आंदोलकांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरासमोर आंदोलन केल्याप्रकरणी एकूण 110 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
आज न्यायालयात तिन्ही बाजूंच्या वतीनं युक्तीवाद करण्यात आला. त्यामध्ये नेमका काय युक्तीवाद करण्यात आला त्याची माहिती खालीलप्रमाणे,
सरकारी वकील प्रदीप घरत यांचा युक्तीवाद-
- गुणरत्न सदावर्ते यांच्यावर दाखल करण्यात आलेले कलमं गंभीर आह. त्यामुळे त्यांना 14 दिवसांची पोलीस कोठडी द्यावी. सदावर्तेंनीच कामगारांना शरद पवारांच्या घरावर जायला प्रोत्साहित केलं.
- आरोपांची संख्या मोठी असल्यानं त्यांची चौकशी कशी करणार? असा सवाल न्यायाधीशांनी केला. त्यावर सरकारी वकील म्हणाले की, सीसीटीव्ही फुटेजेस आहे. आरोपी क्रमांक 1 हे सदावर्ते आहेत. या सर्वामागे ते एकटे नसून अजून काही जण त्यांच्यासोबत असणार म्हणून आम्हाला चौकशी करायची आहे.
- सदावर्ते यांच्या भाषणामुळे कामगारांनी हे कृत्य केलंय. पोलिसांवर देखील हल्ला करण्यात आला आहे. दगडफेक आणि चप्पलफेक करण्यात आली आहे. दोन जण जखमी झालेत. रक्ताचे नमूने घेतलेतय. कामगार दारु पिऊन होते अशी शंका आहे.
- काही जण आपलं नाव खोटं सांगतायत, सोबत पत्ता देखील सांगत नाही आहेत. यासाठी देखील चौकशी करायची आहे. ते खरंच एसटी कामगार आहेत की भाडोत्री होते. हे देखील चेक करायचंय.
सदावर्ते यांचे वकील महेश वासवानी यांचा युक्तीवाद-
- अॅड. गुणरत्न सदावर्ते पीएचडी आहेत. जयश्री पाटील या देखील पीएचडी आहेत.
- मराठा आंदोलन सदावर्ते यांनी रद्दबातल केलं. मराठा आरक्षणाच्या विरोधात जयश्री पाटील यांनी याचिका केली त्याबद्दल युक्तीवाद सदावर्ते यांनी केला होता. यामुळे त्यांना नेहमी चुकीची वागणूक दिली जायची. त्यावेळी त्यांच्यावर हल्ला करण्यात आला होता.
- सदावर्ते हे बार काऊन्सिलमध्ये देखील मोठ्या फरकाने विजयी झाले. सरकारच्या विरोधात मोठा आवाज सदावर्ते यांनी उचलला आहे
- एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यांना कोणत्याही सत्ताधारी राज्यकर्त्यांनी विचारलं नाही.
- आज सादर केलेल्या FIR मध्ये अनेक गोष्टी या मॅाडीफाईड केल्या गेल्या आहेत. सदावर्ते यांना ताब्यात घेताना नोटीस देखील देण्यात आली नाही.
- आम्ही आंदोलनात घरात घुसून आंदोलन करा वगैरे आम्ही कुठेच बोललो नाही आहे. कोणत्याच चॅनेलवर आम्ही असं बोललो नाही. घटनेवेळी देखील सदावर्ते तिथे नव्हते. ते मॅट कोर्टात होते
- सरकारविरोधात टिव्ही चॅनलवर मोठा रोष होता. सदावर्ते यांनी नेहमीच शांतता पाळा. असं सांगितलं होतं. आंदोलनावेळी देखील ते सातत्यानं हे म्हणत होते. 92 हजार कर्मचाऱ्यांची केस होती. ते सक्सिड झालेत आणि त्याचा राग म्हणून सरकार हे करतंय.
- जयश्री पाटील यांनी 100 कोटी रुपयांच्या अनिल देशमुखांच्या गैरव्यवहार प्रकरणी देखील दावा दाखल केला होता.
एसटी कर्मचाऱ्यांचे वकील संदिप गायकवाड यांचा युक्तीवाद-
- एसटी कर्मचाऱ्यांचा उद्देश कोर्टाने समजून घेतला पाहिजे.
- एसटी कर्मचारी आहेत, ते आरोपी नाहीयेत, गुन्हेगार प्रवृत्तीचे नाहीत. ते आंदोलक आहेत.
- गेल्या पाच महिन्यांपासून घरदार सोडून ते आंदोलनाला बसले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या:
- ST Strike : संपाचा तिढा! एसटी संपात आतापर्यंत काय घडलं? जाणून घ्या सविस्तर
- Gunratna Sadavarte : दातांचे डॉक्टर ते हायकोर्टातील वकील, कसा आहे अॅड. गुणरत्न सदावर्ते यांचा नांदेड ते मुंबई प्रवास? वाचा सविस्तर
- Sanjay Raut : 'गुणरत्न सदावर्तेंना भाजपचा पाठिंबा; गरळ ओकण्यासाठी फंडिंग, विरोधी पक्षाच्या दळभद्रीपणाचा कळस' : संजय राऊत
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
व्यापार-उद्योग
राजकारण
करमणूक
Advertisement