एक्स्प्लोर

Gunratna Sadavarte : दातांचे डॉक्टर ते हायकोर्टातील वकील, कसा आहे अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांचा नांदेड ते मुंबई प्रवास? वाचा सविस्तर

Gunratna Sadavarte : सुरुवातीला मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आणि सध्या एसटी कर्मचाऱ्यांच्या मुद्द्यावरून चर्चेत असणारी व्यक्ती म्हणजे अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते. जाणून घ्या कोण आहेत गुणरत्न सदावर्ते.

Gunratna Sadavarte : सुरुवातीला मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आणि सध्या एसटी कर्मचाऱ्यांच्या मुद्द्यावरून चर्चेत असणारी व्यक्ती म्हणजे अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते. सदावर्ते गेल्या काही वर्षांपासून मराठा आरक्षणाविरोधात त्यांच्या कायदेशीर लढाईमुळे चर्चेत आले. त्यानंतर ते आता एसटी कामगारांच्या आंदोलनामुळे चांगलेच चर्चेत आहेत. दातांचे डॉक्टर असणारे सदावर्ते यांच्या हायकोर्टातील वकील होण्यापर्यंतचा नांदेड ते मुंबई असा प्रवास तुम्हाला माहित नसेल. आम्ही तुम्हाला त्यांच्या आतापर्यंतच्या प्रवासाबाबत सविस्तर सांगणार आहोत.

अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते हे मूळचे नांदेड येथील रहिवासी आहेत. नांदेड येथील एका मध्यमवर्गीय कुटुंबात त्यांचा जन्म झाला. नांदेड शहरातील सोमेश कॉलनी येथील मूळ रहिवाशी आहेत. सदावर्ते यांचे वडील निवृत्ती सदावर्ते पोलीस खात्यात कर्मचारी होते. अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते आणि डॉ. राजरत्न सदावर्ते ही निवृत्ती सदावर्ते यांची दोन मुले आहेत. गुणरत्न सदावर्ते हे हायकोर्टात वकील असून त्यांचे बंधू डॉ. राजरत्न सदावर्ते हे मुंबईत डॉक्टर आहेत.

नांदेड येथील नेहरू इंग्लिश स्कुल या शाळेत अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांचे दहावीपर्यंतचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण झाले. त्यानंतर सायन्स कॉलेज नांदेड याठिकाणी त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांचे BDS चे वैद्यकीय शिक्षण, LLB आणि LLM हे शिक्षण मिलिंद कॉलेज औरंगाबाद ह्या ठिकाणी घेतले. त्यांनी भारतीय राज्यघटनेवर पीएचडी केली आहे. अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी नांदेड येथील गुरु गोविंद सिंग वैद्यकीय रुग्णालयात 1999 साली एक वर्षे डॉक्टर म्हणून नोकरी केलीय. 

अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्नी जयश्री पाटील ह्या मुंबई हायकोर्टात वकील आहेत. माहूर येथील स्वातंत्र्य सैनिक डॉक्टर लक्ष्मण पाटील हे त्यांचे सासरे आहेत. तर बालशौर्य पुरस्कार प्राप्त झेन सदावर्ते आणि योणा ह्या दोन मुली आहेत. सदावर्तेंनी 2002 सालापासून मुंबई हायकोर्टात वकिली करण्यास सुरुवात केलीय. मराठा आरक्षण, सेंट जॉर्ज विद्यार्थी आंदोलन, अनिल देशमुख मनीलॉंड्रिंग, एसटी महामंडळ कर्मचारी विलीनीकरण, के. इ. एम, जेजे हॉस्पिटल कर्मचारी आंदोलना आशी विविध नामांकित आणि विवादित प्रकरणी त्यांनी वकिली केली.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar on Supriya Sule : भाऊबीजला सुद्धा गेला नाही, सुप्रिया सुळेंशी संपर्क करता की नाही? अजितदादा म्हणाले, 'तेव्हा मी सांगितले होते की..'
भाऊबीजला सुद्धा गेला नाही, सुप्रिया सुळेंशी संपर्क करता की नाही? अजितदादा म्हणाले, 'तेव्हा मी सांगितले होते की..'
Maharashtra Assembly Election 2024 : शिवतीर्थावर 17 नोव्हेंबरला राज की उद्धव? कुणाची तोफ धडाडणार? समोर आली मोठी अपडेट
शिवतीर्थावर 17 नोव्हेंबरला राज की उद्धव? कुणाची तोफ धडाडणार? समोर आली मोठी अपडेट
Harishchandra Chavan : निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपसाठी वाईट बातमी, दिंडोरीचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन
निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपसाठी वाईट बातमी, दिंडोरीचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन
Ajit Pawar: आता पवार घराण्यातील कटुता दूर होईल असं वाटत नाही; अजित पवारांचं मोठं वक्तव्य
Ajit Pawar: आता पवार घराण्यातील कटुता दूर होईल असं वाटत नाही; अजित पवारांचं मोठं वक्तव्य
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dhananjay Munde Beed Parali : मुंडेंचा शरद पवारांवर निशाणा, पंकजाताईंचे आभार9 Sec News : 9 सेकंदात बातमी : 9 AM :14 नोव्हेंबर  2024 : ABP MAJHAShyam Rajput Nashik : अहिराणी भाषेत राजपूत यांचं मतदारांना आवाहन; सीमा हिरेंसाठी मैदानातAjit Pawar Modi Sabha :  मुंबईत मोदींची सभा, अजित पवारांची पाठ?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar on Supriya Sule : भाऊबीजला सुद्धा गेला नाही, सुप्रिया सुळेंशी संपर्क करता की नाही? अजितदादा म्हणाले, 'तेव्हा मी सांगितले होते की..'
भाऊबीजला सुद्धा गेला नाही, सुप्रिया सुळेंशी संपर्क करता की नाही? अजितदादा म्हणाले, 'तेव्हा मी सांगितले होते की..'
Maharashtra Assembly Election 2024 : शिवतीर्थावर 17 नोव्हेंबरला राज की उद्धव? कुणाची तोफ धडाडणार? समोर आली मोठी अपडेट
शिवतीर्थावर 17 नोव्हेंबरला राज की उद्धव? कुणाची तोफ धडाडणार? समोर आली मोठी अपडेट
Harishchandra Chavan : निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपसाठी वाईट बातमी, दिंडोरीचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन
निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपसाठी वाईट बातमी, दिंडोरीचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन
Ajit Pawar: आता पवार घराण्यातील कटुता दूर होईल असं वाटत नाही; अजित पवारांचं मोठं वक्तव्य
Ajit Pawar: आता पवार घराण्यातील कटुता दूर होईल असं वाटत नाही; अजित पवारांचं मोठं वक्तव्य
उद्धव ठाकरेंच्या डोक्यातली मनुस्मृती कायम; आदिवासी सरकारी अधिकाऱ्याला म्हणाले, 'माझं युरीन पॉटही तपासा'; शिंदे गटाची टीका
उद्धव ठाकरेंच्या डोक्यातली मनुस्मृती कायम; आदिवासी सरकारी अधिकाऱ्याला म्हणाले, 'माझं युरीन पॉटही तपासा'; शिंदे गटाची टीका
Kailas Patil : कैलास पाटील उद्धव ठाकरेंवरील निष्ठेमुळे सुरतच्या मार्गावरुन परतल्याची स्टोरी फेक? जुन्या सहकाऱ्याचा खळबळजनक दावा
कैलास पाटील उद्धव ठाकरेंवरील निष्ठेमुळे सुरतच्या मार्गावरुन परतल्याची स्टोरी फेक? जुन्या सहकाऱ्याचा खळबळजनक दावा
Ind vs Aus: गौतम गंभीरचा स्वभावच संतापी; रिकी पाँटिंगचे प्रत्युत्तर, भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेआधी जुंपली
गौतम गंभीरचा स्वभावच संतापी; रिकी पाँटिंगचे प्रत्युत्तर, भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेआधी जुंपली
Dhananjay Munde: पंकजाताईंनी मोठं मन केलं म्हणून मी आज तुमच्यासमोर; परळीतील सभेत धनंजय मुंडेंचं वक्तव्य
पंकजाताईंनी मोठं मन केलं म्हणून मी आज तुमच्यासमोर; परळीतील सभेत धनंजय मुंडेंचं वक्तव्य
Embed widget