एक्स्प्लोर

Shivsena : पश्चिम विदर्भात पक्षसंघटनेतील भांडणं मिटविण्यासाठी उद्धव ठाकरे आता 'थर्ड अंपायर'च्या भूमिकेत 

अकोला शिवसेना पक्षसंघटनेवर पुन्हा आमदार नितीन देशमुखांचं वर्चस्व स्थापन झालं असून त्यांचे समर्थक गोपाल दातकरांची जिल्हाप्रमुख पदावर वर्णी लागली आहे. 

अकोला : पश्चिम विदर्भात सेनेतील पक्षांतर्गत वाद थांबविण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे थर्ड अंपारयच्या भूमिकेत आले आहेत. यातूनच पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी सेनेच्या पक्षांतर्गत सामन्यात सध्याचे जिल्हाप्रमुख आणि आमदार नितीन देशमुखांना 'नॉट आऊट' ठरवलं आहे. तर विधान परिषदेतील पराभवासाठी नितीन देशमुखांच्या 'विकेट'साठी 'अपिल' करणारे माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया स्वत:च 'आऊट' झाले आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी अकोल्यात पक्षसंघटनेच्या 'कॅप्टन्सी'चा निर्णय आमदार नितीन देशमुखांच्या बाजूने दिल्याने त्यांनी हा निर्णायक 'सामना' जिंकल्याची चर्चा जिल्ह्याच्या राजकारणात आहे. 

अकोला शिवसनेची सर्व सूत्रं नितीन देशमुखांच्या हातात 
अकोल्यात आता पहिल्यांदाच दोन जिल्हाप्रमुख असणार आहेत. अकोला जिल्हा शिवसेनेवर परत आमदार आणि जिल्हाप्रमुख नितीन देशमुखांचंच वर्चस्व निर्माण झालं आहे. पक्षाने आमदार नितीन देशमुखांसह त्यांचे कट्टर समर्थक आणि जिल्हा परिषद गटनेते गोपाल दातकरांची जिल्हाप्रमुखपदी नेमणूक केली आहे. आमदार आणि सध्याचे जिल्हाप्रमुख नितिन देशमुख यांची पुन्हा नियुक्ती करताना त्यांच्याकडे बाळापूर आणि मुर्तिजापूर मतदार संघाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर गोपाल दातकर यांच्याकडे अकोला पूर्व, अकोला पश्चिम आणि अकोट मतदारसंघाची जबाबदारी असणार आहे. पक्षाने दोन जिल्हाप्रमुख देण्याचं ठरविल्यानंतर जिल्ह्यातील देशमुख आणि बाजोरिया गटांची या पदांसाठी रस्सीखेच सुरू होती. बाजोरिया गटाने आपल्याला किमान एक जिल्हाप्रमुख पद मिळावं यासाठी ताकद लावली होती. मात्र, पक्षानं दोन्ही जिल्हाप्रमुख पदं ही देशमुख गटाला देत बाजोरिया गटाचा भ्रमनिरास केला आहे. 

विधानपरिषदेतील पराभवानंतर अकोला शिवसेनेतील वाद चव्हाट्यावर 
विधान परिषदेच्या अकोला-वाशिम-बुलडाणा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून शिवसेनेचे सलग तीनदा आमदार असलेल्या गोपीकिशन बाजोरियांचा पराभव झाला होता. शिवसेनेच्या या बालेकिल्ल्यात भाजपचे वसंत खंडेलवाल विजयी झाले होते. सेनेच्या या पराभवानंतर शिवसेनेत आरोप प्रत्यारोपींच्या फैरी झडल्या होत्या. शिवसेनेतील घरभेद्यांनीच आपला पराभव घडवून आणल्याचा खळबळजनक आरोप गोपीकिशन बाजोरियांनी केला होता. तर बाजोरियांचे समर्थक सहसंपर्कप्रमुख श्रीरंग पिंजरकर यांनी या पराभवाला थेट आमदार नितीन देशमुख जबाबदार असल्याचा खळबळजनक आरोप केला होता. भाजपकडून पैसे घेऊन देशमुखांनीच बाजोरियांचा पराभव घडवून आणल्याचा गंभीर आरोप पिंजरकरांनी केला होता. तर श्रीरंग पिंजरकरांनी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात आमदार देशमुखांवर खंडणीखोरीचे आरोप केले होते. या आरोपानंतर शिवसंदेश यात्रेदरम्यान निरीक्षक म्हणून आलेल्या खासदार हेमंत पाटलांनी दोन्ही गटांत दिलजमाईचे प्रयत्न केले होते. मात्र, त्यानंतरही दोन्ही गटांत जिल्हाप्रमुख पदावरून शह-काटशहाचं राजकारण सुरू होतं. अखेर यात देशमुख गटानं बाजी मारत बाजोरिया गटाला पहिल्या डावात अस्मान दाखवलं आहे. 

आरोप करणाऱ्या सहसंपर्कप्रमुख श्रीरंग पिंजरकरांना नारळ 
बाजोरियांच्या पराभवानंतर सहसंपर्कप्रमुख श्रीरंग पिंजरकरांनी सातत्यानं माजी संपर्कप्रमुख खासदार अरविंद सावंत, बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधव, आमदार नितीन देशमुख, संजय रायमुलकर आणि संजय गायकवाडांवर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित देशमुखांवर खंडणीखोरीचे आरोप करीत खळबळ उडवून दिली होती. दरम्यान, शिवसेना नेतृत्वाने पिंजरकरांची कोणतीही दखल न घेता त्यांची पदावरून हकालपट्टी केली आहे. आता सेवकराम ताथोड हे शिवसेनेचे नवे सहसंपर्कप्रमुख असणार आहेत. त्यामूळे पिंजरकरांच्या आरोपांना केराची टोपली दाखवत पक्षनेतृत्वाने देशमुखांकडे संघटनेचं नेतृत्व देत एकप्रकारे क्लीनचीट दिली आहे.

अकोला शहरप्रमुख पदासाठी होणार दोन्ही गटांत संघर्ष 
या नियुक्त्यानंतर आता शहरातील नेतृत्वासाठी दोन्ही गटाकडून ताकद लावली जाणार आहे. कारण, लगेच होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीची सुत्रं आपल्याकडे असावीत, यासाठी दोन्ही गट प्रयत्न करणार आहे. अकोला शहरप्रमुख पदासाठी आमदार नितीन देशमुखांकडून सध्याचे अकोला पश्चिमचे शहरप्रमुख राजेश मिश्रांसह राहूल कराळेंचं नाव पुढे केलं जाण्याची शक्यता आहे. यासोबतच बाजोरिया गटाकडून सध्याचे अकोला पूर्वचे शहरप्रमुख अतुल पवनीकरांसह योगेश बुंदेले यांचं नाव पुढं केलं जाणार आहे. दोन्ही जिल्हाप्रमुख पदं देशमुख गटाला दिल्यानंतर किमान अकोला शहराची जबाबदारी देण्यासाठी बाजोरिया गट पक्षाकडे आग्रह धरणार असण्याची शक्यता आहे.

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Threat Call Indrajeet Sawant : डॉ.प्रशांत कोरटकर यांच्या नावाने इंद्रजित सावंतांना धमकी देऊन शिवीगाळ
Threat Call Indrajeet Sawant : डॉ.प्रशांत कोरटकर यांच्या नावाने इंद्रजित सावंतांना धमकी देऊन शिवीगाळ
Prajakta Mali Mahashivratra Program:  त्र्यंबकेश्वरमधील प्राजक्ता माळीचा 'शिवस्तुती नृत्याविष्कार' कार्यक्रम वादाच्या भोवऱ्यात; सेलिब्रिटींच्या इव्हेंटची मंदिरात परंपरा नाही, माजी विश्वस्तांकडून आक्षेप
त्र्यंबकेश्वरमधील प्राजक्ता माळीचा 'शिवस्तुती नृत्याविष्कार' कार्यक्रम वादाच्या भोवऱ्यात; सेलिब्रिटींच्या इव्हेंटची मंदिरात परंपरा नाही, माजी विश्वस्तांकडून आक्षेप
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना 1500 रुपये आजपासून मिळणार, महिला व बाल विकास विभागानं उशीर होण्याचं कारण सांगितलं...
Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारीच्या हप्त्याचे पैसे आज येणार, तुमचं बँक अकाऊंट फटाफट चेक करा
Thane Crime: ठाण्यात गतीमंद मुलीला वेदना असह्य, आई अन् आजीने गुंगीच्या गोळ्या देऊन मारुन टाकलं, साताऱ्यातील गावी नेऊन अंत्यसंस्कार उरकले
गतिमंद मुलीच्या वेदना पाहवल्या नाहीत, आई -आजीने झोपेच्या गोळ्या देऊन कायमचं 'शांत' केलं; ठाण्यातील घटना
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 10 AM TOP Headlines 10AM 25 February 2025 सकाळी १० च्या हेडलाईन्सThreat Call Indrajeet Sawant : डॉ.प्रशांत कोरटकर यांच्या नावाने इंद्रजित सावंतांना धमकी देऊन शिवीगाळABP Majha Marathi News Headlines 8 AM TOP Headlines 8AM 25 February 2025 सकाळी ८ च्या हेडलाईन्सMassajog Protest : संतोष देशमुखांच्या न्यायासाठी एल्गार, मस्साजोग ग्रामस्थांचं आजपासून अन्नत्याग आंदोलन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Threat Call Indrajeet Sawant : डॉ.प्रशांत कोरटकर यांच्या नावाने इंद्रजित सावंतांना धमकी देऊन शिवीगाळ
Threat Call Indrajeet Sawant : डॉ.प्रशांत कोरटकर यांच्या नावाने इंद्रजित सावंतांना धमकी देऊन शिवीगाळ
Prajakta Mali Mahashivratra Program:  त्र्यंबकेश्वरमधील प्राजक्ता माळीचा 'शिवस्तुती नृत्याविष्कार' कार्यक्रम वादाच्या भोवऱ्यात; सेलिब्रिटींच्या इव्हेंटची मंदिरात परंपरा नाही, माजी विश्वस्तांकडून आक्षेप
त्र्यंबकेश्वरमधील प्राजक्ता माळीचा 'शिवस्तुती नृत्याविष्कार' कार्यक्रम वादाच्या भोवऱ्यात; सेलिब्रिटींच्या इव्हेंटची मंदिरात परंपरा नाही, माजी विश्वस्तांकडून आक्षेप
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना 1500 रुपये आजपासून मिळणार, महिला व बाल विकास विभागानं उशीर होण्याचं कारण सांगितलं...
Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारीच्या हप्त्याचे पैसे आज येणार, तुमचं बँक अकाऊंट फटाफट चेक करा
Thane Crime: ठाण्यात गतीमंद मुलीला वेदना असह्य, आई अन् आजीने गुंगीच्या गोळ्या देऊन मारुन टाकलं, साताऱ्यातील गावी नेऊन अंत्यसंस्कार उरकले
गतिमंद मुलीच्या वेदना पाहवल्या नाहीत, आई -आजीने झोपेच्या गोळ्या देऊन कायमचं 'शांत' केलं; ठाण्यातील घटना
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे शिक्षा प्रकरणी सलग दुसर्‍या दिवशी होणार सुनावणी; आमदार अपात्रतेला स्थगिती मिळणार?
माणिकराव कोकाटे शिक्षा प्रकरणी सलग दुसर्‍या दिवशी होणार सुनावणी; आमदार अपात्रतेला स्थगिती मिळणार?
Kanifnath Yatra : कानिफनाथ यात्रेत मुस्लीम व्यापाऱ्यांना बंदी, ग्रामसभेच्या ठरावानंतर प्रशासनाकडून गंभीर दखल, ग्रामसेवकाला धाडली नोटीस
कानिफनाथ यात्रेत मुस्लीम व्यापाऱ्यांना बंदी, ग्रामसभेच्या ठरावानंतर प्रशासनाकडून गंभीर दखल, ग्रामसेवकाला धाडली नोटीस
Share Market : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचे 435000 कोटी बुडाले, FPI कडून जोरदार विक्री सुरुच
गुंतवणूकदारांसाठी आठवड्याचा पहिलाच दिवस ब्लॅक डे ठरला, 435000 कोटी बुडाले, FPI कडून जोरदार विक्री सुरुच
Chhatrapati Sambhajinagar: विधानसभेपूर्वी भाजपला रामराम ठोकत शिवबंधन बांधलं, मोजून 5 महिन्यांनी दिनेश परदेशी पुन्हा भाजपच्या दिशेने
विधानसभेपूर्वी भाजपला रामराम ठोकत शिवबंधन बांधलं, मोजून 5 महिन्यांनी दिनेश परदेशी पुन्हा भाजपच्या दिशेने
Embed widget